१९३० सालचा चित्रपट. आजही आवडतो.

१९३० सालचा चित्रपट. आजही आवडतो.

‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट ‘  १९३०. हां. विषय  २०२३ साली ऑस्कर मिळवलेल्या ‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट ‘ चा नाहीये. विषय आहे  १९३० साली झालेल्या ‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’ चा. दोन्ही फिल्मचं कथानक एकच आहे. ज्या पुस्तकावरून चित्रपट रचलाय ते पुस्तकही एकच आहे. फक्त चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट वेगळी आहे, चित्रपटाची हाताळणी आणि शैली वेगळी आहे. पॉल, कॅट व इतर तरूण राष्ट्रवादानं भारून जातात, युद्धावर जातात. पॉल, कॅट (व इतर १.७ कोटी माणसं)…

Read More Read More

पुस्तकं स्टिल पिक्चर्स जेनेट माल्कम

पुस्तकं स्टिल पिक्चर्स जेनेट माल्कम

 ‘ स्टिल पिक्चर्स’  हे जेनेट माल्कम या गाजलेल्या लेखिका-बातमीदार यांचं आत्मचरित्र आहे.   माल्कमनी १९६३ साली न्यू यॉर्करमधे लिहायला सुरवात केली आणि मृत्यूपर्यंत म्हणजे २०२१ सालापर्यंत त्या न्यू यॉर्करमधे लिहित होत्या. त्यांची १३ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.त्यांचं JOURNALIST AND THE MURDERER हे पत्रकारी या विषयावरचं पुस्तक गाजलं, अमेरिकेत ते पत्रकारी अभ्यासक्रमामधे शिकवलं जातं.  जेनेट माल्कम झेक ज्यू होत्या. बुडापेस्टमधे त्या रहात.वडील यशस्वी डॉक्टर होते. माल्कम यांचं कुटुंब सुखी होतं. नाझी अत्याचार सुरू झाल्यावर १९३९ साली त्यांचं कुटुंब अमेरिकेत स्थलांतरीत झालं….

Read More Read More

पुस्तकं. सम्राट अलेक्झांडर. दंतकथा.

पुस्तकं. सम्राट अलेक्झांडर. दंतकथा.

आज २०२३ या सालात ग्रीक-मॅसिडोनियन सम्राट अलेक्झांडरच्या  मृत्यूला २३०० वर्षं झाली. अजूनही ॲलेक्झांडरवर संशोधक पुस्तकं लिहीत आहेत. Alexander the Great:The Making of a Myth हे पुस्तक नुकतंच म्हणजे २०२२ साली Richard Stoneman या संशोधकांनी संपादित केलंय.  लंडनमधल्या ब्रिटीश म्युझियमनं अलेक्झांडरची पुण्यतिथी हेरून महिनाभराचा उत्सव आखला होता त्यासाठी मुद्दा हे पुस्तक संपादित करण्यात आलं. म्युझियमनं २५ देशातून विविध वस्तू, शिल्पं, चित्रं इत्यादी गोळा केली; ॲलेकबद्दलची २१ भाषांतली पुस्तकं गोळा करून प्रदर्शनात मांडली गेली. पुस्तकात नामांकित संशोधकांचे लेख एकत्रीत केलेले आहेत. खुद्द…

Read More Read More

ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत. 

ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत. 

ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत.    २०२३ च्या ऑस्कर स्पर्घेक लिविंग या चित्रपटाला ॲडॉप्टेड पटकथा आणि अभिनय या वर्गांत नामांकनं मिळालीत. अभिनय William Nighy यांचा आहे आणि पटकथा Kazuo Ishiguro यांनी लिहिलीय. नाई यांना अभिनयाचं पारितोषिक मिळायला हरकत नाही. या चित्रपटामागं बराच इतिहास आहे. १८८६ साली टॉलस्टॉयनी The Death of Ivan Ilych या नावाची एक छोटी कादंबरी लिहिली होती. या कथेतून प्रेरणा घेऊन अकिरा कुरोसावा या जपानी दिक्दर्शकानं १९५३ साली इकुरू (Ikuru-जगणं-to live) या नावाचा चित्रपट केला. इकुरुचीच गोष्ट…

Read More Read More

ऑस्कर २०२३. ब्लाँड. मेरिलिन मन्रो. भरपूर सेक्स, विचार करायला लावतो.

ऑस्कर २०२३. ब्लाँड. मेरिलिन मन्रो. भरपूर सेक्स, विचार करायला लावतो.

ऑस्कर २०२३. ब्लॉंड.  यंदाच्या ऑस्करमधे अभिनयाचं नामांकन आहे. चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे. मेरिलीन मन्रो या गाजलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीची शोकांतिका. मेरिलीन मन्रो ही हॉलीवूडमधली एक गाजलेली अभिनेत्री. तिचा अभिनय यथातथाच असे पण ती दिसत असे खास. मादक सौंदर्य. १९५०-६० च्या दशकात हॉलीवूडमधले सिनेमे भारतात फारसे पहायला मिळत नसत. तरीही मन्रो भारतात  लोकप्रीय होती.  मन्रोचा जन्म १९२६ साली,१९६२ साली अती ड्रग सेवनानं  मृत्यू.   दहा बारा वर्षाचं फिल्मी लाईफ म्हणजे फार नव्हे. तरीही मन्रो गाजली,  तिच्या सेक्सी सिग्नेचर प्रतिमेनं अमेरिकेला वेड लावलं. रस्त्यावर…

