Browsed by
Category: लेख

पुस्तकं. बेडुक कसा शिजवावा

पुस्तकं. बेडुक कसा शिजवावा

पुस्तकं. दूषित लोकशाही. ॥ Tainted Democracy: Viktor Orbán and the    Subversion of Hungary  by Zsuzsanna Szelényi. Hurst, 438 pp., £25. ।।  प्रस्तुत पुस्तक हंगेरीचे सध्याचे प्रधान मंत्री (प्रमं) व्हिक्टर ओर्बन यांचं राजकीय चरित्र आहे. १९९८ ते २००२ आणि २०१० ते २०२४ अशी १८ वर्षं ते हंगेरीचे प्रधान मंत्री आहेत. कसे  आहेत हे व्हिक्टर ओर्बन? ‘बेडुक घ्यायचा. पसरट भांड्यात पाण्यात ठेवायचा. बेडुक सुखात असतो. हळूहळू पाणी तापवायला सुरवात करायची. बेडकाच्या ते लक्षात येत नाही. पाणी उकळू लागतं तोवर वेळ निघून गेलेली…

Read More Read More

रविवार/घटनेची गुंडाळी

रविवार/घटनेची गुंडाळी

मी ‘कालनिर्णय’ साठी बॉब सिल्वर्स या संपादकावर लेख लिहीत होतो.  न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स या एका जगन्मान्य पाक्षिकाचे सिल्वर्स हे संपादक. ६१ वर्षं ते संपादक होते. अनेको नोबेल विजेते लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत इत्यादींनी सिल्वर्ससाठी लेखन केलं.  सिल्वर्सनी लेखक तयार केले. लेखनातली क्लिष्टता काढून टाकणं, लेखन प्रवाही ठेवणं, लेखन सोपं ठेवणं, ते अगदी स्पष्ट आणि समजेल असं ठेवणं या सवयी त्यांनी लेखकाना, भल्या भल्या लेखकांना लावल्या. मुख्य म्हणजे लेखन साधार असलं पाहिजे, तपशील असले पाहिजेत, पुरावे असले पाहिजेत असा त्यांचा…

Read More Read More

सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.

सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.

माहितीपट मेरियुपोलमधे २० दिवस. रशियाच्या फौजा युक्रेनच्या हद्दीवर २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात उभ्या राहिल्या. युक्रेन-रशियाच्या पूर्व हद्दीवर मेरियुपोल हे शहर आहे. तिथं. पुतीननं या घटनेला युद्ध असं नाव दिलं नाही, विशेष लष्करी कारवाई असं पुतीन म्हणाले. एपी, असोसिएटेड प्रेस, या वृत्तसंस्थेच्या लक्षात आलं की १.५ लाख सैन्य ही काही सामान्य लष्करी कारवाई नाही. एपीनं ही घटना कव्हर करायचं ठरवलं. एपीचे कॅमेरामेन आणि बातमीदार एक टीम करून मेरियुपोलमधे पोचले.  बातमीदार पोचले त्या पहिल्या दिवशी सारं शांत होते. दुसऱ्या दिवशीपासून मेरियुपोलपासून काही…

Read More Read More

प्रासंगिक. बीजू जनता दल संकटात

प्रासंगिक. बीजू जनता दल संकटात

ओदिसामधे भाजप, बीजू जनता दल (बीजेडी) यांची आघाडी  मोडली आहे. भाजप आणि बीजूदल आता स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुका लढवतील.  ओदिसात लोकसभेच्या २१ जागा आहेत. आजवर भाजप-बीजूदल अशी अलिखित आघाडी होती. बीजू दलाचे २० खासदार होते आणि भाजपचा १ खासदार होता. आघाडी टिकवायची असेल तर आपल्याला किमान १७/१८ जागा मिळायला हव्यात असा भाजपचा हट्ट होता. तेवढ्या जागा बीजूदल देत नाही या मुद्द्यावर आघाडी मोडली आहे. भाजपला जास्त जागा कां हव्याहेत? कारण भाजपला ४०० चा आकडा पार करायचा आहे.  गेल्या लोकसभेत भाजपचे एकूण…

Read More Read More

रविवार. दारू, मेंदूत हवी पण रक्तात नको.

रविवार. दारू, मेंदूत हवी पण रक्तात नको.

दारू मेंदूत हवी पण रक्तात नको.कार रस्त्यावर नाचू लागली की ब्रिटीश पोलिस चालकाला पकडतात. रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण तपासतात, जास्त निघालं की शिक्षा करतात.पिणाारा म्हणतो की दारू चढली तर पाहिजे पण तिनं एकाद दोन तासातच रक्तातून गायब झालं पाहिजे…..गंमतच. दारू प्याल्यानंतर काय होतं? दारू प्यायल्यावर समोरच्या गोष्टी दोनदोन तीनतीन दिसू लागतात. दारू प्यायल्यावर पाय लडखडायला लागतात. दारू प्यायल्यावर जिभेचा लोचा होता. जीभ जड होते,  मराठी माणूस  इंग्रजी बोलू लागतो. जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं, जड होतं, पुढला दिवस वाईट…

Read More Read More

पुस्तकं.’ होय, मीच ती बलात्कार झालेली स्त्री आहे’

पुस्तकं.’ होय, मीच ती बलात्कार झालेली स्त्री आहे’

