सिनेमा ‘वध’. वध म्हणा की खून म्हणा. चित्रपट पहाण्यासारखा.
वध. सध्या थरारपटाचा जमाना आहे. गुन्हा. कथानक हळूहळू गुन्ह्याकडं सरकतं. गुन्हा होतो. शेवटी गुन्हा कसा आणि का झाला याची उकल. गुन्ह्याची मिनिटं थराराची. अलकडली पलिकडली मिनिटं गुन्ह्याचा तपशील आणि कारणं सांगणारी. हिचकॉकनं थरारपटाचा फॉर्म्युला दिला. सायको या चित्रपटात एक नॉर्मन आहे. त्यानं त्याच्या आईचा खून केलाय. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वात एक गंड तयार झालाय. नॉर्मन कधी त्याची आई होतो कधी नॉर्मन होतो. जेव्हां नॉर्मन एकाद्या स्त्रीकडं आकर्षित होतो तेव्हां त्याच्या व्यक्तिमत्वातली आई जागी होते आणि ती त्या स्त्रीचा खून करते. दुभंग…