सहस्र चंद्र दर्शन म्हणजे काय
आपल्याकडं सहस्र चंद्र दर्शन नावाचा एक विधी म्हणा, सोहळा म्हणा, आहे. माणूस ऐंशी वर्ष जगतो म्हणजे तो एक हजार चंद्र पहातो. हिंदू परंपरेनुसार सहस्र चंद्र दर्शन विधी केला की त्या माणसाला मरेपर्यंत बळ प्राप्त होतं, त्याच्यातला अहं कमी होतो. येवढंच नव्हे तर पुढला जन्म घेताना त्या व्यक्तीला आईच्या गर्भातच बळ प्राप्त होऊन पुढला जन्मही ती व्यक्ती बळवान होते. आज भारतातल्या माणसाचं सरासरी जीवनमान ७२ वर्षाचं झालं आहे. माणसं ८० वर्ष अगदी सहजपणे जगतात. शंभर वर्षापूर्वी सरासरी जीवनमान ५० च्या आतच…