मोदी, ओबामा, पर्सनल केमेस्ट्री
नरेंद्र मोदींनी बराक ओबामांना मिठ्या मारल्या. ओबामांसोबत
जाहीर बोलताना मोदी ओबामांचा उल्लेख बराक बराक असा करत होते. ओबामांशी आपली जवळीक
आहे आपण ओबामा यांच्यात एक पर्सनल केमेस्ट्री आहे असं मोदी दाखवत होते.

देशाचे प्रमुख म्हणून
कामासाठी, करार करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रपती-पंतप्रधान ही माणसं एकत्र येतात तेव्हांही ती देशप्रमुख असली
तरी मुळात माणसंच असतात. या माणसांचं
आपसात किती जुळतं, भेटीमधे त्यांच्यात किती आपुलकी निर्माण होते, माणसं म्हणून ती
एकमेकाच्या किती जवळ येतात याला महत्व असतं. शिखरावरच्या एकट्या पडलेल्या माणसांचं आपसातलं सूत म्हणजेच
पर्सनल केमेस्ट्री.

पर्सनल केमेस्ट्री ही गोष्टी सहजा सहजी घडत नाही. ती बहुतेक
वेळा घडवून आणावी लागते. त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो.

बराक ओबामा भारतात येण्याआधी नरेंद्र मोदी आणि अमेरिकन सरकार
यांच्यात तणाव होते.
यांच्यात तणाव होते.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 मधे गोध्रा
हत्याकांड घडलं. सुरवातीला हिंदू माणसं गाडीत गाठून जाळली गेली. त्यात मुसलमानांचा
हात होता असा आरोप झाला. नंतर मुसलमान घराघरात गाठून मारले गेले. मुसलमान मारले
जाण्यात मोदींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप झाला, बोभाटा झाला.
ते मुख्यमंत्री असताना मुस्लीम हत्याकांड घडलं, राज्य सरकारला ते वेळीच थांबवता
आलं नाही. मोदी बदनाम झाले. ब्रीटन, अमेरिका या देशांनी त्यांना काळ्या यादीत
टाकलं. अमेरिकेनं त्यांना व्हिजा नाकारला.

नंतर मोदी पंतप्रधान झाले. आता अमेरिकेची पंचाईत झाली. भारताशी
चांगले संबंध असणं अमेरिकेला आवश्यक होतं. आता मोदी हे देशप्रमुख असल्यानं
त्यांच्याशी जुळवून घेणं भाग होतं. अमेरिका आणि भारत यांच्यात वाटाघाटी होणं
आवश्यक होतं, करार करणं आवश्यक होतं. पंतप्रधान आणि राष्टाध्यक्ष या नात्यानं बराक ओबामा आणि मोदी यांना एकत्र येणं भाग
होतं.

दोन्ही बाजूनी फिल्डिंग लावायला सुरवात झाली. दोन्ही देशांची
परदेश खाती, गुप्तचर विभाग, प्रतिमा रंगवणारे रंगारी इत्यादी लोक कामाला लागले.
भारतातल्या लोकाना ओबामांचे वीक पॉईंट्स कळले. अमेरिकेतल्या लोकांना नरेंद्र
मोदींचे वीक पॉइंट्स कळले.

मोदींची अमेरिका वारी आखण्यात आली. मॅडिसन गार्डन,
भारतीयांच्या भेटी इत्यादी गोष्टी काटेकोर आखण्यात आल्या. अमेरिकेतले गुजराती आणि
परदेशात राहिल्यानं हळवे झालेले भारतीय यांना गोळा करण्यात आलं. कोण पत्रकार
मोदींना भेटतील आणि कोणाला लोकांच्या रागाचा बळी व्हावं लागेल हे ठरलं. अमेरिकेत
तीन चार दिवस मोदीना गाजवण्यात आलं. भारतीय माध्यमांनी मोदी भेटीवर प्रचंड चित्रं
दाखवली, मजकूर लिहिला. अमेरिकन माध्यमात या भेटीचा मागमूसही नव्हता. न्यू यॉर्क
टाईम्समधे छोट्या बातम्या होत्या आणि त्यात येवढंच म्हटलं होतं की मोदींनी निवडून
देताना खूप आश्वासनं दिलीत परंतू अजून ती अमलात येताना दिसत नाहीयेत. न्यू यॉर्क
टाईम्सची नोंद म्हणजे एक कण होता आणि माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी समुद्रायेवढी
होती.

