रविवार/ निवडणूक एक टाळता येत नाही असा जुगार
२०२४ च्या ब्रिटीश निवडणुकीत मजूर पक्षाचे कीर स्टार्मर ब्रीटनचे प्रधान मंत्री झाले. २०१० मधे सत्तारूढ झालेल्या हुजूर पक्षाला ब्रिटीश मतदारांनी सत्तेतून हाकललं. मजूर पक्षाला ३४ टक्के मतं मिळाली पण लोकसभेच्या दोन तृतियांश, ४११ जागा, मिळाल्या.एक तृतियांश मतं आणि दोन तृतियांश जागा. हुजूर पक्षाला २४ टक्के मतं मिळाली पण १२१ जागा मिळाल्या. १२ पक्ष निवडणुक लढवत होते. शिवाय काही अपक्षही होते. अनेक पक्ष, अनेक उमेदवार निवडणुकीत असले की सत्तर टक्के जनतेचा विरोध असूनही सरकार स्थापन होतं. १९२४ साली, शंभर वर्षांपूर्वी पहिल्या…