आमदार म्हणजे मतांचे कंत्राटदार
गाबीत, पाचपुते इत्यादी मंडळी भाजपत दाखल झाली. सर्वांवर भ्रष्टाचाराचे, बेकायदेशीर वर्तनाचे आरोप. त्या आधी मेटे दाखल झाले. त्यांच्यावर दंगल केल्याचे आरोप. एका पक्षातील लोक दुसऱ्या पक्षात जाणं ही गोष्ट राजकारणात नेहमी घडत असते. आधीच्या पक्षात अडचण झालेली असते आणि नव्या पक्षांना अडचणीतून वाट काढायची असते. तेव्हां दोन्ही बाजूंनी अडचणींचा मामला. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी एक म्हण आहे. हरीलाही गाढवाचे पाय धरावे लागतात तर मातीचे पाय असणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत आक्षेप कसा घेणार. महाराष्ट्रात भाजपला बाहेरून माणसं आयात…