अग्नीवीर. चिमूटभर प्रयत्न करून पसाभर काम केल्यासारखं दाखवणं.

अग्नीवीर. चिमूटभर प्रयत्न करून पसाभर काम केल्यासारखं दाखवणं.

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमुळं अग्निवीर रोजगार योजनेचा विषय मागे पडला आहे. देशाच्या लष्कराच्या तीनही शाखांत मिळून ४७ हजार तरुणाना चार वर्षांसाठी दिल्या जाणाऱ्या रोजगार योजनेची चर्चा संसदेत झाली नव्हती. लष्करातही त्यावर काय विचार झाला ते कळायला मार्ग नाही.  अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या योजनेबद्दल शंका आणि असमाधान व्यक्त केलं होतं.  अचानक सरकारनं योजना जाहीर केली आणि वाद सुरु झाल्यावर सैन्य प्रमुख प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची भलामण केली. आजवर कधी अशी घटना घडली नव्हती.  या योजनेचा लष्कराला किती फायदा आहे? एका…

Read More Read More

घाशीराम शिंदे

घाशीराम शिंदे

रहस्यपटात शोभेल असं नाट्य महाराष्ट्रात घडलं. १०५ आमदार असलेल्या भाजपनं ३० फुटीर सेना आमदारांचं सरकार करायला पाठिंबा दिला, सरकार तयार केलं. तांत्रीक दृष्ट्या फुटीर आमदारांचा गट सेनेचा आहे की नव्या कुठल्याशा पक्षाचा असेल की भाजपत दाखल झालेला असेल ते या क्षणी कळायला मार्ग नाही. घडलंय ते येवढंच की एकनाथ शिंदे या सेनेच्या आमदारानं सेनेचे आमदार गोळा केले आणि भाजपशी संगनमत करून सरकार स्थापन केलं. ३० माणसांच्या सरकारचा मुख्यमंत्री आणि १०५ माणसांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन झालंय. या ३० माणसांपैकी…

Read More Read More

प्रतिक हा फक्त देखावा, ती वापरणाऱ्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो.

प्रतिक हा फक्त देखावा, ती वापरणाऱ्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो.

एकनाथ शिंदे शिव सेनेतून बाहेर पडले. काल परवापर्यंत ते शिव सेनेतले नेते-कार्यकर्ते होते. त्यांनी सेनेत विविध पदांवर काम केलं, नंतर ते मंत्रीही झाले. बाहेर पडल्यावर त्यांचं काय होईल? त्यांची संघटना कोणती असेल? शिव सेना की भारतीय जनता पार्टी? लवकरच कळेल. बाहेर पडल्यावर ते कुठल्या तरी पार्टीसाठी, चिन्हावर निवडणुक लढवतील. निवडून आले तर मंत्री होतील. शिंदे यांचं म्हणणं आहे की ते सेना, बाळ ठाकरे, शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांच्याशी प्रामाणीक आहेत, तीच त्यांची प्रतिकं आणि आदर्श आजही असतील. त्यांचं म्हणणं असं…

Read More Read More

लोकशाहीचा वापर करून लोकशाहीची ऐशी की तैशी

लोकशाहीचा वापर करून लोकशाहीची ऐशी की तैशी

२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत मतदान झालं, त्यात डोनल्ड ट्रंप यांचा पराजय झाला. ट्रंप अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या गव्हर्नरांना सांगितलं की निकाल रद्द करा, कुठूनही मतं गोळा करा पण मला निवडून आणा.  टीव्हीवर ते म्हणाले की वोटिंग मशीनवर त्याच्या नावाचं बटण दाबलं की मत बायडन यांना जातं, पोष्टानं बोगस मतं पाठवण्यात आलीत. माझं यश, निवडणूक, चोरण्यात आलीय असा धोशा त्यांनी लावला. निवडणूक यंत्रणेनं आरोपात तथ्य नसल्याचं प्रमाणित केलं. ट्रंपांच्या प्रचाराची दखल न घेता निवड प्रक्रिया  प्रक्रिया पूर्ण झाली आणि निकालावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ६ जानेवारीला…

Read More Read More

नैतिक अधिकार गमावलेला पंतप्रधान खुर्चीत टिकला

नैतिक अधिकार गमावलेला पंतप्रधान खुर्चीत टिकला

सत्ताधारी कंझर्वेटिव पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सनना पाठिंबा दिला; १४८ खासदारांनी विरोध केला. जॉन्सन वाचले. # राणीच्या राज्यारोहणाचा सत्तराव्वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मोठ्ठा ईवेंट लंडनमधे चालला होता. पंतप्रधान या नात्यानं बोरिस जॉन्सन आपल्या पत्नीसह इवेंटच्या जागी पोचले. तिथं जाण्याआधी काही मिनिटं त्यांना माहिती देण्यात आली होती की त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करणाऱी ६१ खासदारांची पत्रं गोळा झाली आहेत; कंझर्वेटिव पक्षाच्या खासदारांची बैठक भरवली जाईल आणि तिथं त्यांच्यावरचा अविश्वास चर्चिला जाईल. जॉन्सन यांच्यावर या माहितीचा काहीही परिणाम…

Read More Read More

अनेक. पोलिटिकल थ्रिलर.

अनेक. पोलिटिकल थ्रिलर.

