ओबामा आणि ट्रंप यांच्यातला फरक
अँजेला मर्केल यांच्याबरोबर एक जेवण बैठक करायचं आधीच ठरलं होतं. बर्लीनमधल्या एका हॉटेलात एका हॉलमधे ओबामा आणि मर्केल एकत्र जेवले. तीनेक तास. ओबामांची कारकीर्द संपत होती, ट्रंप कारकीर्द सुरु होत होती. ट्रंप काय करतील याची भीतीचिंता मर्केलनी व्यक्त केली. ओबामाही चिंतित होतेच, म्हणाले, वाट पाहूया. ब्रीटन युरोपियन समुदायातून बाहेर पडत होतं आणि सीरियन स्थलांतरीतांच्या स्फोटक प्रश्नाला जर्मनी आणि युरोपला तोंड द्यावं लागत होतं. मर्केल चिंतित होत्या. सीरियन स्थलांतरितांना जर्मनीत प्रवेश देण्याच्या त्यांच्या निर्णयावर जर्मन जनता खवळली होती. युरोप आणि…