Browsed by
Category: लेख

वसंत वाचनालय, टिकून आहे.

वसंत वाचनालय, टिकून आहे.

मुंबईत, शिवाजी पार्क मैदानापासून एक गल्ली सोडून दुसऱ्या समांतर गल्लीच्या तोंडाशी वसंत वाचनालय आहे. वाचनालयातून बारे पडून काही पावलं गेलं की समोर सेनाभवनावरचं बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य चित्र दिसतं. वसंत वाचनालय   १९५८ साली स्थापन झालं.  वसंतराव सावकर यांची चालवलेलं ते खाजगी वाचनालय आहे.  आज म्हणजे दोन हजार एकवीस सालाच्या मार्च महिन्यात तिथं गेलं तर शाळकरी मुलं, तरूण, वयस्क  दाटीवाटीनं उभं राहून पुस्तकं चाळतांना दिसतात.   पलिकडच्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलेल्या वयस्कांची चर्चा ओझरती ऐकलीत तरी त्यात अलीकडं वाचन संपलेलं…

Read More Read More

बँकांचं खाजगीकरण. सध्या नको.

बँकांचं खाजगीकरण. सध्या नको.

खाजगीकरण. तत्व, व्यवहार, वास्तव.  अर्थमंत्री सीतारमण यांनी अंदाजपत्रकावरच्या भाषणात दोन सार्वजनिक बँका खाजगी केल्या जातील असं सूचित केलं.  वरील निर्णय रीझर्व बँकेच्या अंतर्गत कार्यकारी गटानं दिलेल्या अहवालावर आधारलेला आहे. बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं १२ जून २०२० रोजी कार्यकारी गट नेमला. गटानं २६ ऑक्टोबर २०२० रोजी फक्त चार महिन्यात शिफारसपत्र सरकारला सादर केलं. गटानं या अहवालावर लोकांना मतं कळवण्यासाठीे फक्त दोन महिने दिले.  गटाच्या शिफारशीवर संसदेत, विधानसभांत, वर्तमानपत्रांत चर्चा झाली नाही. काही कामगार संघटना आणि रघुराम राजन यांच्यासारखी व्यक्ती अशा…

Read More Read More

संकटग्रस्त ग्रंथालय

संकटग्रस्त ग्रंथालय

ग्रंथालयं कमी होत आहेत? बॉडेलियन ग्रंथालय ऑक्सफर्ड विश्वशाळेच्या प्रांगणात एका प्रशस्त दालनात १३०२ साली सुरू झालं. वर्गांच्या जवळच, विश्वशाळेच्या मधोमध हे दालन होतं.  सुरवातीला या ग्रंथालयातली पुस्तकं साखळीनं बांधलेली असत. साखळी इतकी लांब असे की पुस्तक कपाटापासून दूर नेऊन वाचता येत असे.  पुस्तक साखळीत अडकलेलं असल्यानं वाचक ते बाहेर नेऊ शकत नसे. पाचव्या हेन्रीचा भाऊ ड्यूक ऑफ ग्लूस्टरनं त्याच्याजवळची पुस्तकं आणि हस्तलिखितं या ग्रंथालयाला दिली. राजानं लक्ष घातलं, १० वर्षांच्या बांधकामानंतर १४८८ साली मोठी इमारत उभी राहिली.  १५५० मधे इग्लंडमधे…

Read More Read More

हाडांची गोष्ट

हाडांची गोष्ट

हाडं बोलतात, सू ब्लॅकना ते ऐकू येतं. ।।  WRITTEN IN BONE : HIDDEN STORIES WE LEAVE BEHIND  Sue Black. Doubleday. काही तर खणत असताना समजा तुम्हाला एकादं हाड मिळालं. त्यावरुन तुम्हाला काय बोध होईल?  मुळात हे हाड कोणत्या प्राण्याचं आणि प्राण्याच्या शरीरातलही कुठल्या भागाचं इथून सुरवात. तुम्ही खाटीक असाल तर कदाचित तुम्हाला समजेल किंवा अस्थीशास्त्र शिकवत असाल तरीही कदाचित समजेल. पण यातलं कोणाही नसाल तर?  श्रीम सू ब्लॅक यांचं WRITTEN IN BONE : HIDDEN STORIES WE LEAVE BEHIND हे पुस्तक…

Read More Read More

‘ सर ‘ एक चांगली फिल्म

‘ सर ‘ एक चांगली फिल्म

सर ही फिल्म २०१८ साली तयार झाली होती, आता ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालीय. रत्ना आणि आश्विन अशा दोघांमधल्या संबंधांची ही गोष्ट आहे.  आश्विन या एका श्रीमंत तरूणाच्या घरी रत्ना मोलरीण म्हणून कामाला लागते. रत्ना गावाकडून आलेली, आश्विन न्यू यॉर्क-मुंबईवाला. चित्रपटाच्या सुरवातीला आश्विन हा रत्नाचा सर असतो, चित्रपट संपता संपता तो रत्नाचा आश्विन होतो. अगदीच भिन्न परिस्थितीत वाढलेल्या दोन  व्यक्ती एकजीव होण्याचा प्रवास चित्रपटात आहे. चित्रपटाचा विशेष असा की त्यात दृश्याला, दिसण्याला महत्व आहे. ऐकणं कमी आहे. रत्ना आणि आश्विन यांच्यातले…

