पुस्तक: पहिल्या दिवशी १८ लाख प्रतींचा खप.
Spare. Prince Harry Penguin 400 pages. ।। ब्रिटीश युवराज हॅरी यांचं स्पेअर हे आत्मचरित्र बाजारात पोचलंय. इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकानं या चरित्राचं वर्णन धांगडधिंगा या शब्दात केलंय. घांगडधिंगा करमणूक करतो, बस, तेवढंच. दी इकॉनॉमिस्ट ब्रिटीश असल्यानं त्यांना ब्रिटीश राजा, राजवाडा, राजमुकूट इत्यादी गोष्टी घरच्याच आहेत, परिचित आहेत. त्यांना राजवाड्याबद्दल हॅरीनं घातलेला धांगडधिंगा नवं काही सांगत नाही, पण इतरांना त्यातून काही गोष्टी नव्यानं कळतात, ठसतात. आत्मचरित्र हॅरीनं लिहायला घेतलं तेव्हापासूनच गाजत होतं. हॅरीचं आणि राजाड्याचं वाकडं होतं. हॅरीचा मोठा भाऊ युवराज विल्यम्स याच्याशीही…