पुस्तकं. हिटलर १९२३
पुस्तकं. हिटलर. 1923. By Mark Jones. Basic Books; 432 pages; $32 and £25 ÷÷ ८ जून १९२३ या दिवशी ॲडॉल्फ हिटलर म्युनिखमधल्या बियर हॉलमधे गेला. सोबत एसएस या त्याच्या खाजगी सैन्याचे जवान होते. या जवानांनी बियर हॉलला गराडा घातला. हॉलच्या बाहेर मशीन गन होती. ती हॉलवर रोखलेली होती. हॉलमधे बव्हेरिया प्रांताचे कमिशनर कार आणि त्यांचे सहकारी प्रशासक होते. ते एका सभेत बोलत होते. हिटलर सभेत घुसला. स्टेजवर गेला आणि बोलू लागला. हिटलर त्या वेळी प्रसिद्ध पुरुष नव्हता. श्रोत्यांनी हिटलरकडं लक्ष…