सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!

सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!

 चार्ली विल्सन्स वॉर. चार्ली विल्सन्स वॉर (२००७), नेटफ्लिक्स. रशियाची हेलेकॉप्टरं आणि गनशिप हवेत भिरभिरतात, रॉकेटं फेकतात. धुराचा लोट मागं सोडत अनघड अफगाण घरावर कोसळतात. धुराचे लोट. उध्वस्थ घर, सैरावैरा माणसं. अमेरिकेत चार्ली विल्सन हे काँग्रेसमन क्लबात, जाकुझीत, एका हातात ग्लास, दुसऱ्या हाती एक श्रीमंत महिला.जोआन हरिंग. हरिंग आणि चार्ली यांच्यातली सेक्समैत्री, पडद्यावर दिसते. श्रीमंत महिला सभा बोलावते.  सभेत झिया उल हक. श्रीमंत महिला हक यांचं कौतुक करते. झुल्फिकार अली भुत्तो यांना हकनी फाशी दिलेली असते हे साऱ्या जगाला माहित असतं….

Read More Read More

पुस्तक. खाजगी सैन्यांचा जमाना.

पुस्तक. खाजगी सैन्यांचा जमाना.

पुस्तकं.   खाजगी सैन्यांचा जमाना?  अफगाणिस्तान तिरीन कोट विभाग आहे. तिथं अफगाण सरकारचे कायदे कानून चालत  नाहीत. मतिउल्ला खान नावाच्या माणसाची सत्ता तिथं चालते. सरकारी योजना, सरकारी पैशाचं वाटप, नेमणुका इत्यादी गोष्टी मतीउल्ला खान हा माणूस करतो.  मतिउल्ला खानाची ही औकात आहे याचं कारण त्याच्याजवळ खाजगी सैन्य आहे. ते रीसतर सैन्य आहे आणि त्यातली भरती आणि कारभार सारं मतिउल्ला खान करतो. याच भागातून कंदाहारपर्यंत एक रस्ता जातो. या रस्त्यावरून अमेरिका आणि नेटोचं सैन्य जात असे, त्यांची रसद या रस्त्यावरून जात…

Read More Read More

वॅग्नर लेख ४. पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

वॅग्नर लेख ४. पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

प्रिगोझीननी वॅग्नर सेना मॉस्कोच्या दारात उभी केली. काही तासातच आपल्याला बंड करायचंच नव्हतं केवळ पुतीनना वस्तुस्थितीची जाणीव करुन द्यायची होती असं म्हणत पळ काढला. ही घटना साधीसुधी आहे काय? मामला आता संपलाय? या घटनेचा रशियन राजकीय स्थितीवर, पुतीन यांच्या सत्तेवर परिणाम होईल काय? प्रिगोझीनला खरोखरच काय साधायचं होतं ते कळायला मार्ग नाही. पण वॅग्नर सेना मॉस्कोकडं नेतांना त्यांनी काहीच तयारी केलेली नव्हती. सरकारला हादरवायचं असेल तर मुख्य लष्करातले लोक बरोबर घ्यायला हवेत, सरकारातले काही लोकं बरोबर घ्यायला हवेत. तसं काही…

Read More Read More

वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?

वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?

 प्रिगोझीनचा जन्म १९६१ सालचा. वयाच्या अठराव्या वर्षी त्याला चोरी करतांना लेनिनग्राड पोलिसानी पकडलं. दोन वर्षाची शिक्षा झाली. लहान वयाचे असल्यानं त्याला एका कारखान्यात काम करून शिक्षा भरून काढायची परवानगी कोर्टानं दिली,  तुरुंगवास टळला. या काळात प्रिगोझीन यांचं चोऱ्या करणं चालूच होतं. एका घरात घुसून टोळीनं वाईनचे ग्लासेस पळवले. त्यांची एक टोळी होती.  शिक्षेचा कालावधी संपल्यावर एकदा टोळी दरोडे घालायला निघाली. एका घरात घुसून त्यांनी २५० डॉलर लुटले, पळाले. नंतर ही लूट एंजॉय करायला ते रस्त्यावर हिंडत असताना एक सुंदर स्त्री…

Read More Read More

वॅग्नर लेख २ वॅग्नर सेना केवढी, कशी.

वॅग्नर लेख २ वॅग्नर सेना केवढी, कशी.

 वॅग्नर सेनेची स्थापना Dmitry Valerievich Utkin या रशियन लष्करातल्या लेफ्टनंट कर्नलनं  केली. उटकिन हिटलरप्रेमी होता. उटकिनच्या अंगाखांद्यावर स्वस्तिकं आणि नाझींच्या खुणा गोंदवलेल्या होत्या.    उटकिन रशियन सैन्यातर्फे सीरियात युद्ध करत होता. सीरियात यादवी चालली होती, बशर आसद विरोधकांची हत्याकांडं करत होता, रशियन सेना आसदना मदत करत होती. सैन्यातून निवृत्त होऊन  २०१३ साली उटकिन  रशियात परतला. लढण्याची खाज भागत नव्हती,  २०१४ साली त्यानं स्वतःची एक तुकडी तयार केली. तिचं नाव त्यानं वॅग्नर ग्रुप असं ठेवलं. वॅग्नर हे नाव कां? तर वॅग्नर…