‘ अनेक ‘ या नावाचा सिनेमा आला आणि गेला. पोलिटिकल थ्रिलर.  किती लोकांना पाहिला कुणास ठाऊक. माझ्या जवळच्या सिनेघरात एकच शो होता. रविवार असूनही सिनेघरात मी धरून २३ लोक होते. त्यातले दोघे जण जेमतेम मध्यंतरापर्यंत होते, मध्यंतरात बाहेर पडले ते गुलच झाले. बाहेर पडताना ते सिनेमाला शिव्या देत होते. शिव्या म्हणजे शिव्या. त्यांना सिनेमात काय आहे ते कळत नव्हतं. ते स्वाभाविकच म्हणायला हवं. एका जॉन्सन नावाच्या माणसाचा सतत उल्लेख येतो आणि जॉन्सन काही दिसत नाही. सिनेमाच्या टोकाला उलगडत की जॉन्सन…

Read More Read More

क्वाड बैठक. भारतासमोरचा पेच. गटात की स्वतंत्र.

क्वाड बैठक. भारतासमोरचा पेच. गटात की स्वतंत्र.

क्वाड या अनौपचारीक गटाची बैठक जपानमधे पार पडली. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार सदस्य  देशांचे प्रमुख बैठकीत हजर होते.  बैठकीत औपचारीक ठराव मंजूर झाले, देशांच्या प्रमुखांच्या खाजगी बैठका झाल्या,  बैठकांचे औपचारिक वृत्तांत प्रसिद्ध झाले. एकमेका सहाय्य करू (आर्थिक, तंत्रवैज्ञानिक, पर्यावरण हे मुद्दे) असं चारही देश बोलले. खरा मुद्दा होता तो चीनला वेसण घालण्याचा. खरं म्हणजे चीनवर अंकुष ठेवण्यासाठीच हा गट स्थापन झाला आहे. चीन आशियात हातपाय पसरतो आहे. भारत आणि लंका या चीनच्या बाजारपेठा आहेत, तिथं चीनची खूप गुंतवणूक आहे. ऑस्ट्रेलियातून…

Read More Read More

गोऱ्या तरूणानं १० काळ्यांना कां ठार केलं?

गोऱ्या तरूणानं १० काळ्यांना कां ठार केलं?

पेटन जेंड्रन. वय वर्षे १७.  दोनशे मैलांचा प्रवास करून १३ मे रोजी बफेलो या गावात पोचला. टॉप्स या वाणसामानाच्या दुकानात जाऊन त्यानं रेकी केली. किती माणसं येतात, कसकशी येतात, गाड्या कुठं थांबवतात वगैरे. १४ मे रोजी दुपारी २.५ च्या सुमाराला तो टॉप्स दुकानाशी पोचला. त्यानं अंगावर लष्करी कपडे घातले होते आणि बुलेट प्रूफ जॅकेटही घातलं होतं. त्याच्याकडलं एक पिस्तूल आणि एक गन त्यानं गाडीतच ठेवली. बुशमास्टर ही सेमी ऑटोमॅटिक गन हातात घेतली. दुकानाच्या बाहेरच त्यानं गोळीबाराला सुरवात केली. दुकानात घुसून…

Read More Read More

आणखी एक खोटारडा राष्ट्रपती झालाय, फिलिपिन्समधे.

आणखी एक खोटारडा राष्ट्रपती झालाय, फिलिपिन्समधे.

१९८६ साली फर्डिनंड मार्कोस, त्या वेळेचे फिलिपिन्सचे अध्यक्ष, देश सोडून हवाई बेटांत पळून गेले. कारण त्यांनी केलेला घोर भ्रष्टाचार उघड झाला होता, जनता रस्त्यावर उतरली होती, पोलिसही   त्यांचं लोकांच्या रागापासून संरक्षण करू शकत नव्हते. पळून जाताना मार्कोस पंचवीस रांजण भरून सोनं आणि पंचवीस खोके भरून रोख रक्कम बरोबर नेली होती. पळून जाताना त्यांचा मुलगा बाँगबाँग मार्कोस त्यांच्या सोबत होता. मार्कोसनी सत्ता सोडल्यावर त्यांचा रहाता राजवाडा लोकाना पहायला मिळाला. घरातल्या नळाच्या तोट्या, दिव्याची बटणं, दरवाजांच्या कड्या, बाथ टब इत्यादी साऱ्या गोष्टी सोन्याच्या…

Read More Read More

जहांगीरपुरी आणि खरगोन. बुलडोझर.

जहांगीरपुरी आणि खरगोन. बुलडोझर.

१० एप्रिलला राम नवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातल्या खरगोनमधे हिंदू आणि मुसलमान गटांमधे चकमक उडाली. दगडफेक झाली. दोन्ही बाजूची माणसं आणि पोलीस जखमी झाले. दोन्ही धर्मियांनी एकमेकावर हिंसा केल्याचा आरोप केला. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकावर चकमक घडवून आणल्याचा आरोप केला. एक दिवस संचारबंदी झाली. तिसऱ्या दिवशी खरगोनमधल्या मुस्लीम वस्तीवर बुलडोझर चालला. दुकानं, घरं, बुलडोझरनं जमीनदोस्त केली. राम नवमीच्या चकमकीची कायदेशीर चौकशी झाली नव्हती. चकमकीत दोन्ही धर्माची लोकं होती. पण मुसलमानांना जबाबदार धरून त्यांची वस्ती जमीनदोस्त करण्यात आली….

Read More Read More