रविवार. महाशक्तींचा ‘ओलिस ओलिस’ खेळ
७ ऑक्टोबरला हमासनं सुमारे २४० इसरायली नागरिकांचं अपहरण केलं, त्यांना गाझामधे नेलं, भुयारी रस्त्यांत लपवून ठेवलं. गाझामधे हमासनं एक भुयारी मार्ग, बोगदे यांचं जाळं उभारलं आहे. किती तरी किमी लांबीचं. बोगद्याची उंची आणि रुंदी एकाद्या खोली येवढी असते, माणसं तिथं आरामात राहू शकतात, वावरू शकतात. हमासचे सैनिक त्या बोगद्यात रहातात, तिथं हमासची ऑफिसं आहेत. इझरायलनं गाझावर आक्रमण केलं. त्या आक्रमणाचं एक उद्दिष्ट ओलिसांना सोडवणं हे होतं. जोवर ओलीस मुक्त होत नाहीत तोवर युद्ध थांबणार नाही अशी घोषणा पंतप्रधान बीबी…