स्थानिक पक्षांशी युती
भाजप आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे.
मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हां कुरबूर करत दोन्ही पक्ष एकत्र होते. नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागावाटपात मतैक्य न झाल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. मोदी यांनी प्रचाराचा झंझावात केल्यानंतर, मोदींना विरोध करत करत सेनेनं ६३ माणसं निवडून आणली. विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं नाही. राष्ट्रवादीचा बेभरवशाचा पाठिंबा भाजपनं घेतला. मंत्रीपदांवरून भाजप-सेनेत संघर्ष झाला. विधानसभेत अल्पसंख्य रहाण्याचा अर्थ सरकार कधीही कोसळू शकलं असतं. म्हणजे पुन्हा निवडणुका आणि पुन्हा जुनीच कोंडी. सेनेची अस्मिता-अस्तित्व आणि भाजपची एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून वाढण्याची इच्छा या दोन गोष्टींत संघर्ष होता. बराच काळ सेनेला संपवण्याचा विचार भाजपमधे घोंघावत होता. शेवटी सेनेला संपवण्याऐवजी सांभाळण्याचा शहाणपणा भाजपला सुचला. तसंच आपल्या अस्मितेकडं वास्तववादी दृष्टीकोनातून पहाण्याचं शहाणपण सेनेला सुचलं. भाजप-सेनेनं जुळवून घेतलं आणि आता सरकार स्थापन झालं आहे.
ही एक चांगली गोष्ट झाली. महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातली ही एक स्वागतार्ह घटना आहे.
प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक नेते हे भारतातलं एक वास्तव आहे. भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषा स्वतःचा स्वतंत्र इतिहास, संस्कृती विकसित करत असते. माणसं जगात कुठंही गेली, कोणत्याही विचारांना चिकटली तरी मुळात आणि तळात एक भाषिक संस्कृती टिकटिक करत असते. तिला चिरडून चालत नाही, फार डोक्यावर घेऊनही भागत नाही. राजकारणात आर्थिक आणि राजकीय विचारधारा येतात, आवश्यक असतात. मार्क्सवाद, समाजवाद, भांडवलवाद, बाजारवाद इत्यादी गोष्टी येतात. त्या विचारधारांत पडूनही माणसं आपलं सांस्कृतीक अस्तित्व टिकवत असतात. हे अस्तित्व त्या त्या राज्यातली करोडो माणसं आपले राज्यभाषी पुढारी आणि त्यांच्या भोवती तयार होणाऱ्या संघटनात गुंफतात. बाळ ठाकरे, बीजू पटनाईक, ममता बानर्जी, चंद्राबाबू नायडू , तेलंगणी नेते राव, ही उदाहरणं.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात भारत नावाचा एक देश तयार करण्याची खटपट महात्मा गांधींनी केली. त्यांच्या प्रयत्नातून काँग्रेस ही चळवळ आणि नंतर पक्ष तयार झाला. काँग्रेस ही राष्ट्रीय चळवळ आकार घेत होती तेव्हांच भाषा या कसोटीवर संघटना, राज्यं, यांचा विचार काँग्रेसला करावा लागला. जात, धर्म या बरोबरच भाषा या कसोटीवर चळवळीत विविध समाजगट संघटीत होत होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच भाषावार प्रांत रचना करावी लागली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राज्याराज्यातल्या भाषिक अस्मितांना, भाषक नेते आणि समाजगटांना काँग्रेसनं सामावून घेतलं. जोवर हे काँग्रेसनं सांभाळलं, चरण सिंग, यशवंतराव चव्हाण, पटनायक, कामराज, टी अंजय्या, इत्यादी स्थानिक लोकांना सत्तेत वाटा दिला, तोवर काँग्रेस शक्तीमान होती, इतर पक्षाना वावच नव्हता.
इंदिरा गांधीनी राज्याराज्यातल्या नेत्यांना संपवण्याचं, नमवण्याचं राजकारण सुरु केलं. राज्यातले स्थानिक बलवान नेते एकामागोमाग एक संपवण्याचा खटाटोप केला. त्यातून राज्य पातळीवरचे पक्ष तयार व्हायला सुरवात झाली. काँग्रेसनं चव्हाण, पवार इत्यादीना कमकुवत केलं आणि सेनेला बी टीम म्हणून वापरलं. धड सत्तेत वाटा नाही आणि धड स्वतंत्र पक्ष म्हणून स्थान नाही अशा अवस्थेत सेनेनं एक स्वतंत्र रूप घेतलं, ताकद गोळा केली.
