रविवार/ १४० रशियन कोणी मारले?
२२ मार्चच्या शुक्रवार. मॉस्कोतला ‘क्रोकस हॉल’. क्षमता ६३००. ‘पिकनिक’ या लोकप्रीय रॉक बँडचा कार्यक्रम होता. कार्यक्रम हाउस फुल होता. दहशतवादी टोळी हॉलच्या दारापाशी दिसली. चार किंवा पाच जण असावेत.त्यांच्या पाठीवर बॅकपॅक होते. हॉलशी पोचल्यावर त्यांनी बॅकपॅकमधून ऑटोमॅटिक बंदुका बाहेर काढल्या. गोळीबाराला सुरवात केली. समोर दिसेल त्याच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडत होते. माणसं सैरावैरा पळू लागली. दहशतवादी दरवाजातून हॉलमधे घुसले. गोळीबार करतांनाच ते बॅकपॅकमधूम आग लावणारी रसायनं फेकत होते, आग लावत होते. हॉल पूर्ण भरलेला होता. शेतात औषधं फवारावीत तशा गोळ्या फवारल्या…