लंकेतला दहशतवाद
२१ एप्रिलला लंकेत आठ ठिकाणी स्फोट झाले आणि त्यात २६० माणसं मेली. स्फोट चर्चमधे आणि हॉटेलांत झाले. ईस्टर संडेच्या सणाच्या प्रार्थनेसाठी जमलेली माणसं मेली. एक चर्च सर्वधर्मीय चर्च म्हणून ओळखलं जातं. तिथं मुस्लीम, हिंदू, बौद्ध माणसंही प्रार्थनेसाठी जमली होती. स्फोटात गुंतलेले दोघं होते इल्हाम इब्राहीम आणि इन्शाफ अहमद हे दोन भाऊ. पाठीवर स्फोटकं घेऊन ते चर्चमधे पोचले आणि स्फोट घडवून आणला. तौहिद जमात ही जिहादी संघटना लंकेत खटपटी करत होती हे लंकेच्या पोलिसांना माहित होतं. किरकोळ स्फोट आणि पुतळे उध्वस्थ…