जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

भाग १. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ७ ते ११ नव्हेंबर इतका काळ चालली.  देगलूर, नांदेड, नायगाव ही शहरं; वन्नाळी, अटकळी, भोपाळा, रामतीर्थ, धुप्पा, हिप्परगा (माळ)नरसी,नायगाव, पार्डी इत्यादी दहाबारा छोटी गावं या मार्गात होती. राहूल गांधी नांदेडमधे १२५ किमी चालले. ६ विधानसभा मतदारसंघ आणि ३ लोकसभा मतदार संध या यात्रेत होते. सकाळी यात्रा सुरू होत असे, दुपारी विश्रांती. संध्याकाळी यात्रेचा दुसरा टप्पा. रात्री विश्रांती.  सकाळी एक नाका सभा, संध्याकाळी एक नाका सभा, दुपारी पत्रकार परिषद आणि निवडक लोकांशी चर्चा. रात्री एकादी मोठ्ठी जाहीर सभा. अशी…

Read More Read More

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

क्राऊन या मालिकेचा पाचवा सीझन सुरु झाला आणि पहिल्याच दिवशी ११ लाख ब्रिटिशांनी तो पाहिला. अर्थात नंतरही ही मालिका पाहिली जाणार आहे. सीझन ब्रिटीश राणीच्या जीवनावर असल्यानं तो  ब्रिटीश माणसं चवीनं पहाणार, पण या मालिकेच्या देखणेपणामुळं जगातले इतरही लोक ती चवीनं पहात आहेत. जगभरच्या लोकांना ती पहावीशी वाटतेय कारण ती चटकदार आहे, तिच्यात थरार आहे, तिच्यात राजकारणाचे पृष्ठभागाखालचे थर पहायला मिळतात.अर्थात हेही सत्य आहे की इतिहास माहीत असायला हवा. पाचव्या सीझनमधे आपल्याला युवराज चार्ल्स, राणीला सिंहासानावरून उतरवायचा प्रयत्न करतोय असं…

Read More Read More

एका गुंडाला अमेरिकन मतदारांनी रोखलं

एका गुंडाला अमेरिकन मतदारांनी रोखलं

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन या पक्षांना सेनेटमधे(संसदेचं वरिष्ठ सदन) समसमान जागा मिळाल्यात. काँग्रेसमधे (संसदेचं कनिष्ठ सदन) रिपब्लिकनांना सुमारे १५ जागा अधिक मिळाल्या आहेत. काही जागांचे निकाल अजून बाकी आहेत. परंतू एकूणात जीत आणि हार यातला फरक नगण्यच असेल.  निवडणुकपूर्व स्थिती आणि अंदाज सांगत होते की रिपब्लिकनांकडं मतांचा पूर येईल. काही रिपब्लिकन धार्जिणे गट सांगत होत की नुसता पूर नव्हे तर सुनामी येईल आणि डेमॉक्रॅटिक पक्ष वाहून जाईल. तसं झालेलं दिसत नाही. रिपब्लिकनांना अपेक्षा होती तेवढी मतं मिळालेली नाहीत….

Read More Read More

जफर पनाही या इराणी दिक्दर्शकानं तुरुंगात राहून केलेला चित्रपट

जफर पनाही या इराणी दिक्दर्शकानं तुरुंगात राहून केलेला चित्रपट

इराणचे दिक्दर्शक जफर पनाही यांचा नो बेअर्स हा चित्रपट नुकताच न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात दिसला, गाजला. चित्रपटाचं कौतुक झालं. चित्रपटाची गोष्ट, चित्रपटाची रचना आणि चित्रपट प्रदर्शित होणं या तीनही गोष्टी नाट्यमय आणि थरारक आहेत. चित्रपटात दोन इराणी जोडपी आहेत. एक जोडपं आहे इराणच्या हद्दीपासून काही अंतरावर तुर्कीमधे. जोडप्यातल्या तरूणानं आपल्या प्रेयसीसाठी  एक बनावट पासपोर्ट आणि व्हिसा मिळवलाय. तो प्रेयसीला सांगतोय की तिनं पॅरिसला जावं, यथावकाश त्याला व्हिसा मिळेल तेव्हां तो पॅरिसला जाईल. तिला ते मंजूर नाहीये. ती जायला तयार नाहीये, एकदमच…

Read More Read More

संकटं पाठुंगळीला घेऊन ऋषी सुनाक प्रधान मंत्री झालेत.

संकटं पाठुंगळीला घेऊन ऋषी सुनाक प्रधान मंत्री झालेत.

ऋषी सुनाक नावाचा एक बिगर ख्रिस्ती,  बिगर ब्रिटीश माणूस युकेचा प्रधान मंत्री झालाय. युकेच्या इतिहासात उद्भवलेल्या अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांना देशाचं प्रमुखपद मिळालंय. युकेची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. एका परीनं ती परिस्थिती प्रातिनिधीक आहे, जगभरचे बहुतेक देश आर्थिक संकटात आहेत. महागाईमुळं देशोदेशीच्या जनतेला जगणं मुश्कील झालंय. महागाईपाठोपाठ मंदी येतेय. मंदीबरोबरच बेकारी येतेय. बेकारीबरोबरच विषमता येतेय. साऱ्या जगाला या संकटाला तोंड देणं जड जातंय. त्यामुळंच ऋषी सुनाक संकटाला कसं तोंड देताहेत ते जग पहाणार आहे. युकेमधली संकट मालिका  बोरीस जॉन्सन २०१९ साली  भरघोस…

Read More Read More

‘चुप’ आणि ‘कंतारा’

‘चुप’ आणि ‘कंतारा’

