बायडननी माघार कां घेतली?
प्रेसिडेंट जो बायडन प्रेसिडेंट पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. २१ जुलैच्या २०२४ च्या दुपारी त्यांनी रिंगणातून बाहेर पडल्याची घोषणा केली. पहिली टर्म संपल्यानंतर दुसऱ्या टर्मसाठी ते निवडणुक लढवत होते. सत्ताधारी आपणहून सत्ता सोडतो असं सहसा होत नसतं.कारण खूप मेहनत करून तो सत्तेत पोचलेला असतो. सत्ता हे एक व्यसन असल्यानं सत्ता सोडणं आणखीनच कठीण असतं. मंडेलांनी आपणहून सत्ता सोडली होती. झेकोस्लोवाकियाचे अध्यक्ष वास्लाव हावेलनी ‘पुरे झालं’ म्हणून सत्ता सोडली होती.अँजेला मर्केल चॅन्सेलरपदी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि सत्तेत घट्ट रुतल्या असतांनाही त्यांनी निवडणुक…