पुस्तक. युक्रेन युद्ध, बायडन ट्रंप यांच्यातला बुद्धीबळाचा खेळ
रशियानं २०२२ मधे आक्रमण केल्यानंतर युक्रेननं पहिल्या प्रथम १८ नव्हेंबर २०२४ या दिवशी रशियावर क्षेपणास्त्रं फेकली. क्षेपणास्त्रं आधीच युक्रेनला दिली होती, वापरण्याची परवानगी दिली नव्हती. ती परवानगी मावळते अघ्यक्ष जो बायडन यांनी १७ नव्हेंबरला दिली. १० जानेवारी २०२५ रोजी बायडन यांना अध्यक्षपदाची सूत्रं डोनल्ड ट्रंप यांच्याकडं सोपवायची आहेत. तोवर बायडन यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. या तरतुदीचा फायदा बायडन यांनी घेतलाय. क्षेपणास्त्रं फेकण्याचा निर्णय फार मोठा आहे. अमेरिकेची शेकडो क्षेपणास्त्रं युक्रेनकडं आहेत. रशियाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. रशिया अण्वस्त्रं…