Browsed by
Author: niludamle

लोकसत्ताच्या दिनांक 5 फेबच्या अंकात कांबळे यांचा लेख आहे. त्यात त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बाबत मुंडे यांनी केलेल्या विधानांचा तपशीलवार-साधार खुलासा केला आहे. त्यातला एक खुलासा आहे तो डॉ. आंबेडकरांना शामाप्रसाद  मुकर्जी यांनी राज्यसभेत पाठवलं या मुंडेच्या विधानासंदर्भात. आंबेडकर मुंबई विधानसभेच्या मतदार संघातून निवडून गेले होते, त्यांचा बंगालशी किंवा शामाप्रसाद मुकर्जींशी काहीही संबंध नाही हे कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे. शामाप्रसाद मुकर्जी हे संघाचे-जनसंघाचे-भाजपचे नेते. त्यांनी आंबेडकरांना राज्यसभेत पाठवलं याचा अर्थ ते आंबेडकर-दलित यांचे समर्थक होते असं मुंडेना सुचवायचं होतं. मुंडे…

Read More Read More

केजरीवाल यांना सल्ला देणारे लेख नाणावलेले पत्रकार लिहीत आहेत. त्यात गोविंदराव तळवलकर आहेत, एम जे अकबर आहेत. कित्येक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे हे पत्रकार सल्ले देत आहेत, मतं मांडत आहेत. ते योग्य आहे, समजण्यासारखं आहे. मेघनाद देसाईंनीही केजरीवाल इवेंट जगात इतरत्र इतर वेळी घडलेल्या घटनांच्या प्रकाशात तपासला आहे. एक लाट तयार होते. एक वातावरण इमर्ज होतं. त्यात माणसं सत्तेत, विधीमंडळात फेकली जातात. काही काळानंतर लाट ओसरते, वातावरण निवळतं आणि इमर्ज झालेली माणसं विस्मृतीत जातात, इतिहासातली एक छोटीशी नोंद होतात. तळवलकर, मेघनाद…

Read More Read More

केजरीवाल

केजरीवाल

केजरीवाल हा एक इवेंट आहे. इमरजंट आहे. अनेक लोकांनी स्वतंत्र हेतू बाळगून केलेल्या हालचालीतून ही घटना घडली आहे. केजरीवाल सत्ता स्थापन करतील असं लोकांना वाटलंही नसणार. लोकांच्या ढोबळ अपेक्षा तेवढ्या केजरीवालांना माहित होत्या. म्हणजे  वीज, पाणी इत्यादी. परंतू त्याच माणसांना केजरीवाल यांनी मंत्री म्हणून कसं वागावं या बद्दलही अपेक्षा होत्या. त्या काही मतदानात प्रतिबिंबित झालेल्या नव्हत्या. त्यांना अपेक्षित नसलेल्या अनेक गोष्टी केजरीवाल करत जातील कारण त्या गोष्टी करू नयेत असं काही लोकांनी त्यांना सांगितलेलं नव्हतं.  कोणाला नुसतं पाणी हवं होतं,…

Read More Read More

प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी

प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी

प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी आणि केजरीवाल बरखा दत्त यांनी एनडीटीव्ही या वाहिनीवर केजरीवाल यांची दीर्घ मुलाखत घेतली. आप पक्षाबद्दल लोकांकडून घेतल्या जाणारे आक्षेप दत्त यांनी मांडले. विरोधी पक्षा  या बुरख्यामागं दडून बरखांनी माध्यमांना वाटणारे आक्षेपच मांडले. अनेक मुद्द्यांवर केजरीवालांनी स्पष्टीकरणं दिली. त्यातले लक्षणीय असे काही मुद्दे. 1. ” मी डावा किंवा उजवा नाही. मला डावं, उजवं म्हणजे काय ते समजत नाही. मला येवढंच समजतं की लोकांना पाणी हवंय,वीज हवीय, पारदर्शकता हवीय, सुशासन हवंय.” केजरीवाल यांच्या या भूमिकेमुळंच आधीचा राजकारणाचा अनुभव नसतांनाही…

Read More Read More

अॅलन टुरिंग

अॅलन टुरिंग

अॅलन टुरिंग या वैज्ञानिकाची ब्रिटीश राणीनं माफी मागितली आहे. १९५४ साली टुरिंगनं आत्महत्या केली. तो समलिंगी स्वभावाचा होता. त्या काळात  समलिंगी स्वभाव आणि संबंध ही गोष्ट गुन्हा मानली गेली होती. सरकारनं  जबरदस्ती करून  अघोरी रासायनिक उपचार करून त्याला ‘ नैसर्गिक ‘ करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारनं केलेल्या छळाला कंटाळून टुरिंगनं आत्महत्या केली होती.     अॅलननं जर्मन सैन्याची गुप्त लिपी फोडली, त्यातून जर्मन हवाई हल्ल्यांपासून हज्जारो ब्रिटीश माणसांचे प्राण वाचले.  कंप्युटर विज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे प्रांत त्यानं सुरु केले. त्यानं…

Read More Read More