Read More Read More

झटपट व्हिस्की

झटपट व्हिस्की

झटपट व्हिस्की आता झटपट व्हिस्क्या बाजारात येत आहेत. काही तासात व्हिस्की तयार होईल आणि बाटलीबंद होऊन ग्लासांपर्यंत पोचेल. साधारण व्हिस्की तयार व्हायला तीन वर्षं लागतात. जातीवंत व्हिस्की पंधरा ते सत्तर वर्षात तयार होते. ओक वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या पिंपात व्हिस्की साठवली जाते. लाकूड आणि व्हिस्की यांच्यात वेगवेगळ्या तापमानात रासायनीक घटकांची देवाण घेवाण होते. व्हिस्की लाकडात जाते, लाकूड व्हिस्कीत जातं. फार सावकाशीनं ही प्रक्रिया पार पडते.अनेक उन्हाळे आणि हिवाळे ही व्हिस्की पहाते. व्हिस्की फर्मेंट करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्या पाण्यालाही…

Read More Read More

तुकारामाचे अभंग तरले याचा अर्थ…..

तुकारामाचे अभंग तरले याचा अर्थ…..

दोन वेळा बेचिराख झालेलं ग्रंथालय. जर्मनीतला नाझी काळ हा जर्मनीतला सर्वात भयानक काळ मानता येईल. हिटलर सांगेल ते खरं असं जर्मन माणसानी मानलं. शुद्ध आर्य जर्मन रक्त, ज्यू अशुद्ध आणि वाईट, डावे आणि समलिंगी जर्मनद्रोही, माणसावर प्रयोग करून एक नवीन मानवी वंश जन्माला घालता येतो, अशुद्ध लोकांना मारून टाकायचं इत्याजदी अवैज्ञानिक, क्रूर, अमानुष हिटलरी कल्पना जर्मन लोकांनी मान्य केल्या. हिटलर सांगेल तेच ज्ञान असं जर्मन जनतेनं ठरवलं आणि इतर सारं ज्ञान जर्मनविरोधी असं ठरवून विद्यापीठं, पुस्तकं नाझींनी नष्ट करायचा विडाच…

Read More Read More

“सांस्कृतीक” क्रौर्य

“सांस्कृतीक” क्रौर्य

यांग जिशेंग यांच्या  World Turned Upside Down या  नव्या  पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे.  माओच्या राजकीय जीवनात तीन मोठी पर्वं झाली. पहिलं पर्व लाँग मार्च. या काळात माओनं कम्युनिष्ट पार्टी चीनमधे रुजवली आणि यथावकाश माओ सत्ताधारी झाला.  दुसरं पर्व आकाशउडीचं, झटपट आर्थिक विकासाचा प्रयत्न. माओचं डोकं अजबच म्हणायचं. चिनी समाज माओला पूर्ण बदलायचा होता. बदल चुटकीसरशी होऊ शकतात असं माओला वाटत असावं. त्यामुळं दुसऱ्या पर्वात माओनं…

Read More Read More

गाढव समाज नष्ट होणार? इटालियन वडापाव, २७ वा जेम्स बाँड, अरब स्प्रिंग

गाढव समाज नष्ट होणार? इटालियन वडापाव, २७ वा जेम्स बाँड, अरब स्प्रिंग

हां हां म्हणता अरब स्प्रिंगला १० वर्ष झाली.  ट्युनिशियात २०१० च्या डिसेंबर महिन्यात बौझिझी या तरुणानं स्वतःला जाळून घेतलं.  तो फेरीवाला होता. गाडीवर फळं विकत फिरत असे. कुठंही गाडा उभा केला की पोलीस लाच मागत. दररोजची लाच आणि उत्पन्न यात मेळ बसेनासा झाला. संध्याकाळी घरी परतल्यावर आठ माणसांच्या पोटात पुरेसं अन्न घालायला त्याच्याजवळ पैसे उरलेले नसत. शेवटी कंटाळून त्यानं सरकारी कार्यालयासमोर स्वतःला जाळून घेतलं.  बातमी देशभर पसरली. तरूण रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान बेन अली यांचा राजीनामा मागितला. बेन अलीनी पोलिसी…

Read More Read More

ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.

ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.

फेरफटका ४ ।। डोनल्ड ट्रंप चोरट्यासारखे व्हाईट हाऊस सोडून गेले. जाण्यापूर्वी त्यानी निवडून आलेले जो बायडन यांची भेट घेतली नाही, त्यांना शुभचिंतन केलं नाही. व्हाईट हाऊस सोडायच्या आधी सामानाची बांधाबांध करत असताना ते गुन्हेगारांसाठी माफीपत्रं तयार करत होते. एकूण सुमारे १७५ लोकांना त्यांनी माफी दिली. बहुतेक सर्वांनी फ्रॉड, सार्वजनिक पैशाचा गैरवापर, कर चुकवणं,सत्तेचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचे फौजदारी गुन्हे केले होते. एक उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्टीव बॅनन या ट्रंप यांच्या सहकाऱ्यावर मेक्सको भिंत बांधणं या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप…

Read More Read More