चोऱ्या करा, लूट करा.तुम्हाला अभय आहे. तुम्हाला महाबळेश्वर खुले आहे.
कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांना सीबीआयनं १७ मार्च २०२० रोजी मुंबई कार्यालयात जाबजबाबासाठी हजर रहाण्याची नोटीस बजावली होती. ही तिसरी नोटीस होती. ही नोटीस अजामीनपात्र होती. डीएचएफएल या आपल्या कंपनीच्या मार्फत त्यांनी केलेल्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी सीबीआयला करायची होती. त्या आधी दोन वेळा नोटीस बजावली असूनही दोघे हजर राहिले नव्हते. मामला शेपाचशे रुपयांचा नव्हता. सुमारे ९६,८८० हजार कोटींचा मामला होता. १७ मार्चला वाधवान बंधू हजर झाले नाहीत. सरकारला उत्तर पाठवतांना वाधवान म्हणाले की करोना पर्व सुरू झाल्यानं त्यांना प्रवास…