सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही

सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही

जून महिन्यातलं चेन्नई. विभाग मायलाई.  सकाळची वेळ. शरदकुमार, त्याची पत्नी गीता आणि त्यांच्या तीन मुली हातात प्लास्टिकच्या घागरी घेऊन गर्दीत उभ्या आहेत. धक्काबुक्की चाललीय, पाण्याच्या टँकरपर्यंत पोचण्यासाठी. तासभर झाला. दोन मुली शाळकरी आहेत. त्या कुरकूर करत आहेत. ” आठवडाभर शाळेला उशीर होतो. बाई ओरडतात. पहिला तास बुडतो.”  शरदकुमारच्या एका हातात घागर, दुसऱ्या हातात सेल फोन. फोन वाजतो.  ऑफिसमधून फोन.  ” दररोज उशीरा येतोयस, आज तरी लवकर ये “ ” काय करू? ऑफिसमधे येण्याआधी आंघोळ आणि कशीबशी पुजा तरी व्हायला हवी…

Read More Read More

पत्रकार असाही असतो

पत्रकार असाही असतो

उंदीर हा एकाद्या दीर्घ लेखाचा विषय होऊ शकतो?  जोसेफ मिचेल नावाचा पत्रकार ते करू शकतो. मिचेलनं १९४४ साली न्यू यॉर्कर या प्रसिद्ध साप्ताहिकात किनाऱ्यावरचे ( न्यू यॉर्कच्या किनाऱ्यावरचे) उंदीर या विषयावर १८ हजार शब्दांचा लेख लिहिला. १९३८ ते १९६४ म्हणजे २८ वर्षं मिचेलनं न्यू यॉर्क शहर याच विषयावर लेखन केलं.  न्यू यॉर्कभर उंदीर पसरलेत. ते कुठं नाहीत असं नाही. कचरापट्टी, पडीक इमारती, धान्य आणि मांसाची मंडी यात तर ते सापडणारच पण न्यू यॉर्कमधल्या चांगल्या हॉटेलांतही असतात. ते भुयारं खणून रहातात….

Read More Read More

हाँगकाँगला लोकशाही हवीय

हाँगकाँगला लोकशाही हवीय

हाँगकाँगला लोकशाही हवीय केवळ नागरी स्वातंत्र्य नव्हे आम्हाला लोकशाही हवीय असं म्हणत हाँगकाँगचे २० लाख नागरीक १२ जूनला रस्त्यावर उतरले. चिनी संस्कृतीची गंमत. चीनच्या पेपरांतून, कम्युनिष्ट पक्षाच्या पेपरांतून, हाँगकाँगचं वर्णन सहोदर असं केलं जातं. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटातून जन्मलेली मुलं. चिनी सोशल मिडियात आणि पेपरांत लोकांनी कळकळून लेख लिहिले. कर्तृत्ववान आईनं जन्म दिलेलं हाँगकाँग हे मूल काही काळ ब्रिटीशांनी दत्तक घेतलं होतं. ते आता आईकडं परत आलंय. पण मधल्या काळात ते बिघडलं. आता आईकडं परत आल्यावर मुलानं आईचं म्हणणं…

Read More Read More

मंत्रीमंडळ विस्तार. प्रश्न गुळाचा आहे.

मंत्रीमंडळ विस्तार. प्रश्न गुळाचा आहे.

महाराष्ट्रात पुढल्या निवडणुकीची तयारी सुरु झालीय. सत्ता हा गूळ आहे. तो गूळ मिळवणं हे निवडणुकीचं मुख्य उद्दीष्ट आहे. गुळाभोवती मुंगळे गोळा होत आहेत. विद्यमान सरकारचे फक्त तीनेक महिनेच उरले आहेत. निवडणूक जाहीर झाली की एक तथाकथित आचार संहिता लागू होईल. म्हणजे असं की मंत्र्यांना सरकारबाह्य अनधिकृत उद्योग करायची मोकळीक राहील. पैसे गोळा करणं, वाटत फिरणं, गावोगाव विरोधात जाणाऱ्यांची नसबंदी करणं, गळ टाकत गावोगावच्या डबक्यांत फिरणं इत्यादी. त्यासाठीच मंत्रीमंडळात जास्तीत जास्त मंत्री गोळा झालेले बरे. हे निवडणुकीचं आधुनिक शास्त्र आहे. हे…

Read More Read More

राजदूताची कहाणी

राजदूताची कहाणी

विल्यम बर्न्स यांनी १९८२ साली अमेरिकेच्या परदेश नीती खात्यात प्रवेश केला. रोनाल्ड रेगन, मोठे बुश, बिल क्लिंटन, धाकटे बुश आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली परदेश खात्यात त्यांनी विविध पदांवर राहून डिप्लोमसी केली. शेवटी डोनल्ड ट्रंप यांची कारकीर्द सुरू होतांना २०१४ साली त्यांनी परदेश खात्याला रामराम ठोकला.  कॉन्सुलेटमधे लोकांना व्हिसे देण्यापासून सुरवात करून ते उप परदेश मंत्री या पदापर्यंत पोचले. वाटेत ते जॉर्डन आणि रशियात राजदूतही होते. ३२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी छोटी मोठी कामं केली. २०१५ साली इराणशी केलेला अणू करार…