Read More Read More

ऑस्कर २३. देखणा, विचार करायला लावणारा Tár

ऑस्कर २३. देखणा, विचार करायला लावणारा Tár

देखणा, विचार करायला लावणारा ‘टार’. लीडिया टार असं नाव असलेलं एक काल्पनिक व्यक्तिमत्व प्रस्तुत टार या चित्रपटात रंगवलंय. टार नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वात नसली तरी आपण तिला पाहिलंय, भेटलोय असं वाटावं अशी ही टार आहे. टार संगितकार आहे. पश्चिमी संगित विश्वात एक कंडक्टर असतो, तो वाद्यवृंदाकडून नामांकित संगितकारांच्या रचना वाजवून घेतो. बीथोवन, बाख, चायकोवस्की, माहलर इत्यादी. अनेक वाद्यं, अनेक वादक. त्यांच्याकडून रचना वाजवून घेणं हे कौशल्य असतं. कंडक्टरला समाजात प्रतिष्ठा असते. बर्लीन फिलहार्मोनिक ही ऑपेरा-संगितातील एक नंबरची संस्था मानली जाते….

Read More Read More

युद्धातलं वास्तव दाखवणारा ऑस्करवाला चित्रपट

युद्धातलं वास्तव दाखवणारा ऑस्करवाला चित्रपट

सिनेमा. ऑस्कर २०२३. ‘ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’. हा पहिल्या महायुद्धाच्या शेवटल्या काळावर आधारलेला जर्मन चित्रपट २०२३ च्या ऑस्कर स्पर्धेत आहे.  चित्रपटाला खंडीभर ऑस्कर नामांकनं आहेत. पहिल्या महायुद्धातलं जर्मन सैन्य हा चित्रपटाचा विषय आहे. अलिकडं फ्रेंच, ब्रिटीश, कतारी वाहिन्यांवर जर्मनी, हिटलर, दोन्ही महायुद्ध या विषयावर माहितीपट दाखवले जात आहेत. माणसं मागं वळून महायुद्ध, जर्मनी, हिटलर, ज्यू नरसंहार या विषयांकडं पाहू लागलेत. एकेकाळी या विषयांकडं देशांमधे देशभावनेनं पाहिलं जात असे. अलीकडं देशभावनेच्या पलिकडं जाऊन घटना पाहिल्या जातात. महायुद्धात ब्रिटीश जिंकले,…

Read More Read More

सिनेमा. ऑस्कर २०३३. ‘अर्जेंटिना १९८५’

सिनेमा. ऑस्कर २०३३. ‘अर्जेंटिना १९८५’

Argentina 1985.  Netflix. ऑस्करच्या यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिना १९८५ हा चित्रपट इंग्लिशेतर भाषांतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळवून सामिल झालाय. चित्रपट स्पॅनिश भाषेत आहे. १९८५ साली लष्करी अधिकाऱ्यांवर बेकायदेशीर अत्याचारांचा खटला झाला. त्या खटल्यावर चित्रपट आधारलेला आहे. असंही म्हणता येईल की १९८५ नंतर अर्जेंटिन चित्रपट सृष्टीत नवं युग सुरू झालं. सुमारे शंभर वर्षाचा इतिहास अर्जेंटिन चित्रपट व्यवसायाला आहे आणि १९८५ पर्यंतचे चित्रपट साधारणपणे कोमट म्हणता येतील अशा रुपाचे असत. अर्जेटिना स्वतंत्र झाल्यापासून (१८१६) अर्जेंटिना सतत घालमेलीत अडकलेलं होतं. आर्थिक प्रश्न, क्रांत्या,…

Read More Read More

पुस्तक. प्लेगनं मानवी जीवनाला वळण लावलं

पुस्तक. प्लेगनं मानवी जीवनाला वळण लावलं

ब्लॅक डेथ हे पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झालंय.  या पुस्तकात १३४७ ते १३५२ या काळात झालेल्या प्लेगच्या महासाथीचा अभ्यास आहे. या कालखंडालाच ब्लॅक डेथचा कालखंड म्हणतात. त्या आधी इसवी ५४१ मधे प्लेगची एक साथ होऊन गेली होती. या दोन्ही साथींचा अभ्यास प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.   तुम्ही विचाराल, की चौदाव्या शतकातल्या साथीवरचं २००४ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आता कां वाचावं? वाचावं,  कारण त्यातून साथ या आरोग्य संकटातून समाज काय शिकला ते कळतं. नुकतीच कोविडची साथ येऊन गेली आणि समाज त्यातूनही…

Read More Read More

वाSSळवी, वाSSळवी.

वाSSळवी, वाSSळवी.

वाळवी. वाळवी हा परेश मोकाशी यांचा चौथा चित्रपट. माध्यमांत या चित्रपटावर जोरदार चर्चा चाललीय. चित्रपटाला लेबलं लावली जातायत. कॉमेडी, रहस्यम कॉमेडी, ब्लॅक कॉमेडी. पहाणाऱ्याचा जसा अनुभव, दृष्टी, जगणं, तसं लेबल. सुरवातीला एक काहीसं अशक्त मार्केटिंग झालं.तेही चुकीचं. पोस्टर केलंय ते इतकं बंडल आहे की त्यावरून काही पत्ता लागत नाही. एका कोचावर तिघं बसलेत आणि त्या कोचाचा एक पाय मोडलाय आणि तिघं कोसळत आहेत. किती निर्बुद्ध.  मराठी चित्रपट आहे, मराठी माणसानं तो उचलून धरला पाहिजे, आपण मराठी माणसंच मराठीच्या कसे विरोधात…

Read More Read More