ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.
स्पॉटलाईट हा चित्रपट यंदाच्या ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. दिद्गर्शन, उत्तम चित्रपट यासह एकूण ७ नामांकनं या चित्रपटाला मिळाली आहेत. या चित्रपटाबद्ल बोंब दोन कारणांसाठी झाली. एक म्हणजे चर्चमधल्या गैरव्यवहारावर चित्रपटानं बोट ठेवलं. दुसरं म्हणजे अमेरिकन समाज कसा पक्षपाती असतो ते या चित्रपटानं दाखवलं. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणून ही निर्मिती उत्तम आहे हा स्वतंत्र भाग झाला.
हा चित्रपट बिशपांची विकृती उघडी करतो.
बॉस्टन या अमेरिकन नगरीत अनेक बिशप लहान मुलांचा लैंगिक विकृत वापर करत असत. बिशप लहान मुलांना देवाची भीती घालून हा उद्योग करत. वाच्यता केलीत तर देवाला आवडणार नाहीत असं सांगत. मुलं घाबरत. शाळेतून काढून टाकण्याची भीती. कारण शाळा चर्चची. नंतर समाज वाळीत टाकणार. कारण समाजावर चर्चचा प्रभाव. मुलं घाबरत. आतून घुसमटत. उध्वस्थ होत. कित्येकांनी आत्महत्या केली. बहुतेकांचं जीवन उसवलं.
चर्चला हे सारं माहित होतं. चर्चनं या बिशपांना पाठीशी घातलं. त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांना रजेवर पाठवलं, उपचार केल्याचं नाटक केलं. आपण काही अयोग्य केलं असं बिशपांना वाटत नसे.
ख्रिस्ती धर्मात लैंगिक संबंध हे मूळ पाप, ओरिजिनल
सिन मानलं गेलंय. आदम आणि ईव्हनं देवानं नाकारलेलं
फळ खाल्यानं त्यांना मुलं झाली. धर्मप्रसारासाठी
काम करणाऱ्या माणसानं अविवाहित रहायलं पाहिजे असा एक ख्रिस्ती नियम. प्रीस्ट आणि नन
यांनी अविवाहित रहायचं. कामभावना ही माणसाच्या जगण्याचा अविभाज्य आणि अटळ घटक आहे हे
त्या ख्रिस्ताच्या काळात माहित नसेल. परंतू नंतर ते समाजाला कळलं तरीही ख्रिस्ती धर्मसंस्थेनं
आपल्या घडणीत सुधारणा केली नाही. शरीर संबंध आणि लग्न यांची सांगड चर्चनं घातली.
विवाह केला नाही तरीही माणसं आपल्या शारीर गरजा भागवत रहातात हे सत्य चर्चनं नाकारलं.
शारीर गरजा नाकारूनही जगता येऊ शकतं. माणसाची तशी घडण असायला हवी. निर्धारानं शारीर
गरजा दूर ठेवूनही माणूस चांगलं जगू शकतो. सर्व माणसांना ते जमत नाही. शारीर-मानसिक
गरजा नाकारण्याची सक्ती केली की गोची होते. चर्चनं सक्ती केल्यानं प्रिस्ट मंडळी या ना त्या वाटेनं शरीर सुख उपभोगत
असतात. लपून छपून

प्रीस्ट माणसं अत्यावश्यक सुख आडवाटेनं भोगतात
खरं पण क्रूर परिणाम समाजावर होतो.
खरं पण क्रूर परिणाम समाजावर होतो.
गोल्डन ग्लोब या दैनिकाच्या स्पॉट लाईट या शोध पत्रकारी करणाऱ्या टीमनं हे प्रकरण वेशीवर टांगलं. अत्याचार करणाऱ्या प्रिस्टाना शोधून त्यांच्यावर कारवाई करणं असा ग्लोबचा उद्देश नव्हता. असे अत्याचार लपवण्याची, अत्याचारींना पाठीशी घालण्याची व्यवस्था,
सिस्टिम,
चर्चमधे आहे यावर त्या पेपरला प्रकाश टाकायचा होता. सत्य लोकांसमोर ठेवणं हेच तर वर्तमानपत्राचं काम असतं. हे सत्य समजल्यावर त्याचं काय करायचं याचा निर्णय नंतर समाजातल्या इतर संस्थांनी घ्यायचा असतो.

या शोधासाठी गोल्डन ग्लोबला पुलित्झर बक्षीस मिळालं. गोल्डन ग्लोबनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतावर हा चित्रपट आधारलेला आहे.
ही एक शंभर टक्के खरी गोष्ट आहे.
ही गोष्ट आपल्यापर्यंत सिनेमा पोचवतो. चित्रपट हे माध्यम कसं असतं, कसं असायला हवं, कसं असू शकतं याचा अभ्यास या चित्रपटामुळं शक्य होतो.
