उपासमार आणि दुष्काळ. सत्ताखटपटीचा परिणाम.
इथियोपियात आठ प्रांत किंवा राज्यं आहेत. इथियोपियात ओरोमो,अम्हारा,सोमाली,टिग्रे इत्यादी आठ प्रमुख संस्कृती आहेत.प्रत्येक संस्कृतीची एक स्वतंत्र भाषा आहे, अनेक बोली भाषा आहेत. तीन ख्रिस्ती पंथ, दोन इस्लामी पंथ आणि अनेक स्थानिक उपासनापद्धती आहेत. शेकडो वर्ष अशा अनेक ओळखीचं मिश्रण असलेल्या ओळखी, इथियोपिया या भूप्रदेशात, अनेक राज्यं आणि साम्राज्यांचा भाग म्हणून, एकत्र नांदत आहेत. ।। टिग्रे. इथियोपियातला एक प्रांत, एक राज्य. सध्या तिथं लाखो मुलं कुपोषित आहेत, लाखो माणसं उपाशी आणि तहानलेली आहेत. त्यांना अन्न, पाणी,औषधं उपलब्ध होत नाहीयेत. वस्तू बाजारातून गायब आहेत,…
भीषण सत्ताकारण.
काबूल विमानतळावर दोन स्फोट झाले. त्यात साठेक माणसं मेली आणि सुमारे दीडशे जखमी झाली. काबूल विमानतळाच्या आसपास हजारो माणसं देशाबाहेर जाण्याच्या खटपटीत गोळा झाली होती, विमानतळावर प्रवेश मिळेल, विमानात प्रवेश मिळेल, स्थलांतरीत होता येईल या आशेनं. याच गर्दीत एक अब्दुल नावाचा माणूस होता. दूरच्या हेलमांड प्रांतातून तो चंबुगवाळं आवरून काबूलमधे पोचला होता. त्याच्याकडं कागदपत्रं होती. गेली आठेक वर्षं तो ब्रिटीश फौजांना मदत करत असे. त्याचं काम असं. दरी,पश्तू भाषेतील कागदपत्रं आणि संभाषणं अनुवादून ब्रिटीश फौजाना, अफगाण सैनिक व पोलिसांना सांगणं. अब्दुल स्थानिक असल्यानं त्याला…
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानमधील घडामोडींचं विश्लेषण. https://youtu.be/CH3MfKm__1Q
अफगाणिस्तान अधांतरी
तालिबाननं अफगाणिस्तानची सूत्रं अधिकृतपणे हाती घेतली आहेत. तालिबानच्या प्रवक्त्यांनी, प्रतिनिधींनी, काबूलमधे पत्रकार परिषद घेऊन इस्लामी अमिरात स्थापन झाल्याचं जाहीर केलंय. पत्रकार परिषदेत अफगाण आणि जगातल्या इतर देशातल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना तालिबाननं म्हटलंय ते असं : स्त्रियांना शिक्षण आणि काम करण्याचं स्वातंत्र्य राहील, पत्रकारांना स्वातंत्र्य राहील, विरोधक आणि एनजीओना सूडानं वागवलं जाणार नाही, तरूणांची देशाला गरज आहे त्यांनी देश सोडून न जाता देशाच्या विकासाला हातभार लावावा, दहशतवादी गटाना अफगाणिस्तानात काम करू दिलं जाणार नाही. अर्थात शरीया आणि इस्लामच्या चौकटीत. शरीयाचा अर्थ तालिबान…
तालिबानचा ताबा
६५ टक्के अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. काबूल, कंदाहार, मझारे शरीफ अशी मोजकी मोठी शहरं फक्त सरकारच्या ताब्यात आहेत. अमेरिकन फौजा माघारी गेल्या आहेत. शहरं ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिका तालिबानच्या अड्ड्यांवर हल्ले करत आहे. कतारच्या तळावरून आणि अरबी समुद्रातल्या विमानवाहू जहाजांवरून विमानं उड्डाण करतात, अफगाणिस्तानात हल्ले करून परततात. बाँब आणि रॉकेटं टाकू शकणारी हेलीविमानं आणि ड्रोन हे हल्ले करतात. महिना दोन महिन्यात काबूलसह इतर शहरं तालिबानच्या हातात पडतील आणि देशावर ताबा मिळाल्याचं तालिबान जाहीर करेल. तालिबान आणि सरकार यांच्यात युद्ध चाललं असताना…
चौकीदारच चोर असल्यावर गुन्हा शाबीत कसा होणार?
