Browsed by
Category: लेख

लोकशाहीचा वापर करून लोकशाही संपवणारे…

लोकशाहीचा वापर करून लोकशाही संपवणारे…

डोनल्ड ट्रंप यांचे नॅशनल सेक्युरिटी सल्लागार  जॉन बोल्टन यांचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. पुस्तकाचं नाव आहे द रूम व्हेअर इट हॅपंड. या पुस्तकात बोल्टन यांनी ट्रंप यांचे विचार, कामाची पद्धत, धोरणं इत्यादी बाबत आपला अनुभव लिहिला आहे.  सी जिन पिंग यांच्याशी वाटाघाटी करताना ट्रंप यांनी काही अमेरिकन शेतमाल चीननं खरेदी करावा, त्यामुळं शेतकऱ्यांची मतं त्याना मिळतील आणि त्यामुळं ते पुन्हा निवडून येतील असं सी जिन पिंगना सांगितलं. त्या वेळी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध चालू होतं, चीनचा माल आयात करायचा…

Read More Read More

काळ्यांना अमेरिकेत क्रूरपणे वागवलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं?

काळ्यांना अमेरिकेत क्रूरपणे वागवलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं?

काळ्यांना अमेरिकेत क्रूरपणे वागवलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं? जून २०१०. काळ्या माणसांना अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल असंतोष व्यक्त करणारं आंदोलन साऱ्या जगात उफाळून आलं.   अमेरिकेत सुमारे २४ कोटी गोरे आहेत, २०१५ ते २०२० या काळात पोलिसांकडून मेलेल्या गोऱ्यांची संख्या आहे २३८५. अमेरिकेत ४ कोटी काळे आहेत, पोलिसांकडून मेलेल्यांची संख्या त्याच काळात १२५२ आहे. दर दहा लाखात १२ गोरे मारले जातात आणि दर दहा लाखात ३० काळे मारले जातात.  ।। कलीफ ब्राऊडर, वय वर्षे १६, ब्राँक्समधे रहाणारा. काळा, अनाथ, …

Read More Read More

माणसं मेली तरी चालतील राम मंदीर, पुतळे हवेत.

माणसं मेली तरी चालतील राम मंदीर, पुतळे हवेत.

भारतात तुम्ही कुठंही असा. तुमच्या आसपास एकादा रसायनांचा वापर करणारा  कारखाना असेल तर सावधान.  ।। ७ मे २०२० रोजी गोपालपटनममधे पहाटे २ ते ३ या काळात एक वायू हवेत पसरला. हा वायू गोपालपटनमच्या हद्दीत असलेल्या एलजी पॉलिमर या उद्योगातून निसटला होता. ८ तारखेच्या दुपारपर्यंत सुमारे १०००  माणसं घुसमटली, हॉस्पिटलमधे दाखल झाली. १३  माणसं मेली.  सरकारनं मेलेल्या माणसाना प्रत्येकी १ कोटी रुपये देऊ केले आहेत, बाधितांना गरजेनुसार रक्कम दिली आहे, एकूण या कामी ३० कोटी खर्च होणार आहेत. सरकारनं एलजी पॉलिमरकडून…

Read More Read More

अमेरिकेतला उद्रेक

अमेरिकेतला उद्रेक

मिनिआपोलिसमधे फ्लॉईडनं दुकानात वस्तू घेताना २० डॉलरची नोट दिली. ती नोट खोटी आहे असं दुकानदाराला वाटलं. त्यानं पोलिसांकडं तक्रार  केली. पोलिस तडक हजर झाले. फ्लॉईडला हातकड्या घातल्या. तो कोणताही विरोध करत नसतांना त्याला खाली पाडलं. हातकड्यांत अडकला असतानाच त्याच्या मानेवर गुडघा दाबून ठेवला. फ्लॉईड म्हणत होता – मला श्वास घेता येत नाहीये, मी मरतोय. तरीही मानेवरचा गुडघा निघाला नाही. फ्लॉईड मेला. बरोब्बर १२ तास आधी न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे एमी कूपर ही गोरी स्त्री कुत्र्याला त्याच्या गळ्यात पट्टा न बांधता…

Read More Read More

स्थलांतरीत आणि स्थलांतरीत नसलेले, सर्वानाच जगण्यासाठी नवी व्यवस्था उभारावी लागेल.

स्थलांतरीत आणि स्थलांतरीत नसलेले, सर्वानाच जगण्यासाठी नवी व्यवस्था उभारावी लागेल.

मुंबईतल्या धारावीतल्या हज्जारो अधांतरी लोकांनी रस्त्यावर रांगा लावल्या, बसमधे बसण्यासाठी.  बस जाणार होती रेलवेच्या डब्यापर्यंत, रेलवेचा डबा जाणार होता त्यांच्या बिहार, उत्तर प्रदेश, ओदिसा, बंगालमधल्या गावापर्यंत. मुंबईत इतर ठिकाणीही माणसं रेलवे स्टेशनांत गेली, मुंबई सोडण्यासाठी. यांची संख्या काही लाख. ही माणसं दहा बाय दहाच्या घरात रहात, दहा बाय दहाच्या खोलीत खाद्यपदार्थ किंवा प्लास्टिक किंवा चामड्यांच्या वस्तूंचं उत्पादन करत. यांचं दाटीवाटीचं जगणं अत्यंत म्हणजे अत्यंत अनारोग्यकारक होतं.  लातूरमधले डाळ मिल, तेल एक्स्ट्रॅक्शन प्लॅंट इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या  सुमारे १० हजार मजुरांनी…

