Browsed by
Author: niludamle

एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.

एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.

एलिझाबेथ एकादशी. एलिझाबेथ खरंच टिकाऊ आहे. खूप टिकेल. खूप लक्षात राहील. कित्येक वर्षात इतका सुंदर मराठी चित्रपट पहायला मिळाला नव्हता. पंढरपुरातली चार पाच छोटी मुलं. प्रत्येकाचं घर वेगळं, घरची माणसं वेगळी. प्रत्येकाच्या घरच्या समस्या वेगळ्या. मुलं आपलं लहानपण पुरेपूर जगत असताना आपल्या घरचा भार उचलण्याच्या खटपटीत. खट्याळ, वांड, अभ्यास करणारी आणि अभ्यास न आवडणारी मुलं. आपलं लहानपण जगत असतानाही मोठ्या माणसासारखी वागायचा प्रयत्न करणारी. मोठी माणसं जशी नसतात पण असायला हवीत तसं वागणारी.  चित्रपट पंढरपूरच्या गर्दीत घेतला आहे. तिथली घरं,…

Read More Read More

इराणींचं संस्कृत प्रेम

इराणींचं संस्कृत प्रेम

मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी धाडकन जाहीर करून टाकलं की केंद्रीय विद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या जर्मन या तिसऱ्या भाषेच्या बदली संस्कृत ही भाषा शिकवली जाईल. त्या इतर  कोणाशी बोलल्या नाहीत,  विचारवंतांना विचारलं नाही की सार्वजनिक चर्चा केली नाही. भारत सरकारनं १९६१ साली कोठारी आयोगाच्या सुचनांचा विचार करून शाळांसाठी त्रिभाषा सूत्र तयार केलं. हिंदी राज्यांमधे हिंदी, भारतातली एकादी इतर भाषा ( तामिळ, तेलुगु, कनड, मराठी इ. ) आणि इंग्रजी शिकवली जावी अशी सूचना केली. इंग्रजीच्या बदल्यात एकादी आधुनिक जागतीक भाषाही…

Read More Read More

द. आफ्रिकेत मलेरिया शोधणारं उपकरण

द. आफ्रिकेत मलेरिया शोधणारं उपकरण

महाराष्ट्रात, मुंबईत, माणसं मलेरियानं मरत आहेत. जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ पहाणाऱ्या आणि भारतात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विभागाची ही गोष्ट. मलेरिया झालाय की नाही त्याची तपासणी करायला किमान तीन ते चार तास लागतात आणि त्याचा खर्च सुमारे ४०० रुपये येतो. आता द. आफ्रिकेत काय होतं ते पहा. जगात मागास समजल्या जाणाऱ्या द. आफ्रिकेत. तिथले डॉ. Ashley Uys आणि Lyndon Mungur यांनी मलेरिया शोधण्याचं एक उपकरण तयार केलं आहे. एक चपटी एक बोटाच्या लांबीची दोन बोटं रुंदीची प्लास्टिकची डबी. या डबीच्या एका…

Read More Read More

आरक्षण या  ‘ संकुचित राजकीय ‘ उपायामुळं मराठा समाजाचं नुकसान होतंय. राज्याची राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सत्ता बहुतांशी मराठा जातीतल्या माणसांकडं आहे. गेली कित्येक वर्षं. भारतामधे समृद्धीचा मार्ग उद्योगातून  नव्हे, सरकारातून जात असल्यानं मराठा समाजातील माणसांनी सरकार हे माध्यम वापरून समृद्धी मिळवली.  सरकार या वाटेचा फायदा मर्यादित लोक घेऊ शकतात. सर्वांनाच तिथं प्रवेश मिळणं कठीण असतं.  मराठा समाजातील पुढाऱ्यांनी या वाटेचा ताबा घेतला, अनेक मराठा माणसं समृद्धीपासून वंचित राहिली. धड सरकार नाही आणि धड उद्योजकताही नाही या त्रिशंकू अवस्थेत मराठा समाजातली…

Read More Read More

लोकशाहीतली कोंडी

लोकशाहीतली कोंडी

महाराष्ट्रात दुर्दैवानं एकाही पक्षाला निर्णायक बहुमत मिळालं नाही. एकाच चरित्राच्या दोन्ही काँग्रेस पक्षांनी आपसात भांडण केलं, वेगळे झाले. एकाच चरित्राच्या सेना-भाजपनं आपसात भांडण केलं. वेगळे झाले. परिणामी भाजपला बहुमत नसतांना राज्य करावं लागतंय. महाराष्ट्रात लोकांची मतं, मतदानाच्या सवयी इत्यादींचा हिशोब मांडला तर जनतेतच मतभेद आहेत. त्यामुळं असं घडलंय. भाजपनं कितीही चलाखी दाखवली तरी त्यांना राज्य टिकवणं शक्य होणार नाही. पक्षीय राजकारण पद्धतीमुळं सेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष मंडळी आपापला लोण्याचा गोळा मागत रहाणार.  न मिळाल्यास सरकार पाडण्याची धमकी देणार, खरी करून…