सेना ही एक स्वतंत्र ताकद तयार होत असतानाच जनता पक्ष नावाची एक शक्ती महाराष्ट्रात आकार घेत होती. पण ती टिकली नाही. जनता पक्षातले समाजवादी संपले, जनसंघ टिकला आणि भाजपत रूपांतरित झाला. भाजप आणि सेना दोघं एकत्र आले. १९९५ पर्यंत, थेट २०१४ पर्यंत भाजप ही देशात फार मोठी ताकद नव्हती, काँग्रेसपेक्षा भाजप लहान होता. सेना आणि भाजप यांना एकत्र नांदणं शक्य झालं. काँग्रेसच्या विरोधात तो दोघं मिळून विकसित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातली पैस सेनेनं व्यापली आणि भाजपला सांभाळून घेतलं. २०१४ मधे मोदी लाटेनं भाजप देशात पहिल्या क्रमांकावर गेला. मुळातली ताकद फार तर पंधरा ते वीस टक्के असताना काँग्रेस विरोध आणि मोदींच्या नेतृत्वाबद्दल आकर्षण या दोन गोष्टींसाठी भाजप ताकदीच्या व्यस्त प्रमाणात सत्तेत पोचला. महाराष्ट्रातलं समीकरण बदललं. आधी सेना नंबर एक आणि भाजप नंबर दोन होता. आता भाजप नंबर एक झाला (देशात). भाजपनं काँग्रेसकडून धडा न घेता आपलं एकहाती वर्चस्व स्थापण्याचा विचार केला. परंतू त्यांना शहाणपण आलं. बहुदा सत्तेनं शिकवलं असावं.
सेना आणि भाजप या दोन स्वतंत्र राजकीय संस्कृती, घटना आहेत.
सेना ही बाळ ठाकरे या व्यक्तीनं उभी केलेली संस्था आहे. ठाकरे यांचं व्यक्तिमत्व सेना या संघटनेत रूपांकित झालं आहे. ठाकरे कोणत्याही विचारधारेत वाढलेले नव्हते. ते एक व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रकार मार्मिक असतो, स्वतंत्र असतो. समाजात घडणाऱ्या घटना अचूक हेरून व्यंगचित्रकार त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. घटनांचं विश्लेषण करून त्यावर संपूर्ण एकात्म पर्याय व्यंगचित्रकार सुचवत नाही. एकादा पुढारी त्याला डुकरासारखा दिसतो, त्या पुढाऱ्याला डुकराचं रूप देऊन त्याच्या शेपटीच्या टोकाला एक गाठ व्यंगचित्रकार मारतो. पर्यायी विचार, कार्यक्रम इत्यादी दीर्घ आणि गुंत्याच्या गोष्टी व्यंगचित्रकार मांडत नाही. व्यंगचित्रकार हा सामान्य माणसासारखा असतो. घडणाऱ्या घटनांना एक तडक, तीव्र, तात्कालीक प्रतिक्रिया तो देतो.ती खरी असते, प्रामाणिक असते. महाराष्ट्रात आणि भारतातल्या घटना आणि प्रवाहांना ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘ देशात समाजावादाची भाषा बोलली गेली, पण विकास झाला नाही. सरकार सेक्युलरिझमची भाषा करे पण मुसलमानांना चोंबाळत असे. महाराष्ट्रात मराठी माणसांचा विकास होत नाही, इतर भाषिकांची मात्र चलती होते. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाचा उदोउदो होत असे पण दंगल केल्याशिवाय कोणतीही गोष्ट धसाला लागत नसे. आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांच्या गोष्टी केल्या जात आणि सर्व पक्ष जातीचं राजकारण करत.’ या गोष्टी सामान्य माणसाला आवडत नसत. परंतू आपली नाराजी व्यक्त करणं त्याला शक्य नव्हतं. सेनेनं नेमकं यावर बोट ठेवलं.या व्यथा राजकीय पक्षांनीच निर्माण केल्या होत्या, पोसल्या होत्या. त्यामुळं सामान्य माणसं सामान्यतः राजकीय पक्षांपासून दूर होती. समाजात एक राजकीय पोकळी तयार झाली होती. बाळ ठाकरे यांनी ती भरून काढली. सामान्य माणसाची ही व्यथा ठाकरे यांनी मांडली. ठोकशाही, राडे, मुसलमान असोत की गुजराती कोणावरही धाडकन टीका, निवडणुकीत जातीचा विचार न करता माणसं उभी करणं, लोकशाही नाही आदेश. लोकांना हे आवडलं. सेना लोकप्रीय झाली.
