Browsed by
Category: लेख

पुस्तकं. हिटलर १९२३

पुस्तकं. हिटलर १९२३

पुस्तकं. हिटलर.  1923.  By Mark Jones. Basic Books; 432 pages; $32 and £25 ÷÷ ८ जून १९२३ या दिवशी ॲडॉल्फ हिटलर म्युनिखमधल्या बियर हॉलमधे गेला. सोबत एसएस या त्याच्या खाजगी सैन्याचे जवान होते. या जवानांनी बियर हॉलला गराडा घातला. हॉलच्या बाहेर मशीन गन होती. ती हॉलवर रोखलेली होती. हॉलमधे बव्हेरिया प्रांताचे कमिशनर कार आणि त्यांचे सहकारी प्रशासक होते. ते एका सभेत बोलत होते. हिटलर सभेत घुसला. स्टेजवर गेला आणि बोलू लागला. हिटलर त्या वेळी प्रसिद्ध पुरुष नव्हता. श्रोत्यांनी हिटलरकडं लक्ष…

Read More Read More

रविवार/ मिनिटभराचं चित्रण २.३० कोटी रुपये खर्च

रविवार/ मिनिटभराचं चित्रण २.३० कोटी रुपये खर्च

२०१६  सालापासून सुरु झालेली क्राऊन वेबमालिका सहा मोसम पार करून २०२३ मधे संपली. संपली म्हणजे ती नेटफ्लिक्सवर पहायला मिळते पण निर्मात्यानं मालिका संपवलीय. ब्रिटीश राजवाड्याभोवती फिरणारी ही मालिका अर्थातच निर्माता पुन्हा कधीही सुरु करू शकतो. राजघराणं संपणार नसल्यानं मालिकेला कायमचा वाव आहे. मालिकेत काम केलेली अभिनेते मंडळी; चित्रीकरण झालेली स्थळं; राजवाडे; इत्यादींचा पसारा येवढा मोठा होता की फार खर्च होणं अपेक्षितच होतं. इंग्लंडमधला बकिंगहॅम राजवाडा, विंडसर किल्ला; स्कॉटलंडमधला बालमोरल राजवाडा या स्थळांचे सेट उभे करणं ही फारच खर्चिक बाब.  …

Read More Read More

शुक्रवार/ कल्पित आणि वास्तव. ब्रिटीश राणी. क्राऊन.

शुक्रवार/ कल्पित आणि वास्तव. ब्रिटीश राणी. क्राऊन.

क्राऊन ही नेटफ्लिक्सवरची सहा सीझन्सची मालिका नुकतीच संपली. दृश्य माध्यमातला हा एक महत्वाचा टप्पा मानला जाईल इतकी ही मालिका प्रभावशाली होती. ब्रीटनची राणी हे एक गुढ असतं. राणी काय करते असं कुतूहल कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. त्यातून राणी ही देशाची प्रमुख.  ती जगते कशी, ती आई म्हणून कशी असते, पत्नी म्हणून कशी असते, ती देश प्रमुख म्हणून काय करते इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात असं माणसाला वाटणं स्वाभाविक आहे.पण राजवाडा आणि राणी प्रसिद्धीपासून दूर असल्यानं आपलं ते कुतुहूल न शमता शिल्लक…

Read More Read More

रविवार/लठ्ठपणाची समस्या

रविवार/लठ्ठपणाची समस्या

ब्रीटनच्या आरोग्यमंत्री व्हिक्टोरिया ॲटकिन्स पार्लमेंटात म्हणाल्या की  ब्रिटीश माणसाचा लठ्ठपणा (ओबेसिटी) ही एक फार चिंताजनक समस्या झालीय आणि त्यावर तातडीनं काही तरी करायला हवं. ब्रीटनमधल्या ४० टक्के लोकांचं वजन धोक्याची पातळी ओलांडून वर गेलंय आणि २४ टक्के माणसं गलेलठ्ठ (ओबेस) झालीत. सरकारला चिंता वाटणं साहजिक आहे. वजन वाढलं की मधुमेह, रक्तदाब हे आजार जडतात, हृदयावर ताण पडतो. मधुमेह – रक्तदाब शरीरातल्या इतर व्यवस्थांवर आक्रमण करतात, त्या व्यवस्था बिघडवतात. आंधळेपणा आणि पक्षाघात हे हादरवणारे झटके त्यातून संभवतात. जाड्या लोकांचं वजन आणि…

