Browsed by
Category: लेख

मॅक्रॉन पुन्हा अध्यक्ष होण्याचा अर्थ

मॅक्रॉन पुन्हा अध्यक्ष होण्याचा अर्थ

इमॅन्युअल मॅक्रॉन दुसऱ्यांदा फ्रान्सचे अध्यक्ष झालेत.  सामान्यतः फ्रेच माणसं अध्यक्षाला दुसरी टर्म देत नाहीत, फुटवतात. फ्रेंच माणसांना सतत बदल हवा असतो. त्यांच्या अध्यक्षांकडून भरमसाठ अपेक्षा असतात, त्या कधीच पूर्ण होत नाहीत, लोकं त्यांना हाकलतात. मॅक्रॉन कसे काय टिकले? मॅक्रॉन मुळातच अध्यक्ष झाले ते मध्यममार्गी म्हणून. फ्रान्समधे अती डावे आणि अती उजवे असे पक्ष होते. लोकमतंही विभागलेलं होतं. डावे, उजवे, मध्यम मार्गी अशा विचारांची माणसं प्रत्येकी सुमारे वीस ते तेवीस टक्के होती. डाव्या लोकांनी ठरवलं की उजवे लोकं डेंजरस आहेत, तेव्हां…

Read More Read More

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

१६ एप्रिलला अफगाणिस्तानातल्या खोस्त आणि कुनार या गावांच्या परिसरात पाकिस्तानी क्षेपणास्त्रं कोसळली. नागरी वस्तीवर. ४५ माणसं मेली. पाकिस्तानच्या लष्करानं केलेल्या  या हल्ल्याची जबाबदारी मात्र पाकिस्तान लष्करानं घेतली नाही, मौन बाळगलं. दोनच दिवस आधी, म्हणजे १४ एप्रिल रोजी, अफगाणिस्तानातून आलेल्या लोकांनी पाकिस्तानातल्या वझिरीस्तान या विभागात सात पाकिस्तानी सैनिक मारले होते. त्या हल्ल्याचा सूड म्हणून खोस्त-कुनारमधे हल्ला झाला होता. गंमत पहा. खोस्तमधे झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे मोर्चे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा दोन्ही ठिकाणी निघाले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातल्या गुंतागुंतीच्या संबंधांतलं हे एक प्रकरण…

Read More Read More

मस्कमस्ती

मस्कमस्ती

ईलॉन मस्कनी ट्विटर या कंपनीचे ९.२ टक्के शेअर्स ३ अब्ज डॉलर खर्च करून ताब्यात घेतले. म्हणजे ते लवकरच आणखीही शेअर्स घेऊन कंपनीत धिंगाणा घालणार हे उघड होतं. म्हणूनच कंपनीनं त्यांनी १४.९ टक्के शेअर्स घेऊन निर्णायक मालक होऊ नये असं बंधन घातलं. बहुदा ते बंधन त्यानी मान्य केल्यामुळंच कंपनीनं त्याना शेअर्स देऊ केले. आता मस्क म्हणतातेत की शेअरं घेताना मान्य केलेली ती अट ते धुडकावू शकतील. म्हणजेच ते अधिक शेअर्स घेऊन कंपनीवर ताबा मिळवू शकतील. निर्णायक भांडवल ताब्यात घेणं ही गोष्ट…

Read More Read More

लंका संकटात

लंका संकटात

लंकेत सोन्याच्या विटा होत्या असं म्हणतात. तेव्हां लंका रावणाच्या मालकीची होती आणि बहुदा रावण लंकेची अर्थव्यवस्था बरी चालवत असावा. गेले सहा एक महिने सोन्याच्या विटा सोडा घरं बांधायला साध्या विटा घ्यायचीही कुवत लंकेच्या माणसात उरलेली नाही. लंकेत महागाई कायच्या काय वाढलीय. सर्व किमती दुप्पटीपेक्षा वाढल्यात. दुकानात तांदूळ नाही. औषधांच्या दुकानात औषधं मिळत नाहीत, जी काही मिळतात त्यांची किमत पटीत वाढली आहे. पेट्रोलच्या, गॅसच्या किमती कायच्या काय वाढल्या तर आहेतच पण पेट्रोल गॅस मिळतच नाहीये. ग्राहक तासनतास रांगेत उभे आहेत, कार…

Read More Read More

रशियावरचे आर्थिक निर्बंध. किती परिणामकारक?

रशियावरचे आर्थिक निर्बंध. किती परिणामकारक?