Read More Read More

मुख्यमंत्रीपद हुकलं

मुख्यमंत्रीपद हुकलं

फडणवीस दोनेक तास वर्षाच्या हिरवळीवर येरझारा घालत होते. थांबेचनात.  त्यांच्या पुढं मागं करणारे कमांडोही दमले.  जेवायची वेळ टळून गेली म्हणून अमृता वहिनी देवेंद्रना शोधत होत्या तर त्यांना देवेंद्र हिरवळीवर फेऱ्या मारताना दिसले. अमृतावहिनीही देवेंद्रांबरोबर फेऱ्या मारू लागल्या. “ आता थांबा, जेवून घ्या, पोट कमी करण्यासाठी इतका अघोरी उपाय करणं बरोबर नाही.” देवेंद्र ऐकायला तयार नाहीत. वहिनींबरोबर साताठ फेऱ्या झाल्या. वहिनी जायला तयार नाहीत म्हटल्यावर धापा टाकत देवेंद्र म्हणाले, “ तुला समजत कसं नाहीये. तिकडं शरद पवारांनी कट रचलाय. ते उद्धव…

Read More Read More

मुख्य पात्र कधीच दिसत नाही असा चित्रपट.

मुख्य पात्र कधीच दिसत नाही असा चित्रपट.

दी वाॅर्डन चित्रपटाला इंग्रजी सब टायटल नाही. चित्रपट इराणी. माणसं काय बोलतात ते कळायला मार्ग नाही. जे पडद्यावर दिसतं तेवढंच पाहून अंदाज बांधायचा. म्हणजे मूकपटच पहायचा म्हणायचं. या सिनेमाबद्दल मी काहीच वाचलं नव्हतं. अगदी कोरा करकरीत होतो. निखिलेश चित्रे या मित्रानं चित्रपट चांगला आहे असं लिहिलं होतं म्हणूनच पहायला घेतला. सुरवात होते कुंद वातावरणात पावसात तुरुंगाच्या एका दालनात. फाशीचा फलाट मोडला जात असतो, फाशीचा दोर ज्या खांबाला लटकत असतो तो खांब काढायच्या बेतात काही तुरूंग कर्मचारी असतात. एक मेजर दर्जाचा…

Read More Read More

मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…

मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…

लोककल्याण मार्गावरच्या सात नंबरच्या बंगल्यातल्या कार्यालयात नरेंद्र मोदी बसले होते. समोर चार अधिकारी फायली घेऊन उभे होते. खूप अंतरावर. दूरदर्शनची माणसं मोदींचं भाषण रेकॉर्ड करण्याची तयारी करत होते. कॅमेरा सेट झाला होता.  दूरदर्शनचा अधिकारी आणि रेकॉर्डिंग करणारे कर्मचारी कुजबुजत होते, सारं काही ठीक आहे ना याची तपासणी करत होते. मोदी सरांनी मान्यता दिली की रेकॉर्डिंग सुरु व्हायचं होतं.   स्क्रिप्ट तयार झालं होतं. मोदी लॉक डाऊन १४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करणार होते. अर्थात हे फक्त स्क्रिप्ट तयार करणाऱ्या…

Read More Read More

संकट काळ

संकट काळ

क्राऊन या मालिकेतला एपिसोड सुरू होतो तेव्हा ॲबरफॅन गावात शुक्रवार असतो, मुसळधार पाऊस पडत असतो. शाळा सुटणार असते, एक शिक्षक मुलांना पुस्तिका वाटतात, त्यातलं गाणं पाठ करा, उद्या ते सर्वांनी एकत्र गायचंय असं सांगतात. दोन तीन दृश्यं मधे जातात, मुलं शाळेत पोचतात. एक विद्यार्थी वात्रट असतो. हाॅलमधे जायच्या आधीच वर्गात तो ते गाणं म्हणतो. वर्ग हसतो. शिक्षक सांगतात की गाणं म्हणायला वेळ आहे, पाच मिनिटं आहेत. वर्गाच्या खिडकीतून दूरवरचा डोंगर दिसत असतो. डोंगर म्हणजे कोळसा खाणीतून बाहेर आलेल्या मातीचा डोंगर….

Read More Read More

पालघर घटना. नव्या कंडीला वाव.

पालघर घटना. नव्या कंडीला वाव.

पालघरला जमावानं तीन माणसांना ठार केलं.   घटना घडून काही तासही उलटले नाहीत आणि सोशल मीडियात पोस्टींचा पूर आला.  भगव्या कपड्यातली माणसं साधू होती,  मुस्लीम जिहादींनी त्याना मारलं.  मारणारी माणसं हिंदू होती, भाजपची होती, ते गाव भाजपचं होतं आणि भाजपचा सरपंच होता.  पोलीस घटनेच्या ठिकाणी हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.   पाकिस्तानी लोकांचा हा कट आहे, काश्मिरात रचण्यात आला, तबलिगी त्यात सामिल होते. महाराष्ट्र सरकार त्यात सामिल कारण पोलिसानं बघ्याची भूमिका घेतली.  भाजपच्या लोकांनी महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी…

Read More Read More