रविवार/युक्रेनी जीवाच्या आकांतानं कां लढत आहेत?
खारकीव, रशियाच्या हद्दीपासून १९ मैल. १९ एप्रिलची संध्याकाळ. आसमंतात सायरन वाजत आहेत, बाँब किंवा गोळा पडण्याची शक्यता आहे. नागरीक सुरक्षित जागी रवाना झाले. खारकीवपासून दूरवर कुठं तरी तोफ गोळे पडले. सायरन थंड झाला. नागरीक रस्त्यावर आले, आपापल्या कामाला लागले. चौकात माणसांचा गट गोळा झाला. त्यात नागरीक आहेत, सैनिक आहेत. इराण आणि इस्रायलमधील तणावांवर चर्चा चाललीय. ‘इराणच्या दूतावासावर इस्रायलनं हल्ला केला. आता इराण इस्रायल युद्ध सुरु होईल. युद्ध सुरु झाल्यावर अमेरिका इस्रायलकडं मदतीचा ओघ सरकवेल. तसं झालं तर आपले वांधे, आपली…