पुस्तकं/प्लेगसाथीनं शिकवलेलं शहाणपण

पुस्तकं/प्लेगसाथीनं शिकवलेलं शहाणपण

प्लेगचे धडे ।। The Wisdom of Plagues. By Donald McNeill. Simon & Schuster; 384 pages; $28.99 and £20 || युरोपात १३४६ ते १३५३ या काळात  प्लेगची साथ झाली. अर्ध युरोप म्हणजे ५ कोटी माणसं मेली. प्लेगनंतर समाज जागा झाला.आरोग्यात सुधारणा झाली, वातावरणातले रोगट घटक कमी झाले, औषधोपचारात सुधारणा झाली आणि मुख्य म्हणजे लसीचा शोध लागला. प्लेग नाहिसा झाला.  भारतात १८८५ साली प्लेगची साथ आली, एक कोटी माणसं मेली.  १९१८ साली इटालीत फ्ल्यूची साथ आली. ती काही वर्षं टिकली. साथीत ५…

Read More Read More

रविवार. महाशक्तींचा ‘ओलिस ओलिस’ खेळ

रविवार. महाशक्तींचा ‘ओलिस ओलिस’ खेळ

७ ऑक्टोबरला हमासनं सुमारे २४० इसरायली नागरिकांचं अपहरण केलं, त्यांना गाझामधे नेलं, भुयारी रस्त्यांत लपवून ठेवलं.  गाझामधे हमासनं एक भुयारी मार्ग, बोगदे यांचं जाळं उभारलं आहे. किती तरी किमी लांबीचं. बोगद्याची उंची आणि रुंदी एकाद्या खोली येवढी असते, माणसं तिथं आरामात राहू शकतात, वावरू शकतात. हमासचे सैनिक त्या बोगद्यात रहातात, तिथं हमासची ऑफिसं आहेत.   इझरायलनं गाझावर आक्रमण केलं. त्या आक्रमणाचं एक उद्दिष्ट ओलिसांना सोडवणं हे होतं. जोवर ओलीस मुक्त होत नाहीत तोवर युद्ध थांबणार नाही अशी घोषणा पंतप्रधान बीबी…

Read More Read More

सिनेमे. नेवाल्नी डॉक्युमेंटरी

सिनेमे. नेवाल्नी डॉक्युमेंटरी

नेवाल्नी, डॉक्युमेंटरी. डॉक्युमेंटरी हा दृश्य जर्नालिझम असतो.  २०२२ साली नेवाल्नी याच शीर्षकाची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. नेवाल्नी जिवंत असताना ही डॉक्युमेंटरी चित्रीत झाली. नेवाल्नीवर पुतिननी विषप्रयोग केला होता, त्यातून वाचलेले नेवाल्नी जर्मनीत उपचार घेत होते. त्या काळात ही डॉक्युमेंटरी चित्रीत झालीय. नेवाल्नी एका रिकाम्या गोदामासारख्या जागी एका टेबलासमोर बसतात आणि बोलतात. फीचर फिल्ममधे दाखवतात तसे फ्लॅशबॅक डॉक्युमेंटरीत आहेत, नेवाल्नी यांच्या बोलण्यात आलेले संदर्भ त्या फ्लॅशबॅकमधे दिसतात.  डॉक्युमेंटरी सुरु होते. ‘तुला आवडणार नाही, आम्हालाही ते नकोय, पण समजा ते घडलं, तू मेलास,…

Read More Read More

नेवाल्नी भाग ३. ..आणि नेवाल्नी हुतात्मा झाले.

नेवाल्नी भाग ३. ..आणि नेवाल्नी हुतात्मा झाले.

२०११ सालच्या पुतिन यांच्या निवडणुकीला विरोध केल्यानंतर नेवाल्नी यांना फालतू कारणं दाखवून तुरुंगवास झाला. तिथून काही ना काही कारणं दाखवून अटक करणं, स्थानबद्द करणं, तुरुंगात घालणं सुरू झालं. २०१७ साली नेवाल्नी यांनी पुतिन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. सरकारनं नेवाल्नी यांच्यावर खटले भरले आणि त्या खटल्यांच्या आधारे नेवाल्नींचा निवडणूक अर्ज रद्दबातल करण्यात आला. रशियन सरकारकडं एक खासमखास माणसांचं दल आहे. ही माणसं सैन्यातली असतात, त्यांची ओळख पुसून टाकण्यात आलेली असते. त्यांची नावं, पासपोर्ट बदललेले असतात. या लोकांकडं विषाच्या कुप्या असतात….

Read More Read More

नेवाल्नी भाग २. पुतिनचा निवडणुक फ्रॉड उघडा केला.

नेवाल्नी भाग २. पुतिनचा निवडणुक फ्रॉड उघडा केला.

पुतिन यांचं धटिंगणासारखं वागणं इतकं दृष्टीत भरण्यासारखं होतं की पुतिन विरोधी विचार पटापट जन्मला वाढला. २००५ साली पुतिन विरोधकांची एक संघटना झाली, त्यांनी रशियन मार्च नावाची संघटना काढली. नेवाल्नी या संघटनेत सामिल झाले. परंतू या संघटनेत नाझी, अतिरेकी, टोकाचे देशीवादी, हिंसावादी लोक बरेच होते. नेवाल्नी या संघटनेच्या बाहेर पडले. नेवाल्नी याब्लोको नावाच्या एका लिबरल संघटनेत सक्रीय झाले. पण तिथंही त्यांचं पटलं नाही, संघटनेनं त्यांना हाकललं. रशियन मार्चमधले लोक अती देशीवादी होते आणि याब्लोकोमधले लोक देशीवादाच्या दुसऱ्या टोकाला होते. नेवाल्नींचा राजकीय…

Read More Read More

ॲलेक्सी नेवाल्नी. भाग १. कसा मेला.