भाजपचं चरित्र या पेक्षा वेगळं. भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष. दीर्घ इतिहास. रास्व संघ, जनसंघ, जनता पार्टी, भाजप अशी या पक्षाची वाटचाल. सत्तर ऐंशी वर्षाची पार्श्वभूमी. भारत देश ही पक्षाची कर्मभूमी, मतदार संघ. देशातली सगळी माणसं, त्यांच्या जाती, त्यांचे धर्म, त्यांच्या भाषा आणि संस्कृती, त्यांच्या खऱ्या खोट्या अस्मिता, त्यांचे विविध आर्थिक वर्ग, त्यांचं शहाणपण आणि वेडेपण इत्यादी सगळ्या गोष्टींचा तोल सावरत भाजपला राजकारण करावं लागतं. त्यासाठी एक सम्यक एकात्मिक विचारधारा असावी लागते. ती करण्यासाठी खूप खटपट करावी लागते. मग कार्यकर्ते प्रशिक्षित करून तयार करावे लागतात. संघटना बांधावी लागते. म्हणजे केडर तयार करावं लागतं.
हा खटाटोप सुखासुखी नसतो. नाना परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात कारण समाजातल्या सर्व स्तरांना सांभाळून घ्यावं लागतं. गरीबांची भाषा केली की धनवान नाराज होतात. एका जातीचं भलं की दुसरी जात वैतागते. एका राज्यात कारखाना उभारला की दुसरं राज्य वैतागतं. एका धर्माचं कौतुक केलं की दुसरा धर्म वैतागतो. भाजप हा हिंदू धार्जिणा पक्ष आहे. तसं असायलाही हरकत नाही. परंतू एका हद्दीपर्यंतच. त्यामुळं मुसलमानांनाही वरवर किंवा एका हद्दीपर्यंत खुष ठेवावंच लागतं. सर्वांना सांभाळणं, कोणालाही न वगळणं. मध्यम मार्ग. निदान पक्षी सर्वांचं भाजप आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे.

हा खटाटोप सुखासुखी नसतो. नाना परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात कारण समाजातल्या सर्व स्तरांना सांभाळून घ्यावं लागतं. गरीबांची भाषा केली की धनवान नाराज होतात. एका जातीचं भलं की दुसरी जात वैतागते. एका राज्यात कारखाना उभारला की दुसरं राज्य वैतागतं. एका धर्माचं कौतुक केलं की दुसरा धर्म वैतागतो. भाजप हा हिंदू धार्जिणा पक्ष आहे. तसं असायलाही हरकत नाही. परंतू एका हद्दीपर्यंतच. त्यामुळं मुसलमानांनाही वरवर किंवा एका हद्दीपर्यंत खुष ठेवावंच लागतं. सर्वांना सांभाळणं, कोणालाही न वगळणं. मध्यम मार्ग. निदान पक्षी सर्वांचं हित आपण विचारात घेतो असं सर्व लोकांना वाटायला तरी हवं. यातून फार गुंते होतात. फायदे होतात आणि तोटेही होतात. एक फायदा झाला की लगेच दुसरा तोटा. भारतात जात, धर्म, भाषा, वर्ग, संस्कृती, घराणी, जिल्हे, इतिहास असे अनेक कप्पे आहेत. प्रत्येक कप्पा भावनाचिंब असतो. हे सर्व कप्पे सांभाळणं अशक्यच असतं. ते जास्तीत जास्त शक्य करण्याची खटपट करावी लागते. भाजप या राष्ट्रीय पक्षाचं हे चरित्र.
भाजपचं चरित्र आणि सेनेचं चरित्र यातला फरक आता लक्षात यावा. एकात्मिक सम्यक विचारधारा आणि केडर या मुख्य कसोट्यांवर दोन्ही पक्ष दोन टोकांवर आहेत, असणार, ते स्वाभाविक आहे. भारत या देशाचा इतिहास, गुंते, वैविध्य पाहिल्यावर भाजपसारखा देशपातळीवरचा पक्ष असणं आणि सेनेसारखा प्रादेशिक पक्ष असणं या गोष्टी अटळ दिसतात. जात, धर्म, संस्कृती, भाषा, इत्यादी कप्पे संख्येनं कमी कमी होऊन आर्थिक आणि परदेश धोरण या दोन मुद्यांवर येऊन जनता ठेपत नाही तोवर ही रचना अटळ दिसते. तो टप्पा अजून तरी बराच दूर आहे, दृष्टीपथात नाही.
मार्क्सवादी असोत की काँग्रेस, सामान्यतः आपल्या ढोबळ चरित्राशी जुळणाऱ्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन त्यांनाही वाटचाल करावी लागेल.