एक वर्ष झालं. बैरूटमधे स्फोट झाल्याला. स्फोटाला कोण जबाबदार आहे ते अजून न्यायालयानं सांगितलेलं नाही. काही दिवसात तपास करून जबाबदार माणसाना शिक्षा केली जाईल असं सांगितलं गेलं होतं त्याला आता वर्ष होत आलंय. बैरूट गोदीतल्या एका गोदामातल्या २७०० टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट ४ ऑगस्ट २०२० रोजी झाला. गोदामाची स्थिती वाईट होती. अमोनियम नायट्रेटचा स्फोट होऊ नये यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था गोदामात नव्हती. २०१४ साली अमोनियम नायट्रेटची पोती गोदामात येऊन पडली त्या दिवसापासून गोदीतले अधिकारी सांगत होते की स्थिती वाईट आहे, पोती गोदामातून…
पेगॅसस. अर्थ, अनर्थ.
पेगॅससनं जगभर गोंधळ माजवलाय. हेरगिरी करणारं हे सॉफ्टवेअर आपण विकत घेतलंय की नाही, त्याचा वापर आपण करतोय की नाही ते सांगायला भारत सरकार तयार नाहीये. अमेरिकन संसद या सॉफ्टवेअरवर बंदी घालायचा विचार करतेय. एनएसओ या कंपनीचं हे सॉफ्टवेअर सध्या जगातले काही देश आणि देशप्रमुख आपले विरोधक आणि लोकशाही खतम करण्यासाठी वापरत आहेत. काय आहे हे पेगॅसस? पेगॅसस हे एक स्पायवेअर आहे, एक हेरगिरी करणारं सॉफ्टवेअर आहे. सरकारं ते विकत घेतात. सरकार त्या सॉफ्टवेअरचा वापर करून एक मेसेज नागरिकाच्या फोनवर, व्हॉट्सअपवर,…
अफगाणिस्तान. अराजक आकार घेतंय.
राष्ट्रपती भवनाच्या मैदानात राष्ट्रपती अश्रफ घनी ईदची प्रार्थना करत होते. शेदोनेशे माणसं साताठ रांगा करून उभी रहात होती, गुढग्यावर बसत होती. समोर एक मुल्ला लाऊड स्पीकरवर ‘ अल्ला ‘ हो अकबर म्हणत होता. स्फोटाचा आवाज झाला. नमाज करणारी माणसं काहीच न झाल्यासारखी गुडघ्यावर बसली. दोघे जण सुटात होते, त्यांनी रिव्हॉल्वर काढली आणि ते बाहेर पडले. एक माणूस सलवार खमीज आणि जाकीट घातलेला होता. तो गोंधळला. चारी बाजूला पाहिलं. बाकीची मंडळी गुडघ्यावर होती, हा मात्र उभाच होता. पुन्हा स्फोट झाला. नमाजी शांत. आता सेक्युरिटीचे आणखी लोक…
पंतप्रधानांच्या खोटारडेपणाचा लेखाजोखा
The Assault on Truth: Boris Johnson, Donald Trump and the Emergence of a New Moral Barbarism. The Rise of Political Lying. By Peter Oborne. # प्रस्तुत पुस्तकांचे लेखक पीटर ओबोर्न ब्रिटीश पत्रकार आहेत. ब्रीटनमधल्या प्रमुख पेपरात त्यांनी ३० वर्षं बातमीदारी केलीय. १० डाऊनिंग स्ट्रीट आणि व्हाईट हॉल या बीटवर ते राजकीय बातम्या गोळा करत असत. त्यांचे पत्रकारीतले पहिले सहकारी आणि काहीसे गुरु म्हणजे बोरीस जॉन्सन. जॉन्सन यांच्या व्यक्तिमत्वानं आणि पत्रकारीनं ते प्रभावित झाले होते. जॉन्सन यांच्या संपादकत्वाखाली स्पेक्टेटर या पेपरात ओबोर्न…