Browsed by
Category: लेख

इस्रायल-लेबनॉन तणाव

इस्रायल-लेबनॉन तणाव

 गोलन हाईट्स या इसरायली विभागात, मजदाल शाम्स या शहरात, सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी एक रॉकेट कोसळलं. शहराच्या दाटीवाटीच्या वस्तीत असलेल्या खेळाच्या मैदानात. मुलं खेळत होती.  रॉकेट येताय असं सांगणारा सायरन वाजला. सायरन वाजला की पळायचं, सुरक्षित ठिकाणाचा आश्रय घ्यायचा हे मुलांना माहित होतं. मुलं साधारणपणे १० ते १६ वर्षं या वयोगटातली होती. मैदानाला तीन पुरुष उंचीचं जाळीचं कुंपण होतं. त्यातून बाहेर पडून जवळ असलेल्या इमारतींमधे जावं लागणार होतं. काही मिनिटं सहज लागली असती.काही मुलांनी पळायची तयारी केली. काही मुलं…

Read More Read More

सिनेमा. फास्टेस्ट इंडियन

सिनेमा. फास्टेस्ट इंडियन

दी वर्ल्ड्स फास्टेट इंडियन.(२००५) न्यू झीलंडचा चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर आता दिसतोय. वेग हाच देव आहे असं मानणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. खेळ चित्रपट अशी चित्रपटांची एक वर्गवारी अलीकडं केली जाते. भाग मिल्खा भाग चित्रपटात मिल्खा सिंग हा धावपटू दिसतो. एम एस धोनीमधे धोनी दिसतो. मेरी कोम मधे मेरी कोम दिसते. खऱ्या खुऱ्या खेळाडूनं यश मिळवण्यासाठी कसकशी धडपड केली ते चित्रपटात दाखवलंय. एका परीनं ते कौतुक चित्रपट आहेत आणि ते ते खेळाडू नक्कीच कौतुकास प्राप्त आहेत. फास्टेस्ट इंडियन चित्रपटाचा नायक बर्ट मन्रो…

Read More Read More

बांगला देश कसा वाचेल?

बांगला देश कसा वाचेल?

महंमद युनुस बांगला देशाचे अंतरीम कारभारी पंतप्रधान झाले आहेत. आंदोलकांनी आग्रह धरल्यानं त्यांनी देश चालवायची जबाबदारी घेतलीय.  शेख हसीना यांच्या १५ वर्षाच्या भ्रष्ट कारकीर्दीला कंटाळून तरूणांनी आंदोलन केलं. आंदोलनात ३०० पेक्षा अधिक माणसांचा बळी गेला. ३ हजार नोकऱ्यांसाठी ४ लाख तरूणांना अर्ज करावे लागावे यावरून बांगला देशची अवस्था काय होती ते स्पष्ट होतंय. सत्ताधारी अवामी लीग हा पक्ष आणि पक्षाची युवक शाखा यांनी (त्यांच्या गुंडगिरीनं ) देशाचा ताबाच घेतला होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तेव्हां मागं अवामी लीग युवा शाखेचे गुंड…

Read More Read More

ब्लर्ब. सजीव निर्जीवांचं नामकरण करणारा वैज्ञानिक.

ब्लर्ब. सजीव निर्जीवांचं नामकरण करणारा वैज्ञानिक.

कार्ल लिनियस   पुस्तक : The Man Who Organised Nature: The Life of Linnaeus (२०२३) मूळ लेखक  Gunnar Broberg (२०१९).  भाषांतर   Anna Paterson (२०२३)प्रकाशक Princeton.  पानं ४८४. ।। कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या वनस्पती शास्त्रज्ञाचं हे चरित्र आहे. चरित्र व्यक्तीचं आणि कार्याचंही आहे.  जगात २०२० सालापर्यंत ३.१ लाख वनस्पती आणि जीवांची नोंद झालेली आहे. दर वर्षी सुमारे २५०० नव्या वनस्पती/जीव शोधले जातात, त्यांना नावं दिली जातात. शोध न लागलेल्या अजून किती वनस्पती/जीव आहेत ते माहित नाही. वनस्पती/जीवाना नाव द्यायला सुरवात…

Read More Read More

प्रिन्स पुतळा

प्रिन्स पुतळा

आपल्याला प्रिन्स फिलिप माहितच आहेत. राणी एलिझाबेथ यांचे पती. ते १९७७ ते २०११ येवढा काळ केंब्रिज युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर होते. तर त्यांच्या स्मरणार्थ केंब्रिज पालिकेनं एक पुतळा करून शहराच्या एका मोक्याच्या जागी बसवायचं ठरवलं. तसा ठराव झाला, उरुग्वेतले एक शिल्पकार पाब्लो एच्युगेरी यांना कंत्राट दिलं. १.५० लाख पाऊंड मेहेनताना देण्यात आला. २०१४ साली पुतळा चौकात बसवण्यात आला. पुतळा केंब्रिजमधे पोचला आणि बसवण्यात आला तेव्हांच केंब्रीज पालिकेचा कला या विभागाचा अधिकरी नाराज होता. त्यानं नोंद केली की  या पुतळ्याचा दर्जा चांगला नाहीये,…