Read More Read More

शुक्रवार/ अर्ध जग यंदा मतदान करून लोकशाही हरवेल?

शुक्रवार/ अर्ध जग यंदा मतदान करून लोकशाही हरवेल?

२०२४ हे निवडणुकांचं वर्षं आहे. जगातल्या ६० देशात निवडणुका होणार आहेत. ४ अब्ज माणसं मतदान करतील. जगात सुमारे ७.५ अब्ज माणसं आहेत. त्यातली अर्धी म्हणजे ४ अब्ज माणसं २०२४ मधे मतदान करतील.  वर्षाची सुरवात होत असतानाच बांगला देश आणि तैवान या दोन देशातल्या निवडणुका पार पडल्यात.  बांगला देशात  पंतप्रधान शेख हसीना पाचव्या वेळी निवडून आल्या आहेत.  ही निवडणूक वादग्रस्त होती. शेख हसीना यांनी निवडणुकीपूर्वी राजिनामा द्यावा, त्यांचं सरकार असताना निवडणुका होऊ नयेत, निवडणुका निःपक्षपाती पद्धतीनं घेतल्या जाव्यात अशी मागणी विरोधी…

Read More Read More

रविवार/ब्लिंकन यांची धावपळ कशासाठी?

रविवार/ब्लिंकन यांची धावपळ कशासाठी?

अमेरिकेचे परदेश मंत्री अँथनी ब्लिंकन अडीच महिन्याच्या काळात सहाव्यांदा मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर रवाना झाले. तुर्की, जॉर्डन, इजिप्त, सौदी अरेबिया इत्यादी देशांमधे पटापट जाऊन ते इसरायलकडे निघाले.गाझा युद्ध हा त्यांचा अजेंडा. त्यांचं एक स्वतंत्र विमान. त्यात त्यांचा प्रचंड स्टाफ. बहुदा विमानात त्यांची कारही.  ब्लिंकन यांचा दौरा अधिकृत होता. त्यांचे विमानात बसतांना, विमानतळावर उतरतांना फोटो प्रसिद्ध झाले. दौऱ्यात त्यांच्या सोबत अमेरिकेतल्या मोठ्या पेपरांचे बातमीदारही होते. ब्लिंकन विमानात आणि दौऱ्यात ठिकठिकाणी पत्रकारांना ब्रीफिंग करत होते. ब्रीफिंगमधे अट अशी असते की ते जे सांगतील ते…

Read More Read More

सिनेमे/माएस्ट्रो

सिनेमे/माएस्ट्रो

माएस्ट्रो लिओनार्ड बेर्नस्टाईन (१९१८-१९९०) हे युरोपातलं एक नामांकित व्यक्तिमत्व होतं. माएस्ट्रो हा बेर्नस्टाईनचा  जीवनपट आहे.  बेर्नस्टाईननं (लेनी) जेएफ केनेडींच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि बर्लीन भिंत कोसळल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी संगित रचना केल्या. त्यानं बीथोवन, शास्कोटोविच इत्यादींच्या रचना कंडक्ट केल्या. त्यानं विश्वशाळेत संगित शिकवलं आणि टीव्हीवर संगिताचे कार्यक्रम केले. हे सर्व सांगितिक उद्योग करत असतानाच तो वियेतनाम युद्धाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरला, मानवी अधिकारावरच्या आक्रमणांचा विरोध केला. कंडक्टर आजारी पडल्यामुळं आयत्या वेळी काही तासांच्या नोटिशीत, तयारी न करता, लेनीला एक कार्यक्रम कंडक्ट करावा…