ओबामांनी मोदीची औपचारिक भेट घेतली.
(मोदी जर्मनीत एक
रात्र काढून दक्षिण अमेरिकेकडं जायला निघाले असताना त्या रात्री जर्मनीच्या
चॅन्सेलर जर्मनीत न थांबता द. आमेरिकेत निघून गेल्या. द. अमेरिकेत मोदी आणि अंगेला
मर्केल एकाच गावात असताना मर्केल मोदींना भेटल्या नाहीत.)

अमेरिका भेटीचा मुख्य हेतू मोदींना खुष करणं असा होता. त्यांना दर्दभरी भाषणं करता आली, स्मार्ट कपडे
घालून वावरता आलं, माध्यमांनी त्यांची छबी खूप दाखवली. मोदी आणि अमेरिका यातलं
अंतर कमी करून मोदी ओबामा करार घडवणं हा
हेतू होता. कोणते करार करायचे आहेत,
त्यातल्या कोणत्या अडचणी कशा दूर करायच्या आहेत इत्यादी गोष्टींचे तपशील
पडद्यामागे राहून नोकरशहा, डिप्लोमॅट इत्यादी मंडळी करत होती. ते तपशील ना ओबामाना
माहित होते ना मोदीना.

भारतात येताना ओबामांना
व्यवस्थित ब्रीफ करण्यात आलं होतं. मोदी मिठ्या मारणार हे त्याना माहित होतं. काही
महिने आधी मोदी आणि चीनचे शी पिंग झोपाळ्यावर बसून ढोकळा कसा खात होते याच्या
फिल्म्स अमेरिकेच्या सीआयए इत्यादी लोकांनी नीट अभ्यासल्या होत्या. शारीरीक जवळीक
करणं आणि अघळ पघळ वागणं म्हणजेच जवळीक असते
अशी भारतीय माणूस आणि मानल यांची समजूत असते हे त्यांनी अभ्यासलं. मोदींचं व्यक्तिमत्व अमेरिकेनं अभ्यासलं होतं.
भाषणं, दिसणं, शब्दांचा खेळ इत्यादी गोष्टी मोदींना आवडतात.त्या मानानं तपशील
त्यांना कमी कळतात, तपशिलात ते चुकत असतात हेही त्यांनी समजून घेतलं. त्यातूनच
भेटीत काय करायचं याच्या सूचना ओबामाना मिळाल्या होत्या.

तुलनेनं ओबामांचा अभ्यास भारतीय पोलिस, गुप्तहेर संस्था, परदेश
खातं यांनी केला नव्हता. ओबामांच्या टीममधली माणसं तयारीसाठी दिल्लीत पोचली
तेव्हां भारतातली संबंधित माणसं सतत अमेरिके बद्दल कुरकुर तरी करत होती नाही तर
त्यांच्यासमोर पायघड्या घालत होती.

हे सारं चाललं असताना
अमेरिकेतलं परदेश खातं, उद्योगी, गुप्तचर यांना विविध करारांचं काय होऊ शकतं याचा
अंदाज आला होता. अणुकरार मार्गी लागणार नव्हता. अमेरिकेनं घातलेल्या अटी पूर्ण
करणं भारताला जमणार नव्हतं. अमेरिकेच्या अटी मान्य केल्या तर लोकमताचा राग पत्करावा
लागणार होता आणि मान्य नाही केल्या तर करार होणार नव्हता. अडचण होती. ओबामानी
दिल्लीत पाऊल ठेवलं तेव्हांच कोंडी स्पष्ट झाली होती. बहुदा ओबामाना या भेटीत रस नव्हता. त्यांच्या
दृष्टीनं तो एक उपचार होता. गांधीजींचं नाव पाच सात वेळा घेऊन ओबामानी अमेरिकन
मतदारांना सांभाळलं. बराक बराक असं
वारंवार म्हणून मोदींनी ओबामा हे आपले लंगोटी यार आहेत असं खेड्यापाड्यातल्या आणि
शहरातल्या भाबड्यांना सांगितलं. मोदी खुष झाले. मोदींना खुषी मिळावी यासाठी
रेडियोवर मनकी बात उरकण्यात आला.

ओबामा अमेरिकेत रवाना. मोदी दिल्लीत भाषणं करायला मोकळे. करार
जागच्या जागी. अणुव्यवस्थेत अपघात झाला तर नुकसान भरपाई कोणी कशी द्यायची हा कळीचा
मुद्दा लोंबकळत राहिला.

1978 मधे अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांनी कँप डेविड या
सुखीविश्रांतीच्या ठिकाणी असाच एक राजकीय कराराचा खटाटोप घडवला होता. इजिप्त आणि
इस्रायल या दोन शत्रू देशांच्या प्रमुखाना 13 दिवस एकत्र ठेवलं. बेगिन आणि सादत.