Read More Read More

फ्युडलिझम म्हणजे काय

फ्युडलिझम म्हणजे काय

राजकारणावर बोलत असतांना अमूक एक समाज फ्यूडल आहे असा उल्लेख सतत येत असतो. भारतात आणि विशेषतः पाकिस्तानात अजूनही समाज फ्यूडल आहे असा आरोप केला जातो.  फ्यूडलचा अर्थ काय? मध्य युगात लॅटिन भाषेत feudum असा शब्द होता, त्याचा अर्थ fee असा होता. फी म्हणजे मोबदला, एकादी गोष्ट केल्याबद्दल दिली जाणारी किमत, वस्तू किंवा पैशाच्या रुपात दिला जाणारा मोबदला. मध्य युगात युरोपमधे राजे, सरदार, पुंड असे कोणीही कुठल्या तरी विभागावर हल्ला करून तो ताब्यात घेत. सतत युद्ध चालत. यामुळं माणसं आणि समाज…

Read More Read More

महाराष्ट्रातला सत्तेचा खेळ

महाराष्ट्रातला सत्तेचा खेळ

सत्तेच्या खेळातली खडाखडी सेना महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसणार आहे. अगदी पहिल्या दिवसापासून मोदी आणि शहा यांची व्यूह रचना पक्की होती. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेत घेऊन किंवा सत्तेच्या बाहेर ठेवून खतम करायचं.  निवडणुकीच्या आधी जागावाटपाचा घोळ चालू असताना भाजपची भूमिका पक्की होती. किती आणि कुठल्या जागा ही चर्चा केवळ एक खेळ होता.सेनेनं दुय्यम स्थान स्वीकारावं आणि न स्वीकारल्यास युती तुटावी असं ठरलेलं होतं. फक्त युती तुटल्याचं खापर सेनेच्या माथ्यावर फुटावं अशी व्यूहरचना अगदी पहिल्या दिवसापासून होती.निर्णायक बहुमताला लागतील तेवढ्या जागा भाजपला मिळाव्यात,…

Read More Read More

वाघा हद्दीवरचा हल्ला

वाघा हद्दीवरचा हल्ला

वाघा हद्दीच्या पलिकडं, पाकिस्तानात, ६०० मीटरवर एका तरुणानं स्वतःच्या अंगावरच्या बाँबचा स्फोट करून साठेक माणसं मारली. खरं म्हणजे त्याला थेट हद्दीवर येऊन अधिक माणसं मारायची होती. वाघा हद्दीवर एक दार आणि दरवाजा आहे. तिथं दररोज संध्याकाळी पाक आणि भारतीय सैनिक झेंडा उतरवतात आणि मराठी नाटकात शोभावा असा मेलोड्रामा करतात. दोन्ही बाजूला हज्जारो लोक हा मेलोड्रामा पहायला जमा होतात. तेव्हां अशी काही हजार माणसं जमल्यास मारायची असा त्या आत्मघाती तरूणाचा इरादा होता. परंतू रेंजर्स या पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त असल्यानं…

Read More Read More

शहरं आखायला हवीत.

शहरं आखायला हवीत.

श्रीनगरमधे पाऊस संकटासारखा कोसळला. पाणीच पाणी साचलं. सारं श्रीनगर एक सरोवर झालं होतं. नॉर्मल वेळी आपण रस्त्यावर उभे रहातो, कठड्याला टेकून, पलिकडं दल सरोवर असतं. कठड्यावरून उडी मारून खाली उभ्या असलेल्या छोट्या होडक्यात बसायचं आणि दलच्या किनाऱ्याला पार्क केलेल्या हाऊस बोटीत जायचं. हे झालं नेहमीचं. २०१४ च्या पावसाळ्यात दल सरोवर आणि रस्ता यात फरकच राहिला नाही. सरोवर कुठलं आणि शहर कुठलं ते कळत नव्हतं.  सगळं शहर पाण्याखाली. इमारतींचा पहिला मजला पाण्याखाली. माणसं दुसऱ्या मजल्यावर आणि गच्चीत मुक्काम करून राहिली. कित्येक…

Read More Read More

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी सरकार चालवते.

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी सरकार चालवते.

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी  सरकार चालवते. ।। महाराष्ट्रातल्या मतदारांनी चार पक्षांमधे मतं विभागली. भाजपला २८ टक्के, सेनेला २० टक्के, काँग्रेसला १८ टक्के आणि राष्ट्रवादीला १७ टक्के मतं दिली. चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोडली होती, भाजप-सेनेची युती मोडली होती. म्हणजेच स्वतंत्रपणे या पक्षांना समाजात काय स्थान आहे ते सिद्ध झालं. मतं आणि जागा यांचं गणीत कधीच जुळत नाही. मतांच्या प्रमाणात जागा कधीच मिळत नाहीत. भाजपच्या  २८ टक्के मतांना २८ टक्के जागा म्हणजे ८० जागा मिळायला…

Read More Read More