Read More Read More

थेरेसा मे यांचा राजीनामा, रिकामी मूठ झाकलीच राहिली

थेरेसा मे यांचा राजीनामा, रिकामी मूठ झाकलीच राहिली

थेरेसा मे यांनी टोरी पक्षाच्या नेतृत्वाचा म्हणजेच प्रधान मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. लोकसभेत अविश्वासाचा ठराव होऊन काही एका अपमानास्पद पद्धतीनं पद सोडावं लागणारच होतं, आपणहूनच नेतृत्वातून बाहेर पडून तेवढी अब्रू थेरेसा मे यांनी वाचवली आहे.  सुमारे पावणे तीन वर्ष त्या प्रधान मंत्री होत्या. २०१६ साली एका जनमत चाचणीनं ब्रेक्झिटचा निर्णय घेतल्यावर तो निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी घेत मे प्रधान मंत्री झाल्या. युरोपियन समुदायातून बाहेर पडण्याचे अनेक प्रस्ताव त्यांनी तयार केले. एकही प्रस्ताव ना लोकसभेनं मंजूर केला ना त्यांच्याच टोरी पक्षानं त्याला…

Read More Read More

वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर

वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर

कारचा गोरा ड्रायव्हर आणि काळा मालक यांच्यातलं घट्ट होत गेलेलं मैत्रीचं नाट्य दाखवणारा ग्रीन बुक यंदा सर्वोत्तम ऑस्कर चित्रपट ठरला.  सहायक अभिनेता (माहेरशाला अली) आणि पटकथेचीही ऑस्कर चित्रपटाला मिळाली.  १९६० च्या दशकातलं कथानक आहे. डोनल्ड शर्ली हा काळा नामांकित संगीतकार अमेरिकेत वर्णद्वेषासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांचा दौरा काढतो, त्यासाठी टोनी लिप या गोऱ्या माणसाला ड्रायव्हर कम सहाय्यक म्हणून पगारी नोकर म्हणून ठेवतो. शर्ली एका प्रतिष्ठित सुस्थित काळ्या घरात वाढलेला भरपूर शिकलेला आणि अत्यंत ऊच्चवर्णीय गोऱ्या संस्कृती व शिष्टाचारात वाढलेला माणूस असतो….

Read More Read More

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

रघूराम राजन यांचं थ्री पिलर्स हे पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र, अर्थ शास्त्र या विषयांची एक सहल आहे. राज्य (स्टेट), बाजार आणि समुदाय या समाजाच्या तीन घटकांचा इतिहास, त्यांची आजची स्थिती यांचा एक दीर्घ आढावा राजन यांनी घेतला आहे. बाजार,तंत्रज्ञान याचा संबंध राज्याशी येतो आणि हे दोन घटक मिळून समुदाय, समाज घडवतात. गेल्या वीसेक वर्षात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळं खूप बदल घडले असून त्यामुळं समुदाय हा घटक मोडकळीला आला, विस्कटला आहे. तेव्हां समुदाय (community)सुदृढ व्हावा यासाठी काय करता येईल याचा विचार राजन…

Read More Read More

जेसिंडा आरर्न, बंडखोर प्रधानमंत्री.

जेसिंडा आरर्न, बंडखोर प्रधानमंत्री.

जेसिंडा आरर्न न्यू झिलंडच्या प्रधान मंत्र्यांनी (वय ३८ वर्षे) आत्ता आत्ता म्हणजे एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यांच्या नवऱ्याचं नाव क्लार्क गेफर्ड. गेफर्ड एक टीव्ही कार्यक्रम करतात. कार्यक्रमाचं नाव आहे, एक मासा एक दिवस. जेसिंडा आणि त्यांची बऱ्याच वर्षापासूनची ओळख आहे. या लग्नानं न्यू झीलंड आणि युकेमधल्या लोकांच्या भुवया वर गेल्या. कारण क्लार्क हा त्यांचा चार पाच वर्षांपासूनचा अधिकृत मित्र आहे, दोघं एकत्र रहात होते. २०१८ साली जून महिन्यात जेसिडांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाचा पिता होता गेफर्ड. म्हणजे लग्न न…

Read More Read More

देव धर्म एक टाईमपास

देव धर्म एक टाईमपास

कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही अशी एक म्हण आहे. तरीही कावळे आणि माणसं शाप देतच असतात. गायी तर मरतातच,  वृद्ध होऊन किंवा रोग झाल्यानं किंवा कुपोषणामुळं. शाप देणारा मात्र स्वतःवर खुष होतो, आपल्या शापानं गाय मेली असं म्हणून समाधान पावतो. माणसाचा तळतळाट होतो तेव्हां माणूस त्रास देणाऱ्या माणसाचं तळपट होवो, त्याचं वाईट्ट वाईट्ट होवो असं म्हणतो. ती एक व्यक्त झालेली चीड असते. पण प्रज्ञा ठाकूर नावाची महिला लोकसभेची निवडणुक लढवतांना करकरे हा पोलिस अधिकारी आपल्या शापानं मेला असं म्हणते तेव्हा…

Read More Read More