पुस्तक. सत्यजीत रे यांचे चित्रपट विषयक विचार
Our Films, Their Films हा सत्यजीत रे यांचा लेखसंग्रह १९७६ साली प्रथम प्रसिद्ध झाला. त्यामधे त्यांनी लिहिलेले २५ लेख एकत्र करण्यात आले आहेत. लेख आजही वाचावेसे वाटतात. सत्यजीत रे हा चित्रपटाची सगळी अंगं व्यक्तिशः हाताळणाऱ्या वस्ताद दिक्दर्शकांपैकी एक होता.पटकथा, फोटोग्राफी,संगित, संकलन, पोस्टर्स, दिक्दर्शन, कलादिक्दर्शन ही सगळी अंगं त्यांना अवगत होती,ते लीलया हाताळत असत. प्रत्येक फ्रेममधे रे डोकावतात आणि दृश्य कसं दिसेल ते पहातात, त्यांना योग्य वाटेल तो कोन आणि कॅमेऱ्याची जागा ते नक्की करतात. छायाचित्रकाराला जवळ जवळ कामच नसतं. कलाकार…