कोणीही जिंको, लोकशाही पराभूत होतेय
आज सहा तारीख आणि शुक्रवार. अमेरिकेत तीन तारखेला मंगळवारी मतदान झालं. अजूनही पूर्ण निकाल आलेला नाही. १० कोटी लोकांनी मतदानाच्या दिवसाच्या आधीच मतं टाकली होती, पोस्टात किंवा मतपेटीत. ती मतं आता मोजली जात असल्यानं मोजणी रेंगाळत आहे. सामान्यतः रिपब्लिकन माणसं मतदानाच्या दिवशी मतं टाकतात. डेमॉक्रॅट्स आधी मतदान करतात. यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन डेमॉक्रॅटिक पक्षानं आधी मतदान करण्यावर भर दिला होता. ती मतं आता मोजली जात असल्यानं कल डेमॉक्रॅट उमेदवाराची मतं वाढण्याकडं दिसतो. तो कल टिकला तर अगदी कमी फरकानं…