I AM THE CENTRAL PARK JOGGER By TRISHA MEILI Pub. Scribner. || त्रिशा मेली या इनव्हेस्टर बँकर स्त्रीनं हे पुस्तक लिहिलंय.  १९८९ साली न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे एका जॉगिंगला गेलेल्या स्त्रीवर राक्षसी-क्रूर बलात्कार झाला होता. प्रकरण अमेरिकेत खूप गाजलं होतं. ती बलात्कार झालेली जॉगर मीच आहे असं लेखिकेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रस्तुत  पुस्तकात उघड केलंय.   शिर्षकात जॉगिंग म्हणजे पळणं आहे, पण पुस्तक पळण्यावर नाही.  लेखिका बँकर आहे, पण पुस्तक बँकिंग या विषयावर नाही.  लेखिकेवर झालेला बलात्कार आणि अत्याचार हे पुस्तकाला…

Read More Read More

रविवारसाठी. पब.

रविवारसाठी. पब.

इंग्लंडमधे पब नावाचं एक पवित्र स्थळ असतं. तिथं एल नावाचं एक प्राचीन पवित्र तीर्थ परवडेल अशा दरात दिलं जातं. या तीर्थाला भारतात बियर असं म्हणतात. इंग्लंडमधलं एल हे तीर्थ बियरपेक्षा जास्त घट्ट असतं, त्याची चवही काहीशी कडवट असते. कित्येक शतकांपासून पब ही मंदिरं-तीर्थस्थळं इंग्रजांनी उभारली आहेत. ही तीर्थस्थळं टिकवली पाहिजेत असं इंग्रजांना वाटतं. पब म्हणजे पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाण. पबमधे लोक बियर किंवा इतर पेय पिण्यासाठी एकत्र जमतात. खरं म्हणजे बियर किंवा मद्य हे एक निमित्त असतं. शिळोप्याच्या गप्पा, टवाळक्या,…

Read More Read More

सिनेमे. पुअर थिंग्ज.

सिनेमे. पुअर थिंग्ज.

पुअर थिंग्ज. यंदाच्या ९६ व्या ऑस्कर स्पर्धेत पुअर थिंग्ज या चित्रपटाला ७ नामांकनं होती, चार मिळाली. योर्गोस लॅंथिमोस या ग्रीक दिक्दर्शकाची ही आठवी फिल्म आहे. उत्तम अभिनेत्री, उत्तम कलादिक्दर्शन, उत्तम रंगवेषभुषा आणि उत्तम चित्रीकरण या वर्गाची पारितोषकं या चित्रपटानं मिळवली आहेत. चित्रपटाच्या सुरवातीला पाठमोरी स्त्री गडद रंगाचा ड्रेस घालून उभी दिसते.अगदी जवळून, नंतर ती लहान लहान होत जाते आणि शेवटी पाण्यात उडी मारताना दिसते. पियानोच्या ठेक्यावर. नंतरच्या दृश्यात  एक तरुण मुलगी दिसते, पियानो बडवत असते, कधी कधी पियानं पायानंही वाजवते….

Read More Read More

रविवार. धटिंगण देशप्रमुखाची वाह्यात पत्रकारानं घेतलेली मुलाखत.

रविवार. धटिंगण देशप्रमुखाची वाह्यात पत्रकारानं घेतलेली मुलाखत.

टकर कार्लसन यांनी पुतिन यांची घेतलेली मुलाखत सध्या गाजतेय, चर्चेत आहे.  टीव्ही अँकर-मुलाखतकार टकर कार्लसन मॉस्कोत गेले.पुतिन यांच्या आमंत्रणावरून, त्यांचे पाहुणे म्हणून. दोन तासांची पुतीनची मुलाखत कार्लसननी घेतली. पुतिन मुलाखती देत नाहीत. त्यांच्या अख्ख्या आयुष्यात त्यांनी एकदाच पत्रकारांना दीर्घ मुलाखत दिली, काही तासांची. मी सांगतो ते उतरवून घ्यायचं आणि छापायचं असा आदेश होता. त्या काही तासांच्या मुलाखतीच्या आधारे नंतर  पुतिन यांचं चरित्र प्रसिद्ध झालं. एकदा रशियाची एक अणुपाणबुडी अपघात होऊन बुडाली होती, पाणबुडीवरचे शेकडो लोक मेले होते. बोट नादुरुस्त असतांना,…

Read More Read More

पुस्तकं/प्लेगसाथीनं शिकवलेलं शहाणपण

पुस्तकं/प्लेगसाथीनं शिकवलेलं शहाणपण

प्लेगचे धडे ।। The Wisdom of Plagues. By Donald McNeill. Simon & Schuster; 384 pages; $28.99 and £20 || युरोपात १३४६ ते १३५३ या काळात  प्लेगची साथ झाली. अर्ध युरोप म्हणजे ५ कोटी माणसं मेली. प्लेगनंतर समाज जागा झाला.आरोग्यात सुधारणा झाली, वातावरणातले रोगट घटक कमी झाले, औषधोपचारात सुधारणा झाली आणि मुख्य म्हणजे लसीचा शोध लागला. प्लेग नाहिसा झाला.  भारतात १८८५ साली प्लेगची साथ आली, एक कोटी माणसं मेली.  १९१८ साली इटालीत फ्ल्यूची साथ आली. ती काही वर्षं टिकली. साथीत ५…

Read More Read More