बेगिन यांची कारकीर्द दहशतवादानं भरलेली. इस्रायलच्या
निर्मितीपासूनच बेगिन यांनी खूप पॅलेस्टिनी मारले, इजिप्तचा युद्धात पराभव केला. सादत यांनी इस्रायलची माणसं
मारली, इस्रायलशी युद्धं केली. इस्लायल नकाशातून नष्ट करणं अशी सादत यांची शपथ

अमेरिकेची इच्छा होती की दोन देशांत शांततेचा करार व्हावा. पण करार झाल्यावर बेगिन यांना इस्रायली जनता फटके
मारणार होती आणि सादत यांचा तर मुस्लीम ब्रदरहूड खूनच करणार होते. करार
घडवायचाच असं अमेरिकेनं ठरवलं होतं. सीआयए आणि परदेश खात्यातली माणसं कित्येक
आठवडे इजिप्त आणि इस्रायलमधे मुक्काम करून होती. सादत आणि बेगिन दोघांनाही दमदाटी,
पटवणं, मस्का मारणं चालू होतं. जमेना. दोन्ही देश अमेरिकेच्या आर्थिक मदतीवर
अवलंबून. शेवटी ‘
बऱ्या बोलाने कँप डेविडमधे या नाही तर मदत बंद ‘
असा दम दिल्यावर दोघे तयार झाले.

अमेरिकेनं कित्येक आठवडे सादत आणि बेगिन यांच्या केमेस्ट्रीचा
अभ्यास केला. कित्येक माणसं हे काम करत होती. त्यात राज्यशास्त्र, मानस शास्त्र,
समाजशास्त्र, भाषा इत्यादी शाखांमधले विशेषज्ञ गुंतले. दोघांना एकत्र करणं, आपसात
बोलतील तरी इतकं सौहार्द तयार करणं, म्हणजेच पर्सनल केमेस्ट्री, हा उद्देश.

बेगिन वृद्ध होते. चिडके होते. त्यांचं नातवंडांवर फार प्रेम.
नातवंडं समोर आली की ते विरघळत. त्यांची पत्नी त्यांना दटावत असे. तिचं ते ऐकत.
कँप डेविडमधे एका घरात नातवंडं आणि पत्नीला नेऊन ठेवलं.

सादतही चिडकेच. त्यांचा परदेश मंत्री त्यांच्या जवळचा. तो
विचित्र माणूस होता. तो म्हणे भविष्य वगैरेही जाणायचा. तो सादतांशी भांडत असे पण
तरीही दोघांमधे चांगलंच सूत होतं. अमेरिकेनं खूप खटपट करून त्या मंत्र्याला टीममधे
सामिल केलं.

एका खोलीत सादत, बेगिन टेबलाभोवती बसून बोलत. शेजारच्या
खोल्यांत त्यांचे सहकारी बसलेले असत, काही माहिती लागली तर पुरवण्यासाठी. तिसऱ्या
खोलीत अमेरिकन डिप्लोमॅट, नोकरशहा. दूरवरच्या एका खोलीत प्रे. कार्टर आणि त्यांची
पत्नी रोझालिन दुर्बीण लावून सादत-बेगिन यांच्यावर लक्ष ठेवून असत.

कित्येक वेळा बेगिन आणि सादत कचाकचा भांडताना दिसत. चिडलेत,
हातवारे करत आहेत हे दुर्बिणीतून दिसे. मग कार्टर काही तरी खायला पाठवत, चहा पाणी
पाठवत, ब्रेक देण्याचा प्रयत्न करीत.

एकदा भांडण विकोपाला
गेलं, दोघेही उठून आपापल्या देशात परतायला निघाले. रोझॅलिन कार्टर बेगिन यांच्या
पत्नीशी बोलल्या. श्रीमती बेगिन नातवंडांना
घेऊन बेगिन-सादतांच्या खोलीत गेल्या. पोरं जवळ आल्यावर बेगिन एकदमच निवळले.
थोडावेळ नातवंडांशी बोलून, खेळून झाल्यावर जणू काहीच घडलेलं नाही अशा थाटात ‘ तर
आपण काय बरं बोलत होतो ‘
असं म्हणून सादतांशी बोलू लागले.