म्हणूनच भाजप आणि सेनेनं एकत्र येणं, नांदणं आवश्यक आणि अटळ आहे. सेनेला नखं आहेत, दात आहेत, सेना गुरगुरते. वाघाची ती व्यवच्छेदक लक्षणं आहेत. ती नसतील तर वाघ वाघ रहाणार नाही, शेळी होईल. तेव्हां भाजपला या वाघाला वाघच ठेवून त्या सोबत एकत्र नांदायची सवय लावावी लागेल. एकेकाळी काँग्रेसला ही सवय होती. काँग्रेसनं ती गमावली, त्याचा परिणाम काँग्रेस भोगते आहे.
बिहारमधे नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपनं दहा बारा वर्षांचा घरोबा केला. नितीश कुमार यांचा पक्ष भाजपच्या सांस्कृतीक चरित्राशी जुळणारा नसूनही जॉर्ज फर्नांडिस यांच्या कर्तृत्वामुळं जोडी जमली आणि टिकली. नेमकं का बिनसलं ते कळलेलं नाही. खरं म्हणजे बिहारमधे जोडी टिकायला हवी होती. बिहारमधे जे घडलं ते भाजप महाराष्ट्रात कितपत टाळतं ते पहायचं.
सेना भाजप सरकार घडणं यातून काँग्रेसनंही शिकायला हवं. ष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले संबंध दुरावले. आघाडी तुटण्याला आपण नव्हे ते कारणीभूत आहेत असं दोन्ही काँग्रेस म्हणतात. असेलही. दोन्ही पक्षांनी जातीचा हिशोब इतक्या टोकाला नेला की दलित, अल्पसंख्य, मध्यम जाती यांनाही पक्ष दुरावला. मध्यम मार्ग, सर्वांना सांभाळून घेणं ही काँग्रेसची जुनी परंपरा दोन्ही काँग्रेस विसरले. दोन्ही काँग्रेसमधे शरद पवार सीनियर, जास्तीत जास्त अनुभवी. हा माणूस खरं म्हणजे सर्वांना सांभाळून घेणारा आणि खऱ्या काँग्रेस संस्कृतीचा प्रतिनिधी. आपल्या भोवती गणंग गोळा करण्याच्या नादात त्यानीही पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक चांगला काँग्रेसी माणूस आणि जनाधार गमावला. पैसे जमवणारे पुढारी जोपासल्यामुळं खुद्द मराठा जातीतलीही माणसं त्यांच्यापासून दुरावली. पैसा खावा पण त्यात इतर चार माणसांनाही थोडा तरी वाटावा हे शहाणपण पुढारी विसरले. भुजबळ, तटकरे, नाईक, पवार इत्यादी. शरद पवार हा तोल सांभाळणारा आणि शहाणा माणूस. त्यांचा काय घोटाळा झाला कळत नाही. राज्यातल्या सर्व लोकांना बरोबर घेणं सोडाच, काँग्रेस पक्षालाही सोबत ठेवणं त्यांना जमलं नाही.
भाजपनं, भाजप-सेनेनं एक राजकीय वाट निर्माण केली आहे. स्थैर्य आल्यानं युती सरकारला आता कार्यक्रमांची अमलबजावणी करण्याची शक्ती आणि शांतता लाभेल. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. दुष्काळ आहे. पाण्याची टंचाई आणि गैरवाटप आहे. भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळं औद्योगीक वाढ मंदावली आहे. ही आव्हानं युती सरकारला पेलायची आहेत. दोन पक्ष म्हटल्यावर सत्तेची आणि सत्तेमुळं मावा खायची स्पर्धा काही प्रमाणात निर्माण होईल. दोन्ही पक्ष काँग्रेसइतके भ्रष्टाचारी नसले तरी तो दोष दोन्ही पक्षात शिरलेला आहे. तो आटोक्यात आणावा लागेल. धर्म आणि जातीची तेढ वापरून घेण्याचा मोहही कदाचित सत्ताधारी पक्षांना होईल. पण तो टाळला तर बरं.
फडणवीस शहाणे आहेत, विवेकी आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत.त्यांना विधीमंडळ आणि सरकार या दोहोंचा चांगला परिचय आहे. ते निर्णय घेतील आणि अमलातही आणतील अशी आशा बाळगायला जागा आहे. फक्त फार बोलतात येवढंच.
पाहूया
हित आपण विचारात घेतो असं सर्व लोकांना वाटायला तरी हवं. यातून फार गुंते होतात. फायदे होतात आणि तोटेही होतात. एक फायदा झाला की लगेच दुसरा तोटा. भारतात जात, धर्म, भाषा, वर्ग, संस्कृती, घराणी, जिल्हे, इतिहास असे अनेक कप्पे आहेत. प्रत्येक कप्पा भावनाचिंब असतो. हे सर्व कप्पे सांभाळणं अशक्यच असतं. ते जास्तीत जास्त शक्य करण्याची खटपट करावी लागते. भाजप या राष्ट्रीय पक्षाचं हे चरित्र.