झु यांगकांग या एका सरकारी नोकरीतल्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केला. पैसे आपल्या नातेवाईक, मित्र, चमचे, सहकारी इत्यादी लोकांकडं ठेवले. नंतर सरकार, प्रस्थापित नेते यांच्या मर्जीतून झू उतरल्यावर परवा त्याच्या नातेवाईक इत्यादी लोकांना सरकारनं पकडलं, जप्ती आणली आणि त्यांच्याकडून १४.५ अब्ज डॉलरची संपत्ती जप्त केली. श्रीनिवासनांच्या पुतण्यानं मॅच फिक्सिंग केलं. आता म्हणे त्या बद्दल त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून जावं लागतंय. चौकशी वगैरे अजून व्हायचीच आहे. श्रीनिवासन म्हणतात की पुतण्यानं काय केलं याच्याशी त्यांचा संबंध जोडू नका. ए राजा, कलमाडी असे कित्येक म्हणजे कित्येक…
सुनील तांबे म्हणत आहेत की अण्णा अजून संदर्भहीन (irrelevant ) झालेले नाहीत. कुणी विचारतंय की अण्णांचं काय चाललंय. अण्णांच्या बाबतीत अनेकवेळा गोंधळ उडतो तो त्यांच्या राजकीय भूमिकांमुळं. ममता बानर्जींना दिलेला पाठिंबा,सभेला कमी गर्दी झाली म्हणून पाठिंबा काढून घेणं या गोष्टी त्यांचं एक लंगडं राजकीय अंगं दाखवतात. प्रश्न असा येतो की अण्णांकडं कसं पहायचं. देशाला भ्रष्टाचारा वीट आला होता, देशाला एक असहाय्यता जाणवत होती. अण्णांच्या भ्रष्टाचारविषयक भूमिकांमधे लोकांना आपलं म्हणणं प्रतिबिंबित झाल्याचं दिसलं. देशभरच्या लोकांनी त्यांना…
बबन घोलप यांना शिक्षा झाली कारण त्यांच्या विरोधात पुरावे होते. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानं माहिती अधिकाराचा वापर करून पुरावे गोळा केले होते. 98-99 मधे अण्णा आणि खैरनार म्हणाले होते की आपण ट्रकभरून पुरावे सादर करायला तयार आहोत. शरद पवार इत्यादींनी अण्णांची टिंगल केली होती, एक तरी पुरावा आणून दाखवा असं म्हणाले होते. अण्णांकडं ट्रकभर पुरावे होते हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्या वेळी मी अण्णांच्या आंदोलनाचा अभ्यास करत होतो, अण्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत होतो. राळेगण सिद्दीत झालेल्या एका बैठकीला…
बबन घोलप इत्यादींवर आरोप करतांना अण्णांनी पुरावे गोळा केले होते. अण्णांच्या सहकाऱ्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून हे पुरावे गोळा केले होते. ९८-९९ मधे अण्णा म्हणाले होते की आपण ट्रकभरून पुरावे सादर करू. शरद पवार इत्यादींनी त्यांची टिंगल केली होती. परंतू खरोखरच अण्णांजवळ पुरावे होते आणि खरोखरच ट्रकभरून कागदपत्रं होती. म्हणूनच तर घोलपांना शिक्षा झाली. ट्रकभर पुरावे मी स्वतः पाहिले होते कारण त्या वेळी मी अण्णांच्या आंदोलनाचा अभ्यास करत होतो, अण्णा आणि त्यांचे सहकारी यांना भेटत होतो त्यांच्या मुलाखती घेत होतो….