Read More Read More

रविवार/दुबई दुबई

रविवार/दुबई दुबई

३० नोव्हेंबर २३ रोजी पर्यावरण रक्षण परिषदेसाठी जगभरातली ८० हजार माणसं दुबईत गेली. ही माणसं साधीसुधी नव्हती. कोणी तेल कंपनीचा मालक. कोणी कुठल्याशा देशाचा अर्थमंत्री. कोणी कुठल्याशा बँकेचा चेअरमन. कोणी झेंडाझोळी घेऊन निदर्शनं करणारा. या लोकांसाठी एक छोटं शहरच दुबईनं उभारलं होतं. रहाणं, मौज, कॉन्फरन्सेस, खाजगी वाटाघाटी. जागोजागी स्विमिंग पूल. दारू मिळेल पण ती तुमच्या हॉटेलात, अगदी खाजगीत. दुबई अशी शहरं उभी करते.नंतर त्या शहरांचं काय होतं कुणास ठाऊक. वर्ल्ड कप, ऑलिंपिक, अशा जागतीक गोष्टीसाठी दुबई कायम तयार असते. परिषदेतली…

Read More Read More

पुस्तकं/फ्रेंच दिक्दर्शक अमेरिकन दिक्दर्शकाची मुलाखत घेतो.

पुस्तकं/फ्रेंच दिक्दर्शक अमेरिकन दिक्दर्शकाची मुलाखत घेतो.

एका प्रतिभावान दिक्दर्शकानं दुसऱ्या प्रतिभावान दिक्दर्शकाची मुलाखत घ्यायची ही कल्पना कशी आहे? तीही पूर्वकल्पना देऊन. तीही खूप तयारी करून. तीही कित्येक दिवस. तसं घडलंय. फ्रान्सवा त्रुफॉनं आल्फ्रेड हिचकॉकची मुलाखत घेतलीय. त्याचं पुस्तक झालं. त्या पुस्तकाच्या आवृत्या निघाल्या.  मुलाखत १९६२ साली घेतली. संपादित व्हायला १९६६ साल उजाडलं. १९६७ साली पुस्तक प्रसिद्ध झालं. हिचकॉकच्या मृत्यूनंतर या पुस्तकात भर घालून १९८० साली पुस्तक नव्यानं प्रसिद्ध झालं. चित्रपट या विषयावरचं एक सर्वोत्कृष्ट पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन करतात. हिचकॉक १९५७ साली त्याच्या पस्तिसाव्या फिल्मच्या…

Read More Read More

रविवार/ संता बाजार

रविवार/ संता बाजार

संता बाजार अमेरिकेतल्या (जगातल्याही कित्येक देशातली)  ख्रिस्ती घरातली मुलं २५ डिसेंबरची वाट पहात असतात. त्या दिवशी ती सकाळी उठून कोपऱ्यात ठेवलेल्या ख्रिसमस ट्रीकडं जातात.  झाडाला खोके लटकावलेले असतात. खोक्यात वस्तू असतात. मुलं फतकल मारून बसतात. एक खोका उघडतात. आनंदानं चित्कारतात. दुसरा खोका उघडतात. आनंद. मुलाभोवती वस्तूंचा जलाशय तयार होतो.   रात्री म्हणे सांता क्लॉज येऊन गेलेला असतो. त्याच्याकडं प्रत्येक मुलाचा इतिहास नोंदलेला असतो. मुलानं गेल्या वर्षभरात किती सत्कृत्यं केली?  आईबापांचं ऐकलं? नीट अभ्यास केला? सकाळी तोंड नीट धुतलं? भाज्या, गाजर,…

Read More Read More