काश्मीरवर बहिष्कार? असं नका करू.
सैन्यातल्या एका निवृत्त कर्नलनं म्हणे एक वक्तव्य केलं. ” काश्मिरमधे जाऊ नका. अमरनाथ यात्रेला जाऊ नका. काश्मिरी लोकांकडून वस्तू खरेदी करू नका. काश्मिरी व्यापाऱ्याशी व्यवहार करू नका. काश्मिरी लोकांवर बहिष्कार घाला. “ पुलवामामधे जैशे महंमद या पाकिस्तानी सैन्यानं पुरस्कृत केलेल्या अतिरेक्यानं ४३ भारतीय सैनिक मारल्यानंतर देशभर उसळलेल्या संताप आणि दुःखाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झालंय. या वक्तव्याचा गंभीर परिणाम भारत देशाच्या शांतता व स्थैर्यावर होऊ शकतो. कोण आहेत हे कर्नल? शोधून काढणं कठीण नाही. मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी कर्नलच्या वक्तव्याला…