ॲलेक्सी नेवाल्नी. भाग १. कसा मेला.

रशियातले सत्ताविरोधी नेते ॲलेक्सी नेवाल्नी १६ फेब्रुवारीला उत्तर रशियातल्या वैराण अती थंड तुरुंगात वारले. रक्तात गुठळी झाल्यामुळं गेले असं सरकारनं सांगितलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की गुठळ्या होण्याची व्याधी त्यांना  नव्हती. पाझरलेल्या बातमीनुसार नेवाल्नीना हळूहळू प्रभावी ठरणारं विष दिलं होतं, म्हणूनच त्यांचं शव नातेवाईकांच्या हवाली करायला सरकारनं नकार दिला. तुरुंगातल्या लोकांनी सांगितलं की दुपारी फिरायला गेले असताना ते कोसळले आणि उपचारांचा उपयोग झाला नाही. नेवाल्नी दररोज सकाळी सहा वाजता फिरायला जात असत. तुरुंगाचा तो नियमच होता. मग दुपारी ते…

Read More Read More

रविवार/चीन जिवंत माणसं साच्यात घालतोय

रविवार/चीन जिवंत माणसं साच्यात घालतोय

पतिहान इमीन या ७० वर्षाच्या बाई कुराण पठण करत असत, त्यांच्याकडं कुराणाची इलेक्ट्रॉनिक कॉपी होती. त्यांचे कपडे मुस्लीम वळणाचे होते. पोलिसांनी त्यांना पकडलं. फटाफट खटला पूर्ण झाला, त्यांना ६ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झाली. इझिगुल मेमेट ही ५ वर्षाची मुलगी तिच्या आईपाशी बसून कुराण वाचत होती. पोलिसांनी तिला पकडलं. तिला १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली.  ऐतिला रोझी या ३५ वर्षाच्या स्त्रीला ‘बेकायदेशीर’ कपडे वापरण्याबद्दल २० वर्ष तुरुंगवास घडला. कारण बुरखा, पायघोळ झगा वापरणं या गोष्टी तिथं बेकायदेशीर आहेत.   एक ८०…

Read More Read More

पुस्तकं/ईलॉन मस्क यांचं चरित्र

पुस्तकं/ईलॉन मस्क यांचं चरित्र

ईलॉन मस्क  हे २०६ अब्ज डॉलरच्या संपत्तीचे जगातले एक नंबरचे श्रीमंत गृहस्थ आहेत.  वॉल्टर आयझॅक्सन यांनी लिहिलेलं त्यांचं  चरित्र प्रसिद्ध झालंय.  आयझॅक्सन लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांनी आईनस्टाईन, स्टीव जॉब्ज यांची चरित्रं लिहिली आहेत. ती  खूप खपली आहेत.  २०२१ सालापासून आयझॅक्सन मस्क यांच्या मागावर होते, त्यांच्या आसपास वावरत होते. हे कळल्यावर मस्क यांनी आयझॅक्सन यांना चरित्र लिहायला परवानगी दिली. मस्क यांचं निरीक्षण करण्यासाठी आयझॅक्सन संचालक मंडळाच्या बैठकीत हजर राहिले. चाळीसपेक्षा जास्त वेळा  आयझॅक्सन मस्क यांना भेटले.  मस्क यांच्याशी संबंधीत १२९…

Read More Read More

रविवार/ बोटीवर हौसमौज

रविवार/ बोटीवर हौसमौज

अमेरिकेतल्या मायामीमधल्या एका बंदरातून एक बोट हौशी प्रवाशांना घेऊन निघालीय. या बोटीचं नाव आहे आयकॉन ऑफ सीज. समुद्र भूषण. ही बोट ३६५ मीटर लांबीची आहे. बोटीवर २० डेक्स म्हणजे मजले आहेत. सर्वात वरच्या डेकवर म्हणजे गच्चीवर वेगवान गाड्यांची शर्यत खेळता येते. बोटीवर फूटबॉल खेळता येतील अशी मैदानं आहेत, ६ स्विमिंग पूल आहेत, १७ मीटर उंचीचा एक धबधबाही केलेला आहे. उंचावरून पाण्यात उतरण्यासाठी केलेल्या ६ घसरगुंड्या आहेत,  चित्रपटांसाठी आणि संगीत जलशांसाठी सिनेघरं आहेत, गोल्फ कोर्स आहे, ४० रेस्टॉरंट्स आणि बार आहेत….

Read More Read More

शुक्रवार/ ॲनॉटॉमी: पडद्यावरची कथा

शुक्रवार/ ॲनॉटॉमी: पडद्यावरची कथा

पुणे फेस्टिवलमधे ॲनॉटॉमी ऑफ ए फॉल पडद्यावर आला. काही दिवस आधी तो मुंबईच्या मामी फेस्टिवलमधेही दिसला होता.  दोन माणसांच्या जीवनातला एक कालखंड  या चित्रपटात आहे. सॅमी आणि सँड्रा हे लेखक जोडपं आहे. दोघं लंडनमधे एकमेकाला भेटली, लग्न केलं, लंडनमधेच वास्तव्य करून होते. सॅमी एका पुस्तकासाठी झगडत होता, जमत नव्हतं. निवांत जागा आणि वेळ मिळावा यासाठी तो लंडनमधली नोकरी सोडून आपल्या मायदेशात, स्वित्झर्लंडमधे पोचला. एक शॅले घेतलं, त्याची डागडुजी आणि सजावट केली. त्यावर पैसे खर्च केले.  सँड्रा ही मूळ जर्मन आहे….

Read More Read More