Browsed by
Category: लेख

पुस्तक. सत्यजीत रे यांचे चित्रपट विषयक विचार

पुस्तक. सत्यजीत रे यांचे चित्रपट विषयक विचार

 Our Films, Their Films हा सत्यजीत रे यांचा लेखसंग्रह १९७६ साली प्रथम प्रसिद्ध झाला. त्यामधे त्यांनी लिहिलेले २५ लेख एकत्र करण्यात आले आहेत. लेख आजही वाचावेसे वाटतात.  सत्यजीत रे हा चित्रपटाची सगळी अंगं व्यक्तिशः हाताळणाऱ्या वस्ताद दिक्दर्शकांपैकी एक होता.पटकथा, फोटोग्राफी,संगित, संकलन, पोस्टर्स, दिक्दर्शन, कलादिक्दर्शन ही सगळी अंगं त्यांना अवगत होती,ते लीलया हाताळत असत. प्रत्येक फ्रेममधे रे डोकावतात आणि दृश्य कसं दिसेल ते पहातात, त्यांना योग्य वाटेल तो कोन आणि कॅमेऱ्याची जागा ते नक्की करतात. छायाचित्रकाराला जवळ जवळ कामच नसतं. कलाकार…

Read More Read More

रविवारचा लेख पूर्वजांच्या पुण्याईवर भागत नाही

रविवारचा लेख पूर्वजांच्या पुण्याईवर भागत नाही

जोहानसबर्ग. हाय कोर्टाची इमारत. सुनसान आहे. कोर्ट असूनही वर्दळ नाही. कारण काही दिवसांपासून वीज नाही. वीज नाही म्हणून पाणी नाही. वीज आणि पाणी नाही म्हटल्यावर कोर्टात माणसं कशी टिकणार? किती दिवस ही स्थिती टिकेल ते सांगता येत नाही. कारण वीज केव्हां येईल आणि आली तरी किती दिवस टिकेल ते सांगता येत नाही. द.आफ्रिकेत वीज तयार करणारी आणि वाटण करणारी एकच सरकारी संस्था आहे, खाजगी वीज कंपन्या नाहीत. ही कंपनी तोट्यात आहे. द.आफ्रिकेत कोळसा जाळून वीज तयार होते. वीज तयार करण्याची…

Read More Read More

सिनेमा. ‘खाकी’. बिहारी राजकारण, जात, सरकार.

सिनेमा. ‘खाकी’. बिहारी राजकारण, जात, सरकार.

खाकी. गुन्हे, जात, राजकारण, बिहार. नेटफ्लिक्स. बिहारमधील एका गुन्हेगाराची गोष्ट खाकी या मालिकेत नेटफ्लिक्सवर सादर झालीय. कथानक आणि मालिकेचा वास्तवाशी असलेला संबंध या दोन मुद्द्यावर ती गाजतेय. मालिकेत चंदन महातो नावाचा एक गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर अनेक खून नोंदले गेलेत. पोलिस त्याची कोंडी करून एका गावात त्याला घेरतात. पोलिस त्याला पकडणार इतक्यात इन्सपेक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन येतो. मंत्र्याची आज्ञा असते की चंदनला पकडू नका. निवडणुकीचा मोसम असतो. एका राजकीय पक्षाचा चंदनला पाठिंबा असतो. इथून गोष्ट सुरु होते. गोष्ट मागे जाऊन…

Read More Read More

रविवारचा लेख हवाई टॅक्सी, एक अनावश्यक चंगळ

रविवारचा लेख हवाई टॅक्सी, एक अनावश्यक चंगळ

 दुबाईमधे २०२६ मधे हवाई टॅक्स्या सुरू होणार हे नक्की. हवाई टॅक्सी म्हणजे तीन माणसांना घेऊन हवेत उडणारी टॅक्सी. दुबाईतल्या हॉटेलच्या गच्चीवरून किंवा बागेत तयार केलेल्या हेलेपॅडवरून ही टॅक्सी हवेत झेपावेल आणि विमानतळावर पोचेल. एक चालक आणि तीन प्रवासी इतकी माणसं या टॅक्सीत बसतील.  ही टॅक्सी हेलेकॉप्टरसारखीच असेल. म्हणजे तिला विमानासारख्या धावपट्टीची आवश्यकता नसेल, ती सरळ हवेत झेपावेल.  ती पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल, बॅटरीवर चालणारी असेल. एकदा चार्ज केलेली बॅटरी चाळीस मिनिटं चालेल. या विमानाचे उत्पादक म्हणतात की त्याचा  काहीही आवाज होणार…

Read More Read More

पुस्तक. साम्राज्यांचा उदयास्त

पुस्तक. साम्राज्यांचा उदयास्त

आधुनीक साम्राज्य हा प्रस्तुत पुस्तकाचा मुख्य विषय आहे. साम्राज्यं चालणं, टिकणं, लयाला जाणं यांचा अभ्यास ॲलसडेर रॉबर्ट्स (Alasdair Roberts) यांनी Superstates:  Empires of the 21st Century या पुस्तकात मांडला आहे. एकेकाळी पर्शियन, रोमन, मोर्य, मिंग, ऑटोमन इत्यादी साम्राज्यं होती. ती मोडली आणि देश निर्माण झाले. लेखकाचं म्हणणं आहे की सध्याचे देश (अमेरिका, भारत, चीन) आणि युरोपीय समुदाय ही सुद्धा साम्राज्यांचं रूप घेतील. लेखक त्यांना महाराज्यं, सूपरस्टेट असं म्हणतो. पूर्वीची साम्राज्यं आणि ही महाराज्यं यांची तुलना लेखक प्रस्तुत पुस्तकात लेखक करतो….

