पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.
THE BOOK-MAKERS A HISTORY OF BOOKS ADAM SMYTH || प्रस्तुत पुस्तकात पुस्तक व्यवसायातल्या १८ व्यक्तींची शब्दचित्रं आहेत. १४७६ साली लंडनमधे स्थापन झालेल्या छापखान्याच्या निर्मात्यापासून सुरवेत होते, १८८० सालच्या पहिल्या सर्क्युलेटिंग लायब्ररीपर्यंतचे पुस्तक व्यवहार आणि ते घडवून आणणाऱ्या उद्योगी व्यक्ती या पुस्तकात आहेत. आजच्या डिजिटल पुस्तकांपर्यंत लेखक पोचला आहे. पुस्तक या वस्तूचा एक धावता इतिहास या पुस्तकात आहे. लेखक, प्रकाशक, कंपोझर, प्रिंटर, बाईंडर, विक्रेता असे मिळून पुस्तक छापतात. काळाच्या ओघात पुस्तकाचे आकार आणि रुप बदलत गेलं. आता घरातल्या साध्या टेबलावरही पुस्तक…