बबन घोलप व इतरांविरोधात झालेल्या आरोपांना कागद
बबन घोलप इत्यादी लोकांवर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याला आधार होता माहिती अधिकाराचा वापर करून गोळा केलेल्या कागदपत्रांचा, पुराव्यांचा. अण्णांच्या अनेक सहकाऱ्यांनी अनेक वर्षं चिकाटीनं माहिती गोळा केली. अण्णा आणि खैरनार ९८-९९ मधे म्हणाले होते की ट्रकभरून पुरावे सादर करेन. शरद पवारांसह सर्वांनी अण्णांची टिंगल केली. खरोखरच ट्रक भरतील इतके पुरावे होते. त्यातले कित्येक पुरावे मी स्वतः पािहिले आहेत कारण त्या वेळी मी अण्णांच्या आंदोलनाचा अभ्यास करत होतो. सोबत काळे या कार्यकर्त्याचा फोटो आहे. त्याचं घर पुराव्यांच्या फायलीनं…
बबन घोलप यांना तीन वर्षांची सक्त मजुरी झाली. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर 15 वर्षांनी. एक कोटीपेक्षा जास्त संपत्तीचा हिशोब त्याना देता आला नाही. कोर्टानं मात्र पती पत्नीना मिळून दोन लाखांचा दंड केला आहे. खरं म्हणजे किमान 50 लाख दंड करायला हवा आणि दंडाची रक्कम त्यांची संपत्ती जप्त करून गोळा करायला हवी. अण्णा हजारे आणि यावतकर अशा दोघांनी प्रकरण धसाला लावलं. त्यावेळी त्यावेळच्या भाजप-सेना या सत्ताधारींनी अण्णाना नावं ठेवली. घोलप यांनी बदनामीचा खटला भरून अण्णांना तुरुंगात पाठवलं. शेवटी इतक्या…
गारपिटीचा विषय शेतकऱ्यांशी बोलत असताना पीक विम्याचा मुद्दा निघत राहिला. विमा हे प्रकरण काय असतं? नुकसान झालं रे झालं की विमा कंपनीनं नुकसान भरून द्यावं अशी एक बाळबोध समजूत आढळून आली. बहुतांश माणसं 40 व्या वर्षी मरत असतील तर विमा कंपनी आयुर्विमा द्यायला तयार होत नाही. जास्तीत जास्त माणसं जास्तीत जास्त जगू लागली की विमा द्यायला कंपनी तयार होते. शंभर माणसं दीर्घायुषी होतात तेव्हां पाच दहा लवकर मरणाऱ्या माणसांना मरणाची भरपाई देणं कंपनीला परवडतं. ओले आणि सुके दुष्काळ, अकाली पाऊस,…
गारपीट, नुकसान आणि भरपाई यंदाची गारपीट अभूतपूर्व आहे. इतक्या मोठ्या प्रदेशावर आणि इतके दिवस गारपीट झाल्याचं कोणालाही आठवत नाही. पडलेल्या गारा अर्धा किलो, पूर्ण किलो या वजनाच्या आणि आकाराच्या होत्या. गारांच्या या वजनामुळं कच्ची छपरं, पत्र्याची छपरं कोसळली, कच्च्या भिंती कोसळल्या. या वजनामुळं माणसंही मेली. असं पूर्वी घडलेलं नाही. सामान्यतः गारा लहान असल्या आणि पटकन पडून गेल्या तर पिकाचं नुकसान होत नाही. पण या अभूतपूर्व वजनदार गारांमुळं ज्वारीसारखी पिकं जमीनदोस्त झाली. द्राक्ष, डाळिंब,ऊस ही नगदी पिकं गेली. पैशाच्या हिशोबात नगदी…
मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता कमी नरेंद्र मोदी पंतप्रधान न होण्याच्या शक्यता भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं माध्यमं एकत्रितपणे सांगत आहेत. भाजपला जास्त जागा मिळण्याला मोदी यांची प्रतिमा आणि कर्तृत्व कारणीभूत आहे, मोदी खूप लोकप्रिय असून एक लाट आहे असं माध्यमं सांगत आहेत. माध्यमातून दिसतय की मोदी हा एकांडा शिलेदार रथ घेऊन निघाला आहे. भाजपमधले फारच कमी लोक त्यांच्याबाजूनं प्रचार करताना, भाषणं करताना दिसतात. उलटपक्षी भाजपमधले काही नेते त्यांच्या बाजूचे नाहीत असं माध्यमं दाखवत…