स्वतंत्र सार्वभौम पॅलेस्टाईनला इस्रायलची मान्यता, पॅलेस्टाईनची इस्रायलनं
बळकावलेली गावं पॅलेस्टाईनला परत, पॅलेस्टाईनमधे केलेल्या वस्त्या इस्रायलनं काढून टाकणं, पॅलेस्टाईननं
इस्रायलला मान्यता देणं या गोष्टी अमेरिकेला हव्या होत्या. बारा दिवस झाले तरी
एकमत होत नव्हतं.

कार्टर कातावले. रोझॅलिन कार्टरनी प्रे. कार्टरना शांत केलं,
समजावलं, धीर धरा असं सांगितलं.
समजावलं, धीर धरा असं सांगितलं.
कार्टर सादत बेगिन यांना भेटून निर्वाणीचं
बोलले. आता करार केला नाहीत तर उद्यापासून आर्थिक मदत बंद.

परिणाम झाला. दोघं करार करायला तयार झाले. अर्थात तो करारही
महत्वाची कलमं बाजूला टेवूनच झाला. पॅलेस्टाईन स्वतंत्र देश करावा यावरच एकमत
झालं. तेराव्या दिवशी सादत-बेगिन आपापल्या घरी गेले.

करार झाला खरा, पण अमलात आला नाही. मारामाऱ्या चालतच राहिल्या.
पॅलेस्टाईन नावाचा एक पूर्ण सार्वभौम देश झालाच नाही. पॅलेस्टाईन ऑथॉरिटी तयार
करून एक मर्यादित स्वातंत्र्य इस्रायलनं दिलं. इस्रायल पॅलेस्टाईनवर हल्ले करत
राहिलं, पॅलेस्टाईनही इस्रायलवर अग्नीबाण सोडत राहिलं.

2001 मधे प्रे. बिल क्लिंटन यांनी कँप डेविडमधे पुन्हा एकदा वाटाघाटी घडवल्या.
इस्रायलचे एहुड बराक आणि पॅलेस्टिनी पुढारी यासर अराफत यांना एकत्र आणलं. जुनेच
मुद्दे, 1978 सालातले. 78 ते 2001 या 23 वर्षात परिस्थिती जैसे थे होती. पुन्हा
एकदा पर्सनल केमेस्ट्री वगैरे. अराफत हे देखण्या सवयी असलेले गृहस्थ. त्यांच्या
कंबरेला नेहमी पिस्तूल असे. कुठेही गेले तरी पिस्तुल सोबत. युनायटेड नेशन्समधे
शस्त्र घेऊन कोणालाही प्रवेश नसतो. तिथंही यांचा पिस्तूल घेऊन जाण्याचा हट्ट.
बहुदा त्यांचं म्हणणं असतं की म्हशीला जशी तिची शिंगं असतात तसं पिस्तुल हे
त्यांच्याच शरीराचा भाग असावा. तर असे अराफत (पिस्तुलासकट) आणि बराक एकत्र आले. नऊ
दिवस एकत्र होते. पर्सनल केमेस्ट्री. निष्पत्ती काहीही नाही.

क्लिंटन यांचा पेशन्स
संपला. ते वैतागून कँप डेविड सोडून निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत बराक आणि
अराफत यांनी काही काळ हुज्जती घातल्या. थकल्यावर तेही निघून गेले.

पर्सनल केमेस्ट्री दोन माणसांना एकत्र आणायला उपयोगी पडते.
टेबलावर एकत्र बसणं, गळ्यात गळे घालणं, हस्तांदोलन करणं, एकत्र फोटो काढणं, टीव्ही
रेडियोवर एकत्र कार्यक्रम करणं इत्यादी गोष्टी घडतात. हे इव्हेंट घडवणाऱ्या लोकांना
काम आणि फायदे मिळतात. ज्या साठी हे इवेंट घडवले जातात ती उद्दीष्टं पार पडतातच
असं नाही. बहुतेक वेळा ती पार पडत नसतात. कारण त्यात दोन देश, दोन समाज, दोन दीर्घ
आणि घट्ट परंपरा, दोन निहित स्वार्थ इत्यादी गोष्टी गुंतलेल्या असतात. दोन शत्रू
किंवा दोन स्पर्धक यांच्यात कशावर एकमत होणार? मामला जिकीराचा असतो.

प्रयत्न तर करावेच
लागतात. एकदा ओबामा-मनमोहन सिंग यांची पर्सनल केमेस्ट्री झाली. गाजावाजा झाला. दोन
देशांत आता ग्रेट नातं तयार झालंय वगैरे ढोल वाजला.

गाडं जिथल्या तिथं.
नंतर ओबामा आणि मोदींची केमेस्ट्री.
चिकाटीनं प्रयत्न करत रहायचं.
।।