Browsed by
Category: लेख

कमला हॅरिस यांचं पुस्तक

कमला हॅरिस यांचं पुस्तक

चेन्नईत, तामिळनाडूतल्या रस्त्यांच्या कडेला, कमला हॅरिस यांची स्थानिक चित्रकारांनी रंगवलेली चित्रं दिव्याच्या खांबाला लटकली आहेत. कित्येक चित्रं तर अशी की त्यावर नाव लिहिलंय म्हणून त्या कमला हॅरिस आहेत हे लक्षात येतं अन्यथा ते इतर कोणाही स्त्रीचं चित्र वाटलं असतं. तामिळनाडूतल्या बऱ्याच राजकीय व्यक्तींच्या चित्रांच्या बाबतीत ते खरं आहे. अम्मा असोत की बाबासाहेब. व्यक्ती पदावर पोचली की ती मोठी होते. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यावर जगाचं आणि अर्थातच भारताचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. गेल्या वर्षी त्यांचं The Truth We Hold हे…

Read More Read More

शिरीष दाते भारतात? शक्य नाही.

शिरीष दाते भारतात? शक्य नाही.

“ गेल्या साडेतीन वर्षात तुम्ही अमेरिकेन जनतेसमोर खोटं बोललात त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो कां?” एका पत्रकारानं विचारलं. व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत सामान्यपणे समर्थक पत्रकार सुखकारक प्रश्न विचारतात याची सवय असलेले प्रे. डोनल्ड ट्रंप गोंधळले. त्यांनी विचारलं “ कशा बद्दल?” “ खोटं बोललात, जी जी बेईमानी (डिसॉनेस्टी) केलीत त्या बद्दल” पत्रकार म्हणाला. “ कोणी ते केलं?” ट्रंपनी विचारलं. “ तुम्ही.” पत्रकार म्हणाला. प्रश्न विचारणारा माणूस कोण आहे ते ढुंढाळण्याच्या प्रयत्नात ट्रंप होते. या पूर्वी अनेक वेळा त्यांनी या पत्रकाराला प्रश्न विचारू…

Read More Read More

कमला हॅरिस. कर्तबगार कार्यक्षम महिला.

कमला हॅरिस. कर्तबगार कार्यक्षम महिला.

कमला हॅरिस हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमधे त्या हरल्या.   आता कमला हॅरिस नावाची एक महिला उपाध्यक्ष होऊ पहात आहे.   हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे  भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमेकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं,  डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला…

Read More Read More

लढाया, दंगली,हिंसाचार कव्हर करणाऱ्या महिला बातमीदार.

लढाया, दंगली,हिंसाचार कव्हर करणाऱ्या महिला बातमीदार.

Our Women on the Ground या नावाचं पुस्तक पेंग्वीन प्रकाशनानं अशात प्रसिद्ध केलंय. इराक, सीरिया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्की, सौदी इत्यादी अरब प्रदेशात जीव पणाला लावून पत्रकारी करणाऱ्या १९ अरब पत्रकार महिलांचे अनुभव, निबंध या पुस्तकात आहेत.    आपला अनुभव असा की प्रत्येक युद्धाच्या वेळी पत्रकार रकाने भरभरून युद्धाचा उन्माद निर्माण करतात. युद्धात माणसं मरतात हे भीषण  वास्तव पत्रकार रम्य आणि उदात्त करून टाकतात. माणूस मेल्यावर स्वर्गात जातो, तो हुतात्मा होतो वगैरे गोष्टी युद्धात भाग न घेणाऱ्या लोकांना बोलायला सोप्या असतात….

Read More Read More

सत्ता मिळवण्यासाठी व्यवस्थेचा बळी

सत्ता मिळवण्यासाठी व्यवस्थेचा बळी

निवडून येणं आणि सत्ता हस्तगत करणं हा प्रत्येक व्यक्ती आणि पक्षाचा घटनादत्त अधिकार असतो. पण हा अधिकार घटनादत्त आहे असं म्हणणं म्हणजेच घटनेचं महत्व मानणं होय, घटनेत सुचवल्याप्रमाणं सत्ताग्रहण केलं जावं अशी अपेक्षा असते.  डोनल्ड ट्रंप यांना राज्यघटनेनुसार पुन्हा प्रेसिडेंट व्हायचं आहे पण घटनेनं दिलेली पथ्थ्यं पाळायला ट्रंप तयार नाहीत. निवडून येण्यासाठी ते घटना पायदळी तुडवायला तयार आहेत हे गेल्या आठवड्यातल्या त्यांच्या वर्तणुकीतून दिसलं. डोनल्ड ट्रंप यांनी पोर्टलँड (ओरेगन) या शहरात फेडरल एजंट्स पाठवले, तिथलं आंदोलन दडपण्यासाठी. सीएनएननं दाखवलेल्या दृश्यांनुसार…

