ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.
ब्रेक्झिटचा घोळ आता ब्रेक्झिट हा एक विनोद झाला आहे. एकाद्या देशाचं इतकं हसं यापुर्वी कधी झालं नसेल. २०१७ मधे ब्रीटननं युरोपीय युनीयनमधून (युयु) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तोही जनमत चाचणीनंतर. युयुमधे रहायचं असं सुमारे ४८ टक्के लोक म्हणत होते आणि राहू नये असं ५२ टक्के लोक म्हणत होते. म्हणजे अगदीच निमुळत्या बहुमतानं निर्णय झाला. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी थेरेसा मे यांनी घेतली, त्यासाठी त्या पंतप्रधान झाल्या. २०१९ च्या मार्चमधे बाहेर पडायचं ठरलं आणि त्यासाठी लागणारे कागद, करार, देवाणघेवाण यांच्या…