निर्बंध (सँक्शन्स) कितपत  प्रभावी असतात? युक्रेनमधे रशियानं सैन्य घुसवल्यावर अमेरिका आणि युरोपातल्या देशांनी रशियावर निर्बंध लादले. काही रशियन बँकांशी व्यवहार बंद केले, काही कंपन्यांशी व्यवहार बंद केले, काही बँक खाती गोठवली, काही पुढाऱ्यांना अमेरिका-युरोपात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला.  खरं म्हणजे यातले बरेच निर्बंध अमेरिकायुरोपनं २०१४ सालीच रशियावर लादले होते. कारण त्या साली रशियानं क्रीमिया हा युक्रेनचा भाग गिळला, रशियन फेडरेशनमधे सामिल करून घेतला. २०१४ च्या निर्बंधांचा काहीही परिणाम रशियावर झाला नाही. २७ फेब्रुवारी २०२२ पासून निर्बंध लादल्याला आता एक महिना…

Read More Read More

मोदी झोपा काढत नाहीत

मोदी झोपा काढत नाहीत

कोल्हापुरच्या चंद्रकांत पाटील यानीच काढलाय हा विषय. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे आमदार. पाटील म्हणाले की नरेंद्र मोदी दोन तास झोपतात. पाटिलबुवांना कळलंय की मोदींनी चोविस तास झोपेशिवाय रहाण्याचा प्रयोग आरंभलाय. म्हणजे उरली सुरली दोन तासाची झोपही ते भविष्यात कटाप करणार आहेत. हे सारं मोदी कां करत आहेत तर  त्यांना हिंदुंचा देश  स्थापन करायचाय. या आधी दोनच वेळा हिंदूंचा देश होता, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्या काळात. आता पुन्यांदा मोदी हिंदूंचा देश तयार करणार आहेत. त्यासाठी २०२४ निवडणुक त्यांना जिंकायची आहे असंही पाटिलबुवा…

Read More Read More

दांडगाई की सबुरी ? युक्रेनी घडामोडी आणि रशिया चीन संबंध.

दांडगाई की सबुरी ? युक्रेनी घडामोडी आणि रशिया चीन संबंध.

युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय? चीन आणि रशियाचे संबंध कसे आहेत? किती घनिष्ट आहेत? दोघांमधलं सहकार्य कोणत्या प्रकारचं असेल आणि किती टोकाचं असेल? असे प्रश्न रशियाच्या युक्रेन आक्रमणाला तीन आठवडे होत असताना चर्चेमधे आले आहेत.   युक्रेन आक्रमण सुरु होण्याच्या आधी तीन आठवडे पुतीन आणि सी जिनपिंग यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. हिवाळी ऑलिंपिकला भेट देण्याचं निमित्त पुतीन यांनी साधलं होतं. तेव्हां पुतीन यांनी युक्रेनच्या हद्दीवर सैन्य नेऊन ठेवलं होतं आणि युक्रेनवर कारवाई करणार आहोत असं सांगायला सुरवात केली होती. त्या…

Read More Read More

पाशवी शक्तीसमोर युक्रेन अजून टिकून आहे

पाशवी शक्तीसमोर युक्रेन अजून टिकून आहे

 काय होणार युक्रेनचं? आज रशियाची युक्रेनस्वारी १४ दिवस झालेत. युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. २४ फेब्रुवारीला रशियाच्या दबा धरून बसलेल्या फौजा युक्रेनमधे घुसल्या. नेमक्या किती ते सांगता येत नाही. कारण पुतीन हा एक नंबरचा फेकू माणूस आहे. खोट्या बातम्या पसरवणं, अपप्रचार करणं, कुभांड रचणं ही केजीबीत असताना अंगी बाणवलेली कला पुतीन वापरत आहेत.  दीड लाख म्हणतात  या दीड लाखात सुमारे ७० हजार आहेत राखीव जवान, म्हणजे सक्तीनं भरती केलेले तरूण. त्यांना युद्धाचा काहीही अनुभव नाही. काही आठवड्यांच्या जुजबी प्रशिक्षणानंतर त्यांना गणवेष घालून…

Read More Read More

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं काय होणार ?

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं काय होणार ?

भारतीय विद्यार्थी वीस पंचवीस किमी अंतर बर्फ तुडवत युक्रेनमधून पोलंडच्या सरहद्दीवर गेले. त्यांना भारतात परतायचं होतं. भारत सरकारनं त्यांना सल्ला दिला होता की त्यानी कसंही करून पोलिश हद्दीपर्यंत पोचावं, तिथून त्यांना भारतात आणायची सोय केली जाईल. विद्यार्थी हद्दीपर्यंत पोचले. तिथं हद्दीवरचा चेक नाका होता. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं. सांगितलं की आम्ही प्रथम आमच्या नागरिकांना जाऊ देतो, नंतरच तुमचा नंबर लागेल. ढकला ढकली होत होत कसा तरी नंबर लागला. एका  भारतीय विद्यार्थ्यानं त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याची कहाणी सांगितली. म्हणाला की…

Read More Read More

युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.

युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.

पुतीन काल परवापर्यंत भांडं लपवून ताक मागत होते. आता त्यांनी लपवलेलं भांडं पुढं केलं आहे. रशियन ड्यूमामधे (लोकसभा)   त्यानी तासभर भाषण केलं आणि युक्रेनवर हल्ला करायची परवानगी मागितली. भाषणात पुतीन म्हणाले की युक्रेन हा रशियाचा सांस्कृतीक, राजकीय, ऐतिहासिक भाग आहे, तो रशियापासून वेगळा केलेला आम्ही सहन करणार नाही, आम्ही युक्रेनवर ताबा मिळवणार. युक्रेन आमचाच आहे आणि तो आम्ही ताब्यात घेणार असं पुतीन यांचं अगदी स्वच्छ म्हणणं होतं. रशियन लोकसभा ही पुतीन यांची खाजगी मालमत्ता आहे. तिथं पुतीन जे बोलतील त्याला होय…

Read More Read More