लैंगिक अत्याचार, गैरवापर हा मुख्य मुद्दा असून चित्रपटात अत्याचाराची एकही घटना सिनेमात दिसत नाही. ढाणढाण संगित नाही. एकही नाट्यमय घटना नाही.
एका प्रसंगात अत्याचाराचा बळी झालेला माणूस कोसळतो, रडतो. पण भेकाड नाही, कोणतेही भावना चेतवणारे सूर नाहीत.
बळी, वकील, पत्रकार घटना शोधतात, नोंदतात. ऊच्च स्वरात बोलत नाहीत, प्रवचन देत नाहीत. फक्त एकदा बातमीदार भावनाविवश होतो, तोही अगदी थोडा काळ.
चित्रपटभर बातमीदार, संपादक, मुख्य संपादक ही माणसं बातमीची,
बातमी गोळा करण्याच्या पद्धतीची आणि प्रक्रियेची चर्चा करतात. कचेरीत अनौपचारिक पद्धतीनं एकमेकासमोर बसून. खालच्या आवाजात कामाचे तपशील चर्चितात. त्यांचे कपडे सामान्य.
त्यांची घरं सामान्य. मुख्य संपादक नावाचा माणूस खांद्यावर बॅग लटकावून कामाच्या जागी जातो. बातमीदार वकीलांना भेटतात, बळींना भेटतात, कार्डिनलना भेटतात. गाठीभेटी आणि संभाषणं चित्रपटभर पसरलेली आहेत. माणसं आपापली कामं शांतपणे करताना दिसतात.आपण जगाची सेवा करतोय, जगावर उपकार करतोय, क्रांतीबिंती करतोय असं त्यांच्या वागण्यात दिसत नाही. यात कोणीही हीरो असल्यासारखा दिसत नाही. कोणा एका किवा दोन मुख्य पात्रांभोवती सिनेमा फिरत नाही. अख्खी टीमच मुख्य पात्र आहे.

बॉस्टन या गावाची ही गोष्ट. गावावर चर्चचं वर्चस्व.
शाळा, कॉलेजेस त्यांच्या ताब्यात. आर्थिक संस्था चर्चच्या सांगण्यानुसार चालतात. जो कोणी चर्चला दुखावेल त्याला चर्च जीवनातून उठवतं. कोणत्याही नाट्यमय घटनेविना संभाषणांमधून, चर्चेतून हे प्रेक्षकाला कळतं.
शाळा, कॉलेजेस त्यांच्या ताब्यात. आर्थिक संस्था चर्चच्या सांगण्यानुसार चालतात. जो कोणी चर्चला दुखावेल त्याला चर्च जीवनातून उठवतं. कोणत्याही नाट्यमय घटनेविना संभाषणांमधून, चर्चेतून हे प्रेक्षकाला कळतं.
बॉस्टनमधली माणसं बाहेरच्या कोणाला शहरात ढवळाढवळ करू देत नाहीत. काळा, कॅथलिक नसलेला, अमेरिकन नसलेल्या माणसाला बॉस्टनमधे स्थान नाही. ग्लोबचा बातमीदार असतो पोर्तुगीझ आणि मदत करणारा वकील आर्मेनियन. त्यांना दूर ढकललं जातं. विकृतीप्रकरणाचा छडा लावण्यासाठी आलेला मार्टी हा संपादक कॅलिफोर्नियातून आलेला असल्यानं त्याला
सहकार्य करू नये असं बॉस्टनवासी आपसात ठरवतात.
सहकार्य करू नये असं बॉस्टनवासी आपसात ठरवतात.
चर्चच्या गैरव्यवहाराला कोणी हात लावायचा नाही, त्याची चर्चा करायची नाही.
नाट्यमयतेसाठी वापरल्या जाणाऱ्या युक्त्या चित्रपटात अनुपस्थित असून चित्रपट पहावासा वाटतो, खिळवून ठेवतो. त्याचं एक कारण संकलन. दृश्य पटापट सरकतात. कोणतंही दृश्य कंटाळवाणं होईपर्यंत टिकत नाही. कोणतंही दृश्य त्याचा अर्थ कळेपर्यंत प्रेक्षकासमोर रहातं.