Read More Read More

वॅग्नर सेनेनं उडवलेली धमाल. लेख क्र. १

वॅग्नर सेनेनं उडवलेली धमाल. लेख क्र. १

२३ जून २०२३ रोजी वॅग्नर सेनेनं रशियाच्या नैऋत्येला युक्रेनच्या हद्दीवरच्या Rostov-on-Don या गावातल्या रशियन सैन्याच्या ठाण्याच्या ताबा घेतला. ते ठाणं म्हणजे रशियन सैन्याचं विभागीय मुख्यालय होतं. वॅग्नर ग्रुप, वॅग्नर सेना हे एक खाजगी सैन्य आहे. वॅग्नर सेनेचे प्रमुख येवजेनी प्रिगोझीन यांनी जाहीर केलं की त्यांचं सैन्य रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेनं कूच करणार आहे. एका खाजगी सेनेनं एका देशाची राजधानी ताब्यात घ्यायचं जाहीर केलं होतं. वॅग्नर कोणत्याही देशाचं सैन्य नाही. या सैन्यात नेमके किती सैनिक आहेत माहित नाही पण ३० ते…

Read More Read More

सिनेमा. बस्टर कीटनची धमाल हसवणूक.  

सिनेमा. बस्टर कीटनची धमाल हसवणूक.  

यू ट्यूबवर दी जनरल नावाचा एक चित्रपट आहे. चित्रपट १९२६ सालातला आहे. मूकपट. बस्टर कीटन दिक्दर्शक.  एकाच वाक्यात सांगता येईल. हसता हसता मुरकुंडी वळते.  चित्रपट निव्वळ विनोदी आहे? जॉनी ग्रे नावाचा एक इंजिनियर आहे. इंजिनियर म्हणजे इंजीन चालवणारा माणूस. तो जनरल नावाचं इंजिन चालवतो. जनरलवर त्याचं प्रेम आहे. अमेरिकेतली यादवी सुरु होते. दक्षिण विरुद्ध संघराज्य अशी लढाई. जॉनी जॉर्जिया या दक्षिणेतल्या राज्यातला.  सैन्यात भरती होऊन लढायला जाणं हे कर्तव्य आणि फॅशन होते. जो न जाईल त्याच्याकडं लोक तिरस्कारानं पहात. जॉनी…

Read More Read More

पुस्तक.   हिटलरची तळी उचलून धरणारे पेपर सम्राट .

पुस्तक.   हिटलरची तळी उचलून धरणारे पेपर सम्राट .

The Newspaper Axis: Six Press Barons Who Enabled Hitler  ❖ शीर्षकातच पुस्तकाचा विषय आहे. ब्रीटन आणि अमेरिकेतले हिटलरला समर्थ करणारे सहा पेपर सम्राट. हिटरलचा उदय झाला तेव्हांपासून ब्रीटन आणि अमेरिकेतल्या बलाढ्य आणि अमेरिकन नागरिकांचं मत तयार करणाऱ्या सहा मालकांनी हिटलरचं कौतुक केलं. त्याच्यामुळं जर्मनीचा विकास झाला, जर्मनी श्रीमंत झाला असं या पेपरांनी वाचकांना सांगितलं.उदयापासूनच हिटलरनं ज्यूंना कसं वाईट वागवलं, कम्युनिष्ट व इतर कामगार-गरीबांची बाजू घेणाऱ्यांना कसं वागवलं आणि लोकशाही कशी खतम केली या बाबी या मालकांनी दुर्लक्षिल्या. पहिल्या महायुद्धानंतर व्हर्साय करारात जर्मनीवर…

Read More Read More

सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट

सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट

सिनेमा. सिटिझन फोर सरकारची कुलंगडी बाहेर काढणं म्हणजे देशद्रोह. लॉरा पॉइट्रसला निनावी निरोप आला, भेटायचंय. पॉईट्रस सामाजिक प्रश्नांवर माहितीपट करतात. निरोप देणाऱ्यानं आपलं नाव वा ठावठिकाणा सांगितला नाही.  मेसेजेस यायला लागले. मेसेज एनक्रिप्टेड असत. वाचता येत नसत. निरोप पाठवणारा आपण कोण आहे ते सांगत नसे, फोनवर स्वतः बोलायला तयार नसे.  एके दिवशी तो माणूस फोनवर बोलला. नाव सांगितलं नाही. ‘तू माझ्यावर फिल्म करावीस असं मला वाटतं.  सरकार  नागरिकांवर बेकायदा पाळत ठेवतं याला तू विरोध करतेस. त्यामुळं मला वाटलं की मी…

Read More Read More

पुस्तकं. स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे.

पुस्तकं. स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे.

स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे. BROKEN YARD: THE FALL OF THE METROPOLITAN POLICE. TOM HARPER. || ‘यार्ड पोलिस संस्था वांशिक आणि लैंगिक पूर्वग्रहानं ग्रासलेली आहे, भ्रष्ट झाली आहे’ असं स्कॉटलॅंड यार्ड या नामांकित पोलिस यंत्रणेचे प्रमुख लेन लिविंगस्टन म्हणतात. एका पत्रकार परिषदेत नुकतीच त्यांनी वरील कबुली दिली. लंडनची  पोलीस व्यवस्था या विभागाकडं असते. स्कॉटलँड यार्डला मेट पोलिस किंवा मेट्रो पोलिस असंही म्हणतात. १८३० साली स्थापन झालेल्या या पोलिस खात्याचा फार लौकिक झाला, शेरलॉक होम्सनं स्कॉटलँड यार्डला जगाच्या नकाशावर…

Read More Read More