सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही
जून महिन्यातलं चेन्नई. विभाग मायलाई. सकाळची वेळ. शरदकुमार, त्याची पत्नी गीता आणि त्यांच्या तीन मुली हातात प्लास्टिकच्या घागरी घेऊन गर्दीत उभ्या आहेत. धक्काबुक्की चाललीय, पाण्याच्या टँकरपर्यंत पोचण्यासाठी. तासभर झाला. दोन मुली शाळकरी आहेत. त्या कुरकूर करत आहेत. ” आठवडाभर शाळेला उशीर होतो. बाई ओरडतात. पहिला तास बुडतो.” शरदकुमारच्या एका हातात घागर, दुसऱ्या हातात सेल फोन. फोन वाजतो. ऑफिसमधून फोन. ” दररोज उशीरा येतोयस, आज तरी लवकर ये “ ” काय करू? ऑफिसमधे येण्याआधी आंघोळ आणि कशीबशी पुजा तरी व्हायला हवी…