कात्री हे हत्यार चित्रपटात महत्वाचं. दृश्य छान दिसतय, घटना चित्तवेधक आहे म्हणून भरमसाठ काळ पडद्यावर ठेवण्याचा मोह भल्याभल्याना होत असतो. या चित्रपटात संकलकानं कात्री शिस्तीत आणि कलात्मकरीत्या वापरलीय. आपण जे चाळे केले त्यात काहीही चूक नाही असं एका प्रसंगात बिशप सांगतो. ते दृश्य लांबवायचा मोह कोणालाही झाला असता. बळी पडलेली दोन माणसं आपली कहाणी सांगतात तेव्हांही ती दृश्य कोणीही लांबवली असती. ते टाळण्याला माध्यमाची समज आणि माध्यमावरची मांड असं म्हणता येईल. पार्टीच्या दृश्यात काही पात्रं नाट्यमय रीतीनं दाखवण्याचा मोह दिग्दर्शकानं टाळला आहे. कथानकाच्या दृष्टीनं महत्वाच्या पात्रांतलं संभाषण दाखवण्यापुरतीच पार्टी दिसते.माणसं नव्हे सिस्टिम हा मुख्य विषय असल्यानं ही हाताळणी.
कास्टिंग म्हणजे कलाकारांची निवडही उत्तम आहे.स्पॉटलाईट या चित्रपटाची कलात्मक आणि तंत्रात्मक हाताळणी खूप वरच्या दर्जाची असल्यानं हा सिनेमा ऑस्करला पोचला.
हा चित्रपट पहाताना काही दिवसांपूर्वी एका ब्राझिली दिग्दर्शकानं सादर केलेली क्लब नावाची फिल्म आठवली.
भ्रष्टाचार किंवा अत्याचार करणाऱ्या बिशपांना चर्च रजेवर, उपचारासाठी पाठवतं. म्हणजे त्याना कामापासून दूर करून एका दूरच्या गावात ठेवतं, पोसतं. एक प्रकारचा तुरुंग. सर्व सुखसोयी असलेला. एका छोटं गाव, वसतीगृहाची खोली आणि गावातला एक रस्ता येवढीच स्थळं चित्रपटात वापरलेली आहेत. स्पॉटलाईटसारखीच हाताळणी. फरक येवढाच की वसतीगृहातल्या बिशपांच्या लैंगिक उद्योगाची काही दृश्य चित्रपटात आहेत. ती प्रत्ययकारक, हादरवून टाकणारी आणि प्रक्षोभक आहेत. स्पॉटलाईट या चित्रपटात तसं काहीही नाही.क्लब चित्रपट सुरु झाल्यावर या बिशपांचं वागणं, आपसातलं बोलणं व व्यवहार जसजसे प्रेक्षकाला दिसू लागतात तसतसा प्रेक्षक खुर्चीला खिळून जातो.
एरिन ब्रोकोविच या आणखी एका चित्रपटाची आठवण होते. अमेरिकेतल्या एका गावात एका उद्योगामुळं प्रदूषण होतं, लोकांचे बळी जातात. एरिन ही संशोधक सत्याचा शोध लावून कंपनीवर खटला भरते ही त्या सिनेमाची गोष्ट. स्पॉटलाईटमधला शोध पत्रकारीच्या अंगानं आहे. एरिन ब्रोकोविचमधला शोध संशोधन,अन्याय निवारण या अंगानं आहे. कामाच्या रीतीत साम्य आहे. फिरणं, बळी शोधणं, त्यांच्या मुलाखती, पुरावे, वकील इत्यादी इत्यादी.
२००० साली प्रदर्शित झालेला एरिन ब्रोकोविचचं वैशिष्ट्य त्यातल्या भूमिका. ज्युलिया रॉबर्टस आणि मायकेल हार्नी (वकील) यांच्या भूमिका छान होत्या. या दोन व्यक्तिरेखांभोवतीच सगळा सिनेमा उभा होता.
।।।
6 thoughts on “ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.”
very well written , Sir !
जशी चित्रपटाची शैली तशीच लेखाची शैली हे फार आवडले.
– संजय भास्कर जोशी
Nice! Awaiting to see the movie.
Ulhas
शैक्षणिक महत्वाचे काम
दामले निळूंच्या लेखापोटी फळे रसाळ गोमटी
तथाकथित तज्ञ मंडळींनी तुमच्या ओघवत्या आणि अस्सल लिखाणापासून धडे घेतले तर विंग्रजी पुस्तकांचे शहाणपण स्वतःच्या नावावर मिरवत अगडबंब ,क्लिष्ट,शुष्क रसास्वादाने पार चिपाड होण्यापासून अनेक चित्रपट वाचतील. त्या चित्रपटांच्या आत्म्यांची सुटका होईल
याच दिग्दर्शकाने २००७ साली बनवलेला The Visitor हा चित्रपट तुम्ही बघायलाच हवा.
( अनंत अमेंबल)
Watched movie after reading your blog. Hope our society also matures to accept film like spotlight. Your efforts are appreciated.
Excellent critical appreciation of the film !!!! will definitely watch the film as you have given a new facet to film watching…..