देशात जन्मलेले नागरीक रातोरात देशद्रोही ठरवले जातात…
अमेरिकेतल्या जपानी नागरिकांना अमेरिकेनं देशद्रोही ठरवून चार वर्षं तुरुंगात लोटलं होतं त्याला कालच्या डिसेंबरमधे ८० वर्षं झाली. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपाननं पर्ल हार्बर या बंदरातल्या अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला केला. जपान, अमेरिका युद्ध सुरु झालं. अमेरिकन सरकारनं लगोलग अमेरिकेत रहाणाऱ्या तमाम जपानी लोकांना देशद्रोही म्हणून जाहीर करून टाकलं. पर्ल हार्बर हे अमेरिकेच्या अधिपत्याखालच्या हवाई बेटांमधील एक बेट. हवाई बेटं आपलीच आहेत असा जपानचा दावा होता. १९४० च्या आधीची दहा वर्षं जपान आपलं साम्राज्य चीन, इंडोचीन, इंडोनेशिया, फिलीपीन्स इत्यादी विभागात…