Read More Read More

इराण. काटेरी मुकूट, काटेरी सिंहासन

इराण. काटेरी मुकूट, काटेरी सिंहासन

इराणचे ताजे अध्यक्ष मसूद पेझेशक्यान यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतली त्याच दिवशी, काही तासानी इस्माईल हानिये या हमासच्या नेत्याचा तेहरानमधे खून झाला. हानिये पेझेशक्यान यांच्या अध्यक्षपदाच्या जाहीर सभेत हजर होते. हानिये पेझेशक्यान यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठीच तेहरानमधे पोचले होते. अत्यंत कडेकोट सुरक्षित जागी ते रहात होते त्या गेस्ट हाऊसमधे इसरायलनं ठेवलेल्या टाईम बाँबनं हानिये यांचा जीव घेतला. अध्यक्षपदाचा मुकूटच नव्हे तर खुर्चीही काट्यानं भरलेली आहे याची कल्पना पेझेशक्यान याना आली असावी. #  पेझेशक्यान यांच्याकडून जगाच्या आणि खुद्द इराणच्या खूप अपेक्षा आहेत.  पेझेशक्यान…

Read More Read More

भ्रष्ट सत्तेचा अंत: बांगला देश

भ्रष्ट सत्तेचा अंत: बांगला देश

बांगला देशाच्या पंतप्रधान  शेख हसीना यानी राजीनामा दिलाय, त्या देश सोडून पळून गेल्यात.  बांगला देशातल्या विद्यार्थी आंदोलनात २५० पेक्षा अधीक माणसं पोलिसांच्या गोळ्याना बळी पडली आहेत. ६० हजार माणसं तुरुंगात पोचली आहेत. ढाक्क्याच्या उपनगरात अनेक विद्यापीठं आहेत. अमेरिकेत एकाद्या विश्वशाळेचा पसारा येवढा असतो की ते सारं गाव विश्वशाळेचं असतं. तसंच काहीसं ढाक्क्याच्या उपनगरात झालंय. विद्यार्थीच विद्यार्थी. त्यांची हॉस्टेल्स, त्यांनी केलेल्या भाड्याच्या खोल्या, सारं उपनगर विद्यार्थीमय झालेलं. विद्यार्थी रस्त्यावर आली की सारं शहर ढवळून निघतं. विद्यार्थी रस्त्यावर आले कारण सरकारचं आरक्षण…

Read More Read More

रविवार. शँपेन.

रविवार. शँपेन.

गेल्या वर्षी शँपेनचा विक्रमी खप झाला. जगभरात ७ अब्ज डॉलरची शँपेन विकली गेली. म्हणजेच प्याली गेली. #  शँपेन प्राशन करण्याची एक पद्दत आहे. एका बकेटमधे बर्फ असतो. त्यात शँपेनची बाटली ठेवलेली असते. दर्दी माणूस ती भरपूर गार झालीय की नाही ते प्रेमानं बाटलीला स्पर्श करून तपासतो. मग फॉक असा खोलीभर पसरेल असा आवाज करून बूच उघडलं जातं. मग ग्लास तिरपा करून त्यात शँपेन ओतली जाते. बुडबुडे येत असतात. सोनेरी चमक असलेली शँपेन समोरच्या माणसाच्या ग्लासावर किणकिणवून शँपेनचा घोट घेतला जातो….

Read More Read More

कमला हॅरिस जोरात

कमला हॅरिस जोरात

बायडन निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले.  मतदानाला  १०० दिवस शिल्लक असताना डेमॉक्रॅटिक पक्षाला उमेदवार उभा करायचा आहे.  कोणीच माणूस दिसत नसल्यानं उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवार करण्यावातून त्या पक्षाला गत्यंतर उरलेलं नाही. हॅरिस यांनी कमालीच्या वेगानं मोहिमेचा ताबा घेतलाय. आता त्यांची टीम स्वतःची टीम आहे, ती बायडन यांची टीम नाही. नेतान्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना बायडन यांना भेटायला गेले होते.बायडन हे अजूनही अध्यक्ष असल्यानं या भेटीत उपाध्यक्ष कमला हॅरिस त्यावेळी उपस्थित असतील अशी अपेक्षा होती. पण कमला हॅरिस नेतान्याहूना स्वतंत्रपणे भेटल्या, उपाध्यक्ष…

Read More Read More

रविवार. ट्रंपांवर गोळीबार, आश्चर्य वाटायला नको

रविवार. ट्रंपांवर गोळीबार, आश्चर्य वाटायला नको

अमेरिका म्हणजे एक गंमतच आहे. अमेरिकेची लोकसंख्या आहे ३३ कोटी आणि अमेरिकेत नागरिकांकडं ३९ कोटी बंदुका आहेत. अमेरिकेचे चार प्रेसिडेंट प्रेसिडेंट असतानाच बंदुकीच्या गोळीला बळी पडून मेले आणि तीन प्रेसिडेंटवर गोळीबार झाला पण वाचले. डोनल्ड ट्रंप हे गोळीबारात वाचलेले चौथे प्रेसिडेंट. गेल्या वर्षी दी मंक अँड दी गन नावाचा एक चित्रपट मुंबईतल्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. भूतान या शांत देशाचा राजा ठरवतो की राजेशाही बरखास्त करून लोकशाही आणायची. राजाच राजेशाही रद्द करतो. लोकशाहीची सवय नसलेल्या लोकांना लोकशाहीचं प्रशिक्षण द्यायचं…

Read More Read More