Read More Read More

चर्च ते मशीद ते म्युझियम ते मशीद

चर्च ते मशीद ते म्युझियम ते मशीद

सहाव्या शतकात बायझंटाईन ख्रिस्ती सम्राटानं चर्च बांधलं. पंधराव्या शतकात मुस्लीम ऑटोमन सम्राटानं त्या चर्चचं रूपांतर मशिदीत केलं. विसाव्या शतकात तुर्की नेते केमाल पाशा यांनी ऑटोमन साम्राज्य धर्मापासून तोडून एक सेक्युलर साम्राज्य केलं आणि त्याच मशिदीचं रुपांतर म्युझियममधे केलं. एकविसाव्या शतकात ऑटोमन साम्राज्य नष्ट होऊन केवळ तुर्कस्तान म्हणून उरलेल्या देशात राष्ट्रपती एर्डोगन यांनी त्या म्युझियमचं रूपांतर पुन्हा मशिदीत केलं. 

खुनी माणूस वास्तवीक पंतप्रधान, गृहमंत्री होऊ शकतो…

खुनी माणूस वास्तवीक पंतप्रधान, गृहमंत्री होऊ शकतो…

MBS: The Rise to Power of Mohammed Bin Salman Ben Hubbard ()()() खाशोग्गी या सौदी पत्रकाराचा खून करण्याचा आरोप असलेल्या सौदी राजपुत्राचं, महंमद बिन सलमान (एनबीएस) यांचं हे चरित्र आश्चर्य वाटण्यासारखं नसलं तरी खूप माहितीपूर्ण नक्कीच आहे. पुस्तकातली एक हकीकत अशी. लेबनॉनचे पंतप्रधान साद हरारी यांना रियाधहून फोन आला की प्रिन्स एमबीएसनी भेटायला बोलावलंय. हरारी रियाधमधे व्यवस्था केलेल्या ठिकाणी पोचल्यावर त्याना सांगण्यात आलं की योग्य वेळी त्यांची आणि एमबीएसची भेट घडेल. वेळ सांगितली नाही. मध्य रात्र उलटल्यावर एक वाजता त्याना…

Read More Read More

अमेरिकन स्प्रिंग

अमेरिकन स्प्रिंग

अमेरिकन स्प्रिंग अमेरिकेतला असंतोष थंड व्हायला तयार नाही. अमेरिकेतल्या  ७३ टक्के गोऱ्या  नागरीकांना अमेरिकेत वर्णद्वेष आहे हे मान्य आहे. सॉल्ट लेक सिटी मधे काळे फक्त दोन टक्के आहेत, तरीही तिथं गोरी माणसं सतत निदर्शनं करून ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला पाठिंबा देत आहेत. १९६६-६८ साली कर्नर कमीशननं म्हटलं होतं “आपला देश दुभंगतोय,दोन विभक्त समाज निर्माण होऊ घातलेत,  एक काळा एक गोरा, असमान आणि विभक्त. ”  निक्सन यांच्या काळात सुरु झालेली ही प्रक्रिया ट्रंप यांच्या काळात जवळपास पूर्णत्वाला गेली.  अमेरिकेत १७…

Read More Read More

गुलाबो सिताबो, खूब मजा आया.

गुलाबो सिताबो, खूब मजा आया.

  गुलाबो सिताबो या चित्रपटाला मी दहात सात गुण देईन. तो चित्रपट चारही बाजूंनी पहायला मजा येते. त्यातली पात्रं, त्यातलं संगित, चित्रीकरण, संवाद अशा साऱ्याच गोष्टी छान आहेत. गुलाबो सिताबोत लखनऊ शहराचा काहीसा अंदाज येतो. कॅमेरा शहरात फिरला असता, लखनऊची खाऊ गल्ली, लखनऊचे कबाब दाखवले असते तर आणखीनच मजा आली असती आणि ती दृश्यं दाखवण्यासाठी आवश्यक स्पेस या चित्रपटात जरूर आहे. पण फातिमा महल ही हवेली पाहूनही लखनऊची मजा कळते.  हवेलीत नाना आकाराच्या किती तरी खोल्या. खोल्यांची मांडणी आधुनिक इमारतींसारखी…

Read More Read More

भारतात सेक्युलरिझमची व्याख्या स्वतंत्रपणे करावी लागेल

भारतात सेक्युलरिझमची व्याख्या स्वतंत्रपणे करावी लागेल

REPUBLIC OF RELIGION The Rise and Fall of Colonial Secularism in India. Abhinav Chandrachud. PENGUIN-VIKING. ।। अभिनव चंद्रचूड यांचं Republic of Religion हे पुस्तक भारतातील कायद्याच्या हिशोबात सेक्युलरिझमचा धावता इतिहास सांगतं. सेक्युरलिझमचा अमेरिकेतला अर्थ वेगळा, ब्रीटनमधला वेगळा, भारतातला वेगळा. लेखक चंद्रचूड यांनी लावलेला अर्थ असा- no religion should be established by law as the official state religion and all citizens should have the freedom to practice their own religious beliefs. वरील सूत्राचा आधार घेऊन ब्रिटीशांनी भारतात सेक्युलरिझम कसा आणला किंवा…

Read More Read More