Read More Read More

रविवारचा लेख अफगाणिस्तान जगात किती नंबरचा श्रीमंत देश होणार?

रविवारचा लेख अफगाणिस्तान जगात किती नंबरचा श्रीमंत देश होणार?

अफगाणिस्तानातून नेहमी बाहेर येणाऱ्या बातम्या तालिबानच्या अत्याचारी, दहशतवादी, दंडेली वर्तणुकीच्या असतात.  स्त्रियांना घरात डांबलं जातंय; सदाचरण केलं नाही तर फटके मारले जातायत; विरोधकाना तुरुंगात डांबलं जातय; इत्यादी.  अशा अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर औद्योगीक खणती होऊ घातलीय, चीन अफगाणिस्तानात शिरतोय हे आपल्या कानावर फारसं पडत नाही. २००२ साली एक वू नावाचा माणूस नशीब काढायला काबूलमधे पोचला. त्यानं खटपट करून त्या काळातल्या अफगाण सरकारशी संधान बांधून यथावकाश एक पोलाद तयार करण्याचा कारखाना सुरु केला. अफगाणिस्तानमधला पहिला पोलाद कारखाना. भंगारातलं लोखंड वितळवून त्यातून पोलाद…

Read More Read More

सिनेमा ट्रंबो या पटकथालेखकाची गळेचेपी

सिनेमा ट्रंबो या पटकथालेखकाची गळेचेपी

 डाल्टन  ट्रंबो ही २०१५ सालची पोलिटिकल अमेरिकन फिल्म.   डाल्टन ट्रंबो (Trumbo) हा एक अमेरिकन पटकथालेखक होता. त्यानं ४० पटकथा लिहिल्या. काही ग्रेट होत्या. काही साधारण गल्लाभरू होत्या. कायम आनंदस्मरणात राहील अशी रोमन हॉलिडे ही फिल्म ट्रंबोनं लिहिली होती. दुसऱ्याच्या नावानं ती कथा लिहिली गेली आणि त्या दुसऱ्याच्याच नावानं तिला ऑस्कर मिळालं. कारण कम्युनिष्ट असल्याच्या आरोपावरून  सरकारनं त्याच्यावर चित्रपट लिहायला बंदी घातली होती. नंतर त्याच्या ब्रेव वन, स्पार्टाकस आणि एक्झोडस या पटकथांवरचे सिनेमे गाजले. ट्रंबोवर बहिष्कार असताना कर्क डग्लस या…

Read More Read More

 ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?

 ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?

  ओपनहायमर  चित्रपट जगभर सिनेमाघरात प्रदर्शीत झाला. लक्षावधी लोकांनी तो लगोलग पाहिला.  जे रॉबर्ट ओपनहायमर १९०४ साली न्यू यॉर्कमधे सधन घरात जन्मले, ते जन्मानं ज्यू होते. त्यांनी सुरवातीला केमेस्ट्री या विषयाचं  शिक्षण हार्वर्डमधे घेतलं. पण तो विषय त्यांचा नव्हताच. केंब्रीज आणि नंतर गॉटिंजनमधे त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स या फीजिक्सच्या ज्ञानशाखेतलं शिक्षण घेतलं. १९३६ साली ते बर्कले युनिव्हर्सिटीत पदार्थविज्ञान शाखेचे प्रोफेसर झाले. पदार्थविज्ञानातले ऊच्च कोटीचे अभ्यासक आणि प्राध्यापक असा त्यांचा नावलौकिक होता. ओपन हायमर शाळेत गेले, कॉलेजात गेले,पीएचडी झाले, बर्कलेत प्राध्यापक झाले….

Read More Read More

पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं

पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं

देशांच्या, समाजांच्या काही खाचा अवघड असतात ज्यात पडायला देश तयार होत नाही. कारण त्या खाचेतल्या अंधारात खोलवर गेलं तर देशाचं लाज वाटावं असं वागणं प्रकाशमान होतं. ❖  २३ जुलै १९४५ ची दुपार. मरणाच्या उकाड्यात पॅरिसमधल्या हाय कोर्टात मार्शल पेतां यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरु झाला. पेतां हे एकेकाळी फ्रान्सचे सरसेनानी होते, हीरो होते. सामान्यपणे  आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. या खटल्यात मात्र मार्शल पेतां यांना बसण्यासाठी मखमली उशीनं मढवलेलं सिंहासनासारखं आसन देण्यात आलं होतं. त्यांच्यासमोर मखमली उशीनं मढवलेलं एक टेबल ठेवण्यात…

Read More Read More

रविवारचा लेख अमेरिकेचा इसरायलवर दबाव

रविवारचा लेख अमेरिकेचा इसरायलवर दबाव

पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रस्तावित न्यायव्यवस्था सुधारणांना होणारा विरोध पुन्हा एकदा निदर्शनांच्या रुपात उफाळला आहे. ताजं कारण आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं वक्तव्य. जो बायडन नुसतं म्हणाले की ते नेतान्याहू यांना भेटणार आहेत यावर तेल अवीवमधे हजारो लोक रस्त्यावर उतरले. बायडननी नेतान्याहू यांना भेटू नये, त्यांच्यावर कायदेसुधारणा मागे घेण्यासाठी दबाव आणावा असं लोकांचं म्हणणं आहे. न्यायमूर्ती, वकील, प्राध्यापक, लेखक, कलाकार,डॉक्टर्स इत्यादीं हजारोंनी पत्रक प्रसिद्ध करून बायडन भेट घेणार या बद्दल नापसंती व्यक्त केली. प्रकरण येवढ्यावरच थांबलेलं नाही. ३० हजार डॉक्टरनी…

Read More Read More