काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस……

काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस……

अश्वनी कुमारनी काँग्रेस सोडली. ते चाळीस वर्षं काँग्रेसमधे होते, काही काळ मंत्री होते.ते पंजाबी आहेत. पंजाबमधून ते राज्यसभेवर निवडून येत असत. पंजाबमधे निवडणुकीचा मोसम असताना त्यानी राजीनामा दिलाय. त्यांच्या काँग्रेस पक्षाला पंजाबात उतरती कळा लागल्याची पार्श्वभूमी पक्षत्यागाला आहे. काही दिवस आधी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडलाय आणि एक स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय. १९८४ साली अमरिंदरनी काँग्रेस सोडली होती, एक वेगळा अकाली दल पक्ष स्थापन केला होता. नंतर यथावकाश त्यांनी त्यांचा अकाली दल काँग्रेसमधे मिसळला आणि ते काँग्रेसचे मुख्यमंत्री…

Read More Read More

सावरकर, मंगेशकर, मोदी.

सावरकर, मंगेशकर, मोदी.

सावरकर, मंगेशकर, मोदी. नुकताच एक वाद झाला. वादाचं मुळ होतं नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतलं भाषण. भाषणात मोदी म्हणाले की हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या गाण्याला संगीतबद्द केल्याबद्दल त्यांना आकाशवाणीनं शिक्षा दिली, नोकरीतून काढून टाकलं. तो काळ काँग्रेस सरकारचा होता, नेहरू पंतप्रधान होते. मोदींचं म्हणणं होतं की नेहरू (काँग्रेस) सावरकरविरोधी होते, हिंदुत्वविरोधी होते आणि त्यांच्या दबावाखाली हृदयनाथ मंगेशकरांवर अन्याय झाला. यातलं तथ्थ्य काय? सुधीर गाडगीळ यानी हृदयनाथ मंगेशकरांकडं या बाबत विचारणा केली. मंगेशकर म्हणाले की १९५७ साली ते आकाशवाणीत नोकरीला नव्हते; मंगेशकर…

Read More Read More

पक्षघरांना दारं नाहीतसं दिसतंय.

पक्षघरांना दारं नाहीतसं दिसतंय.

भाजपचा पुढारी पक्ष सोडून काँग्रेसचा पाठिंबा घेतो. काँग्रेसचा पुढारी पक्ष सोडून भाजपचा पाठिंबा घेतो. पक्षघरांना दारं नाहीतसं दिसतंय

गळेचेपी तंत्रज्ञान,पेगॅसस,भारत सरकार.

गळेचेपी तंत्रज्ञान,पेगॅसस,भारत सरकार.

हेरगिरीचं पेगॅसस हे तंत्र भारत सरकार वापरतं की नाही?  या प्रश्नाचं उत्तर भारत सरकार देत नाहीये. या बाबत प्रश्न विचारल्यावर सरकार म्हणतं की प्रकरण कोर्टात आहे. पेगॅसस हे टेलेफोन दळणवळणाची चोरी करणारं तंत्रज्ञान आहे. एक यंत्र असतं. ते दुरून किवा प्रत्यक्ष टेलेफोनमधे, इंटरनेटमधे,  घुसून  संभाषणं, दिले घेतले जाणारे मेसेजेस पळवतं. इस्रायलमधल्या आयएसओ या कंपनीनं ते तंत्रज्ञान विकसित केलंय, ते यंत्र विकसित केलंय. या यंत्राची टेलेफोनना चिकटण्याची क्षमता मर्यादित असते. पन्नास फोन, शंभर फोन अशा क्षमता असतात. जेवढी क्षमता जास्त तेवढी यंत्राची किमत…

Read More Read More

रोजगाराचा प्रश्न

रोजगाराचा प्रश्न

बिहार आणि उत्तर प्रदेशातले बेकार तरूण काम मागत आहेत, देशात साडेपाच करोड माणसं रोजगाराच्या चिंतेत आहेत.

कोणीही जिंको वा हरो, फायदा भाजपचाच.

कोणीही जिंको वा हरो, फायदा भाजपचाच.

गोव्यातल्या ४० मतदार संघापैकी पणजी हा एक मतदार संघ. पणजी ही गोव्याची राजधानी असल्यानं आणि ते शहर जगप्रसिद्ध असल्यानं तिथली निवडणूक लक्षवेधक असणं स्वाभाविक आहे. पणजीत आता उत्पल पर्रीकर आणि बाबुश मॉंसेराट यांच्यात स्पर्धा आहे. उत्पल पर्रीकर अपक्ष आहेत, मॉंसेराट भाजपचे उमेदवार आहेत. शिव सेना, आप इत्यादी पक्ष उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देताहेत. उत्पल पर्रीकर भाजपचे सदस्य होते,  तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेत आणि त्यांनी पक्ष सोडलाय.   उत्पल पर्रीकरांची नाराजी तशी जुनीच आहे. एकदा २०१५ साली त्यांनी तिकीट मागितलं होतं. तेव्हां…

Read More Read More