फॉयल
दुकानं बंद, नेटवर पुस्तकांची खरेदी
अमेरिकेत फिरणाऱ्या माणसाचा एक सुखद अनुभव म्हणजे बार्नस अँड नोबल
पुस्तकाच्या दुकानात फेरी मारणं. न्यू यॉर्क, शिकागो, कोलंबस,कुठंही ही दुकानं
असतात. तीन चार मजल्यांची. हज्जारो चौरसफुटांची जागा आणि त्यात किती तरी म्हणजे
किती तरी पुस्तकं. निवांतीनं पुस्तकं चाळत,वाचत बसायचं. सोबतीला कॉफी, केक्स,
ब्राऊनी वगैरे. साहित्य, चित्रपट, नाटक, चित्रकला,विज्ञान, तंत्रज्ञान,बाल
साहित्य, लिबरल आर्टस असे आणि किती तरी विषय. झटकन वाचता येणाऱ्यापासून ते पीएचडी वगैरेत
गुंतलेल्यांना उपयोगी पडावीत अशी पुस्तकं.

असं हे बार्नस अँड नोबल आता बंद होऊ घातलंय. कारण आता ई बुक्सचा प्रसार
सुरु झालाय, पुस्तकं कंप्यूटरवर आणि सेलफोनवर वाचता येऊ लागलीत. मुख्य म्हणजे आता
पुस्तकं नेटवर विकत घेता येतात. अँमेझॉननं पुस्तकं लोकांना घरपोच विकत देण्याची
प्रथा रूढ केलीय. भारतातही आता अँमेझॉननं पुस्तकं विकायला सुरवात केलीय. भारतात फ्लिपकार्ट
ही कंपनी घरपोच पुस्तकं विकत होती, आता अँमेझॉनही फ्लिपकार्टला स्पर्धा करायला
उतरलीय. बुक गंगा इत्यादी लोकही आता मराठी पुस्तकं वाचकांना घरी पोचवू लागलेत. कित्येक प्रकाशकांकडूनही आता त्यांची पुस्तकं
नेटवर विकायची सोय झाली आहे.

पुस्तकं घरबसल्या मिळतात. नेटवर पुस्तकांचं कव्हर, त्यातले धडे,त्यातल्या
मजकुराचं वजन इत्यादी गोष्टी वाचायला मिळतात. पुस्तकांची परिक्षणही नेटवर वाचायला
मिळतात. पुस्तकांची निवड करणंही सोपं झालंय. दुकानातल्या पेक्षा कमी किमतीत ती मिळतात.
दुकानांची भलीमोठी जागा,तिथं काम करणारे कर्मचारी इत्यादी सारे खर्च वाचत असल्यानं
नेटवरची खरेदी स्वस्त पडते.

बार्नस नोबल हा ब्रँड आणि वस्तू बाजारातून गायब होतेय कारण तो ब्रँड आणि
वस्तू जे साधतं ते सारं अमेझॉन व इतर लोक स्वस्तात देऊ लागले आहेत. दुकानातून
विकणं या तंत्रज्ञानाची जागा नेटवरची विक्री या तंत्रज्ञानानं घेतली आहे.

असंच काहीसं कॅमेऱ्यांबाबत होणारेय. कॅनन, निकॉन, ऑलिंपस इत्यादी कंपन्या
नाना प्रकारचे कॅमेरे विकतात. त्यात एक काँपॅक्ट कॅमेरा असतो. छोटासा कॅमेरा
हाताळायला सोपा पडतो. एम अँड शूट. फोकसिंग वगैरेची भानगड नाही. डिजिटल
तंत्रज्ञानामुळं अशा कॅमेऱ्यावरची चित्रं भरपूर मोठी करता येतात. जेवढे पिक्सेल्स वाढतात तसा चित्राचा दर्जा वाढत
जातो. या कॅमेऱ्यानं हौशी आणि पत्रकारी करणारे अशा दोन्ही प्रकारच्या लोकांच्या
हाताचा ताबा घेतला, ही माणसं महाग एसएलआर कॅमेरे घेईनाशी झाली. थोडक्यात असं की या
कॅमेऱ्यांनी बाजार व्यापला. कूलपिक्स वगैरे ब्रँड. एके काळी साताठ मेगा पिक्सेलच्या
या कॅंमेऱ्याची किमत वीसेक हजार होती. आता पंधरा वीस मेगा पिक्सेलचा प्रभावी कॅमेरा
पाच सात हजाराला मिळतो.

तंत्रज्ञानाची किमया.
पण हे छोटे कॅमेरेही आता विकले जात नाहीत. ऑलिंपस या कंपनीच्या या छोट्या
कॅमेऱ्यांचा खप खूप खाली आलाय, पुढल्या
वर्षी ते कॅमेरे भंगारवाल्याला देण्याची पाळी येणार आहे. अगदी वीस मेगापिक्सेलची
छायाचित्र सोय आता सेल फोनमधे केली जातेय. फोन आणि कॅमेरा एकत्र. अशी सोय झाल्यावर
कोण पैसे टाकून छोटे कॅमेरे विकत घेईल. परिणाम असा की कॅंमेरा उत्पादक कंपन्या आता
केवळ व्यावसायिकांना लागणारे महाग कॅमेरेच तयार करून विकतील.

पुस्तकांची दुकानं शे दोनशे वर्षापासून होती. नव्या तंत्रज्ञानानं
समाजातली ती संस्था नाहिशी केलीय.
समाजातली ती संस्था नाहिशी केलीय.
छोटा कॅमेरा ही वस्तू आणि सोय सर्वसामान्य माणसाच्या सवयीची झाली होती,
समाजात रुळली होती. गेली पंधरा वीस वर्षं. नव्या तंत्रज्ञानानं ती सोय, ती सवय, ती
संस्था मोडीत काढलीय.

एकादी उत्तम दर्जाची वस्तू स्वस्तात आणि सहज मिळत असेल तर माणसं ती
वापरणारच.
वापरणारच.
गॅस आणि रॉकेलवर चालणारा दिवा किती तरी वर्षं भारतात लोकांच्या घरादारात
होता. वीज आली आणि ते दिवे गेले. दिवे गेले, ते लावणारी माणसं पुस्तकात आणि आठवणीत
जमा झाली.

जातं गेलं, त्या बरोबरच जात्यावरची गाणी आणि ओव्याही गेल्या. पिठाच्या गिरणीत
गिरणीवाला गाणं बिणं म्हणत नाही. यंत्रावर लोखंडी गोळ्यांनी फटके मारतो तोच तिथला
आवाज आणि जोडीला भिंतीला टांगलेल्या ट्रांझिस्टरवरची हिंदी गाणी.

तंत्रज्ञान असं माणसाचं जीवन घडवतं.
।।