कंतारा नावाचा सिनेमा सध्या मुंबईतल्या अनेक सिनेमाघरात चाललाय. ऋषभ शेट्टी नावाच्या माणसानं या सिनेमात आपली हौस भागवून घेतलीय. शेकडो नव्हे हजारो वर्षांची जुनी दंतकथा त्यानं थेट २०२२ मधे आणून ठेवलीय. देव, पौराणीक माणसं ते थेट फॉरेस्ट ऑफिसर आणि जंगलात रहाणारी माणसं आणि गावातला एक भ्रष्ट बटबटीत पुढारी.कथा त्याची, दिक्दर्शन त्याचं, हीरोही तोच. हीरो नावाच्या भूमिकेला ज्या ज्या करामती करून लोकांचं लक्ष वेधावं लागतं त्या साऱ्या करामती; सेक्स, मारामारी, विनोद, रेडा शर्यत, राजकीय नेतृत्व; सारं सारं शेट्टीनं या सिनेमात कोंबलंय. तोच…

Read More Read More

सिद्धांताला व्यवहाराची जोड देऊ पहाणारे गोर्बाचेव

सिद्धांताला व्यवहाराची जोड देऊ पहाणारे गोर्बाचेव

कम्युनिझमला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणारे, कम्युनिष्ट विचाराला लोकशाही आचाराची जोड देणारे मिखाईल गोर्बाचेव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचं वय ९१ होतं.   पेरेस्त्रोएका (खुलेपणा) आणि ग्लासनोस्त ( पुनर्रचना) अशा दोन गोष्टी त्यांनी घडवल्या. रशियातल्या कम्युनिष्ट राज्यव्यवस्थेला त्यांनी लोकशाही वळण दिलं, रशियाची अर्थव्यवस्था मूलतः समाजवादी ठेवत ती बाजाराच्या अधिक जवळ नेली. असं म्हणूया की तसा प्रयत्न त्यानी केला. गोर्बाचेव समाजवादी होते आणि कम्युनिझमवर त्यांचा विश्वास होता.  समाजवाद आणण्यासाठी लोकशाही असणं आवश्यक आहे असं त्याना रशियाच्या मागील अनुभवावरून वाटलं.   रशियातल्या कम्यूनिष्ट क्रांतीनंतर स्टालीननं पक्षाचा…

Read More Read More

नाटक आणि सिनेमा

नाटक आणि सिनेमा

नाटकाचा सिनेमा सरत्या २०२१ मधे जोएल कोएनचा  दी ट्रॅजेडी ऑफ मॅक्बेथ न्यू यॉर्कच्या काही सिनेघरात  प्रदर्शित झाला १६१० मधे मॅक्बेथचा प्रयोग (पहिला?) लंडनच्या ग्लोब नाटकघरात झाला होता. चारशे दहा वर्षाच्या काळात मॅक्बेथचे अगणित प्रयोग जगभरात झाले. अगणीत भाषांत मॅक्बेथची भांषांतरं आणि रुपांतरं झाली. सिनेमाचं सुरु झाल्यावर मॅक्बेथवर आणि मॅक्बेथच्या रुपांतरावर इंग्रजीत आणि जगभरच्या इतर भाषात शंभरपेक्षा जास्त सिनेमे झाले. नाटकातल्या आणि सिनेमातल्या लोकांना आयुष्यात कधी तरी शेक्सपियर करावा, कधी तरी मॅक्बेथ करावा असं वाटतंच. प्रत्येकाला ते एक आव्हान वाटतं. मॅक्बेथमधले संवाद आणि…

Read More Read More

इराणी स्त्रियांचा सरकारी अरेरावीला विरोध

इराणी स्त्रियांचा सरकारी अरेरावीला विरोध

इराणमधे स्त्रिया रस्त्यावर आल्या. त्यानी बुरखे काढून फेकले, बुरख्यांची होळी गेली. अनेक स्त्रियांनी केस कापले, कापलेले केस सरकारला अर्पण केले.  तिथल्या सरकारला स्त्रियांचं हे वागणं पसंत नाही. तिथलं सरकार थियोक्रॅटिक आहे. इराण हे धर्मराष्ट्र आहे. तिथल्या इमामांना जो काही इस्लाम समजतो त्या इस्लामवर इराण चालतो. इस्लाम वगळता इतर धर्म इराणला मान्य नाहीत, समाज इस्लामी धर्मविचारानंच  चालला पाहिजे असं इराणी सरकारला वाटतं.  धर्माला सार्वजनिक जीवनात मर्यादित स्थान असावं असं मानणाऱ्या विचाराला इराणमधे थारा नाही. इराणच्या इमामांना समजलेल्या इस्लामनुसार  स्त्रियांचे केस पुरुषांना दिसले तर पुरुषांची…

Read More Read More

पिकलेलं पान गळलं

पिकलेलं पान गळलं

युकेच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर सारं जग बदललं. साम्राज्य कोसळली. जगात मुक्तअर्थव्यवस्था विकसली. शहरं वाढली. संस्कृतीला उद्योगानी विळखा घातला. अशा नव्या जगाच्या पहाटे १९५२ साली एलिझाबेथ एका विरघळत जाणाऱ्या साम्राज्याच्या अवशेषाच्या राणी झाल्या. राणी बऱ्याच आजारी आहेत याचा सुगावा ७ सप्टेंबर रोजी लागला. तिथून राणी हा विषय माध्यमात आला. १९ सप्टेंबर रोजी त्यांची शवपेटी तळघरात सुरक्षित ठेवली गेली तोपर्यंत म्हणजे  जवळपास १२ दिवस जगभरच्या माध्यमांत राणी हा विषय होता. बीबीसीनं जवळजवळ चोविस तास…

Read More Read More